Unclaim Deposits in Banks: भारतीय बँकांमध्ये बेवारस पडून आहेत 35 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे

RBI To Set Up Web Portal To Enable Search Across Multiple Banks For Unclaimed Deposits : भारतीय बँकांमध्ये 35 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे बेवारस अवस्थेत पडून आहेत. वेगवेगळ्या खात्यांमध्ये पडून असलेल्या या पैशांवर अनेक वर्षांपासून कोणीही दावा केलेला नाही.

RBI To Set Up Web Portal To Enable Search Across Multiple Banks For Unclaimed Deposits
भारतीय बँकांत बेवारस आहेत 35 हजार कोटी रु. जास्त पैसे  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • भारतीय बँकांमध्ये बेवारस पडून आहेत 35 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे
  • बेवारस खात्यांची माहिती एका राष्ट्रीय वेब पोर्टलवर
  • मागील दहा वर्षांमध्ये एकही आर्थिक व्यवहार झालेला नाही अशा खात्यांतील पैसे हे बेवारस

RBI To Set Up Web Portal To Enable Search Across Multiple Banks For Unclaimed Deposits : भारतीय बँकांमध्ये 35 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे बेवारस अवस्थेत पडून आहेत. वेगवेगळ्या खात्यांमध्ये पडून असलेल्या या पैशांवर अनेक वर्षांपासून कोणीही दावा केलेला नाही. खातेदाराचा मृत्यू झाल्यामुळे अथवा खातेदार गंभीर आजारी असल्यामुळे दीर्घ काळापासून संबंधित खात्यांमधून एकही आर्थिक व्यवहार झालेला नाही. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार अशा बेवारस बँक खात्यांतील पैशांच्या नियोजनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

रिझर्व्ह बँकेने सर्व राष्ट्रीयकृत बँकांमधील बेवारस खात्यांची माहिती एका राष्ट्रीय वेब पोर्टलवर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दावेदार स्वतःची ओळख जाहीर करून तसेच आवश्यक ती कायदेशीर कागदपत्रे सादर करून बेवारस खात्यातील पैशांवर दावा करू शकतात. बँकेचे सक्षम अधिकारी कागदपत्रांची नियमानुसार तपासणी करतील आणि दावेदाराकडे बेवारस खात्यातील रकमेचे हस्तांतरण करतील. ही पूर्ण प्रक्रिया भारतीय संविधानाच्या चौकटीत पूर्ण केली जाईल. 

ज्या खात्यांमध्ये मागील दहा वर्षांमध्ये एकही आर्थिक व्यवहार झालेला नाही अशा खात्यांतील पैसे हे बेवारस समजले जातात. या खात्यांतील पैशांवर विहित मुदतीत कोणीही दावा केला नाही तर ही रक्कम सरकारजमा केली जाईल. 

रिझर्व्ह बँक आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अर्थात एआयच्या मदतीने दावेदारांच्या दाव्यातील तथ्यांची पडताळणी करणार आहे. ज्या पैशांवर दावा केला जात नाही त्या पैशांचा कायदेशीर दावेदार शोधण्यासाठीही एआयची मदत घेतली जाणार आहे. 

रिकाम्या पोटी हे पदार्थ खा आणि मधुमेह नियंत्रणात ठेवा

एका महिन्यात पंधरा किलो वजन घटवण्यासाठी करा हे डाएट

भारतात बारा राष्ट्रीयकृत बँका आहेत. यापैकी स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआयकडे सर्वाधिक 8 हजार 86 कोटी रुपये बेवारस अवस्थेत पडून आहेत. पंजाब नॅशनल बँकेकडे 5 हजार 340 कोटी रुपये बेवारस अवस्थेत पडून आहेत. कॅनरा बँकेकडे 4 हजार 558 कोटी रुपये तर बँक ऑफ बडोदाकडे 3 हजार 904 कोटी रुपये बेवारस अवस्थेत पडून आहेत.

केळं खाण्याचे महिलांना होतात हे फायदे

हाडांच्या मजबुतीसाठी खा ही फळे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी