पर्सनल लोनसंदर्भात रिझर्व्ह बॅंकेचा नवा आदेश, कर्जाच्या मर्यादेत झाली २५ पट वाढ, जाणून घ्या विस्ताराने

कोणत्याही बॅंकेच्या संचालक मंडळातील संचालक , व्यवस्थापकीय संचालक आणि चेअरमन यांच्या कुटुंबातील सदस्यांना आपल्या किंवा दुसऱ्या बॅंकेकडून मिळणाऱ्या पर्सनल लोनच्या मर्यादेत २५ पट वाढ करण्यात आली आहे.

New RBI circular on Personal Loan
आरबीआयचा पर्सनल लोनवरील नवा आदेश 

थोडं पण कामाचं

  • रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचा पर्सनल लोन संदर्भात नवीन आदेश
  • कोणत्याही बॅंकेच्या संचालक मंडळातील संचालक (Board of Directors), व्यवस्थापकीय संचालक (Managing Director) आणि चेअरमन (Chairman) यांच्या कुटुंबातील सदस्यांना मिळणाऱ्या पर्सनल लोनची मर्यादा २५ पटींनी वाढवली
  • पर्सनल लोन संदर्भात बॅंकेच्या संचालक मंडळाची किंवा मॅनेजमेंट समितीची मंजूरी आवश्यक

मुंबई: रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने आज एक सर्क्युलर (RBI circular) जाहीर केले आहे. आरबीआयने (RBI) पर्सनल लोनसंदर्भात (Personal Loan)एक नवा आदेश जाहीर केला आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या (Reserve Bank of India) या आदेशानुसार कोणत्याही बॅंकेच्या संचालक मंडळातील संचालक (Board of Directors), व्यवस्थापकीय संचालक (Managing Director) आणि चेअरमन (Chairman) यांच्या कुटुंबातील सदस्यांना आपल्या किंवा दुसऱ्या बॅंकेकडून मिळणाऱ्या पर्सनल लोनच्या मर्यादेत २५ पट वाढ (Personal loan limit is increased by 25 times) करण्यात आली आहे. आधी कोणत्याही बॅंकेच्या संचालक मंडळातील संचालक व्यवस्थापकीय संचालक आणि चेअरमन यांच्या कुटुंबातील सदस्यांना आपल्या किंवा दुसऱ्या बॅंकेकडून २५ लाख रुपयांपर्यत पर्सनल लोन घेता येत होते. मात्र रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने यासाठीची कमाल मर्यादा आता ५ कोटी रुपये केली आहे. (Reserve Bank of India increase upper limit for personal for board directors and chairman of banks)

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचा आदेश (RBI circular on personal loan for Bankers)

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या या नव्या सर्क्युलरनुसार कोणतीही बॅंक आपल्या संचालक मंडळातील संचालक किंवा चेअरमन आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कमाल ५ कोटी रुपयांचे पर्सनल लोन आता देऊ शकणार आहे. २५ लाख रुपयांची जुनी मर्यादा ही १९९६ मध्ये निश्चित करण्यात आली होती. ती मर्यादा आता वाढवण्यात आली आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने पर्सनल लोनची कमाल मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेण्यामागे वाढती महागाई आहे. मागील तीन दशकांमध्ये महागाई खूप जास्त वाढली आहे. ती लक्षात घेऊन पर्सनल लोनची कमाल मर्यादा वाढवण्यात आली आहे. पर्सनल लोनची मर्यादा वाढवण्याबरोबरच बॅंकिंग जगतातील तज्ज्ञदेखील आता बॅंकांच्या संचालक मंडळामध्ये समाविष्ट होतील. यामुळे आर्थिक यंत्रणा आणखी मजबूत होतील. २५ लाख रुपयांची सध्याची मर्यादा २५ वर्षांपूर्वी १९९६ मध्ये निश्चित करण्यात आली होती.

मॅनेजमेंटच्या समितीची मंजूरी आवश्यक

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या सर्क्युलरमध्ये म्हटले आहे की जोपर्यत पर्सनल लोन संदर्भात बॅंकेच्या संचालक मंडळाची किंवा मॅनेजमेंट समितीची मंजूरी मिळत नाही तोपर्यत कोणतीही बॅंक अॅडव्हान्स किंवा कर्ज देऊ शकत नाही. बॅंकेच्या संचालक मंडळाची मंजूरी मिळाल्यानंतरच संचालकांची पत्नी आणि त्यांच्यावर अवलंबून मुलांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना हे कर्ज दिले जाऊ शकते. हा नियम व्यवस्थापकीय संचालक, इतर संचालक आणि चेअरमन यांना लागू आहे.

चंदा कोचरने केला होता पदाचा गैरवापर

याआधी असे आढळून आले आहे की बॅंकांच्या संचालक मंडळातील विविध संचालक आणि चेअरमन यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला होता आणि आपल्या कुटुंबियांना याचा चुकीच्या मार्गाने लाभ पोहोचवला होता. आयसीआयसीआय बॅंकेच्या (ICICI Bank) माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर (Chanda Kochar) यांचे प्रकरण याच संदर्भातील होते आणि त्याची खूपच चर्चादेखील झाली होती. चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत व्हिडिओकॉन समूहाला ३,२५० कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. व्हिडिओकॉन समूहाच्या आर्थिक स्थितीला लक्षात घेता हे कर्ज ही खूप मोठी रक्कम होती. मात्र तरीही चंदा कोचर यांनी हे कर्ज व्हिडिओकॉन समूहाला दिले होते. हा सौदा पूर्ण करण्याबद्दल व्हिडिओकॉन समूहाचे वेणूगोपाल धूत यांनी चंदा कोचर यांच्या पतीच्या कंपनीत म्हणजे न्यूपॉवर रिनिवेबल्समध्ये (NuPower Renewables) ६४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी