Digital Rupee : आला! भारताचा स्वतःचा डिजिटल रुपया आला...आरबीआयचा पायलट प्रोजेक्ट 1 नोव्हेंबरपासून सुरू

Digital Rupee : रिझर्व्ह बॅंकेनेदेखील (RBI)मागील काही कालावधीपासून डिजिटल करन्सीची (Digital Currency) म्हणजे डिजिटल रुपीची (Digital Rupee) तयारी चालवली होती. आता देशातील डिजिटल चलनाची पहिली पायलट चाचणी अर्थात 'डिजिटल रुपे' मंगळवारपासून म्हणजेच 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या चाचणीत नऊ बँका सरकारी रोख्यांमधील व्यवहारांसाठी या डिजिटल चलनाचा वापर करतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सोमवारी यासंदर्भात निवेदन जारी केले आहे.

Digital Rupee
डिजिटल रुपी 
थोडं पण कामाचं
  • जगभरात डिजिटल करन्सीचे प्रयोग सुरू
  • आरबीआयकडून डिजिटल रुपयाची चाचणी सुरू
  • नऊ बॅंकांचा चाचणीमध्ये सहभाग

Digital Currency : नवी दिल्ली : क्रिप्टोकरन्सीच्या उदयानंतर जगभर डिजिटल करन्सीचे वारे वाहू लागले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बॅंकेनेदेखील (RBI)मागील काही कालावधीपासून डिजिटल करन्सीची (Digital Currency) म्हणजे डिजिटल रुपीची (Digital Rupee) तयारी चालवली होती. आता देशातील डिजिटल चलनाची पहिली पायलट चाचणी अर्थात 'डिजिटल रुपे' मंगळवारपासून म्हणजेच 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार  आहे. या चाचणीत नऊ बँका सरकारी रोख्यांमधील व्यवहारांसाठी या डिजिटल चलनाचा वापर करतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सोमवारी यासंदर्भात निवेदन जारी केले आहे. त्यात आरबीआयने म्हटले आहे की, "डिजिटल रुपयाची पहिली पायलट चाचणी 1 नोव्हेंबरपासून सुरू होईल. या चाचणीअंतर्गत सरकारी रोख्यांमधील दुय्यम बाजारातील व्यवहारांचा निपटारा केला जाईल. (RBI to start digital rupee test from 1st November)

अधिक वाचा : Twitter Blue Tick: आता ब्लू टिकसाठी 5000 रुपये द्यावे लागणार !

आरबीआयची पावले डिजिटल करन्सीच्या अंमलबजावणीकडे

आरबीआयने 'सेंट्रल बँक डिजिटल करन्सी किंवा CBDC' सादर करण्याच्या आपल्या योजनेच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यानुसार आरबीआयने डिजिटल रुपयाची प्रायोगिक चाचणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. घाऊक व्यवहारांच्या डिजिटल रुपयाच्या चाचणीत नऊ बँका सहभागी होतील. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, येस बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि एचएसबीसी या बॅंकांचा समावेश आहे. आरबीआयच्या डिजिटल चलनात डील सेटलमेंट केल्याने सेटलमेंट खर्च कमी होण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा : तुमच्या खात्यात PF चे पैसे जमा होतायत की नाही? असे तपासा...

याशिवाय डिजिटल रुपयासंदर्भात आरबीआयने सांगितले की, डिजिटल रुपयाची (रिटेल सेगमेंट) पहिली पायलट चाचणी महिनाभरात सुरू करण्याची योजना आहे. चाचणी विशिष्ट वापरकर्ता गटांमधील निवडक ठिकाणी घेतली जाईल, ज्यामध्ये ग्राहक आणि व्यापारी यांचा समावेश आहे. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, भविष्यातील प्रायोगिक चाचण्यांमध्ये इतर घाऊक व्यवहार आणि क्रॉस-बॉर्डर पेमेंट्सकडेही लक्ष दिले जाईल.

डिजिटल करन्सी इतर चलनांना पूरक

आरबीआयच्या अहवालात म्हटले आहे की सध्याच्या चलनांना हे पूरक आहे. ग्राहकांना सध्या अतिरिक्त पेमेंट पर्याय उपलब्ध करून दिला जाईल. सेंट्रल बँक डिजिटल करन्सीवर सादर केलेल्या आपल्या संकल्पना अहवालात असे म्हटले आहे की हे डिजिटल चलन सादर करण्याचा उद्देश सध्याच्या चलनाच्या स्वरूपांना पूरक आहे. सद्यपरिस्थितीत जगभरातील मध्यवर्ती बँका CBDC सुरू करण्याच्या शक्यतांचा शोध घेत आहेत. त्यानुसार भारतातदेखील पावले उचलली जात आहेत.

अधिक वाचा : भारत : सुपरहिट टुरिस्ट स्पॉट

याआधी भारत सरकारने 1 फेब्रुवारी 2022 रोजी संसदेत सादर करण्यात आलेल्या एका केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आर्थिक वर्ष 2022-23 पासून डिजिटल रुपया - सेंट्रल बँक डिजिटल करन्सी लॉन्च करण्याची घोषणा केली होती. सीबीडीसी केंद्रीय बँकेद्वारे जारी करण्यात आलेल्या करन्सी नोटांचं एक डिजिटल रूप आहे. सेंट्रल बँक डिजिटल करन्सी किंवा डिजिटल रुपया भारतीय रिझर्व्ह बँकेकडून कायदेशीर निविदा म्हणून केली जाऊ शकते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी