rbi update mani app in 11 new languages for note identification : भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India - RBI) नोटेचा खरेखोटेपणा तपासणारे मनी नावाचे अॅप (MANI APP - Mobile Aided Note Identifier App) अपडेट केले आहे. आता मनी अॅप 11 भाषेत काम करणार आहे. आधी मनी अॅप फक्त हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये उपलब्ध होते. आता मनी अॅप हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांव्यतिरिक्त मराठी, गुजराती, बंगाली, आसामी, कानडी, मल्याळम, उडिया, पंजाबी, तामीळ, तेलुगू, उर्दू या अकरा भाषांमध्येही उपलब्ध होणार आहे. यामुळे मनी अॅप 13 भाषांमध्ये उपलब्ध असेल. महत्त्वाचे म्हणजे मनी अॅप सर्व तेरा भाषांमध्ये विनामूल्य उपलब्ध आहे.
चर्चेतल्या सेलिब्रेटींची प्रसिद्धीपासून दूर असलेली मुलं
मनी अॅप भारतीय रिझर्व्ह बँकेने 2020 मध्ये लाँच केले. ज्यांना दिसत नाही अशा दिव्यांगांसाठी मनी अॅप लाँच करण्यात आले आहे. अॅपच्या मदतीमुळे दिसत नसले तरी दिव्यांगांना कोणत्याही भारतीय नोटेचा खरेखोटेपणा तपासता येतो. यासाठी अॅप अॅक्टिव्ह असताना कॅमेऱ्याद्वारे नोट स्कॅन करायची. यानंतर अॅप ऑडिओ स्वरुपात सेट केलेल्या भाषेत नोट कोणती आहे याची तसेच नोटेचा खरेखोटेपणा तपासून त्याबाबतची माहिती देते. नोट कोणत्याही बाजुने स्कॅन केली अगदी दुमडलेली नोट स्कॅन केली तरी अॅप त्याचे काम व्यवस्थित करते.
सनी लिओनीचा ट्रॅडिशनल हॉट अवतार
मनी अॅप अँड्रॉईड आणि ओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. जर एखाद्याच्या मोबाईलवर आधीपासूनच मनी अॅप असेल आणि त्यात हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त इतर भाषांचे पर्याय दिसत नसतील तर त्यांनी अॅप अपडेट करून घेणे आवश्यक आहे.