प्रेरणादायक! आईने दिलेल्या २५ रुपयांतून उभारले मोहनसिंह ओबेरॉय यांनी हॉटेल्सचे साम्राज्य

राय बहादूर मोहन सिंग ओबेरॉय हे या गोष्टीचे उदाहरण आहेत की वाईट काळ आणि संकटांचा सामना तेव्हाच करता येतो जेव्हा भविष्यात चांगल्या गोष्टीच होणार असल्याची खात्री आपल्याला असतो. वाचा त्यांचा प्रेरणादायक प्रवास.

Mohan Singh Oberoi
जाणून घ्या मोहन सिंग ओबेरॉय यांचा प्रेरणादायक प्रवास, कशी शून्यातून उभारली हॉटेल चेन  |  फोटो सौजन्य: Indiatimes

थोडं पण कामाचं

  • पाकिस्तानमध्ये झाला होता ओबेरॉय यांचा जन्म
  • अनेक संकटांचा सामना करत उभारले हॉटेलचे साम्राज्य
  • पत्नीचे दागिने गहाण ठेवून खरेदी केली मालमत्ता

Your Dose Of Inspiration Today: राय बहादूर मोहन सिंग ओबेरॉय (Mohan Singh Oberoi) हे या गोष्टीचे उदाहरण (example) आहेत की वाईट काळ (bad period) आणि संकटांचा (adversities) सामना तेव्हाच करता येतो जेव्हा भविष्यात (future) चांगल्या गोष्टीच (good things) होणार असल्याची खात्री (belief) आपल्याला असतो. जाणून घ्या त्यांचा प्रेरणादायक प्रवास (inspirational journey). त्यांनी भारतातल्या (India) दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या हॉटेल व्यवसायाची (hotel business) स्थापना केली आणि या प्रवासाची सुरुवात त्यांनी त्यांच्या आईकडून मिळालेल्या फक्त 25 रुपयांनी केली.

पाकिस्तानमध्ये झाला होता ओबेरॉय यांचा जन्म

मोहन सिंग ओबेरॉय यांचा जन्म पाकिस्तानच्या झेलम जिल्ह्यातल्या भानाऊ गावात एका शीख कुटुंबात झाला. ते सहा वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि सर्व जबाबदाऱ्या त्यांच्या आईच्या खांद्यावर पडल्या. तिला मदत करण्यासाठी ओबेरॉय यांनी शिक्षण सोडले आणि 1918 साली त्यांच्या काकांच्या लाहोरच्या बूट तयार करण्याच्या कारखान्यात ते व्यवस्थापक म्हणून काम करू लागले. पण अमृतसरमध्ये मोठ्या प्रमाणात दंगली सुरू झाल्यामुळे हा कारखाना वर्षभरातच बंद पडला. याच सुमाराला ओबेरॉय यांचा विवाह इशरन देवी यांच्याशी झाला.

अनेक संकटांचा सामना करत उभारले हॉटेलचे साम्राज्य

बरेच प्रयत्न करूनही जेव्हा ओबेरॉय यांना नोकरी मिळू शकली नाही, तेव्हा ते त्यांच्या मूळ गावी परत गेले. त्यांना त्यांच्या आईसोबत राहायचे होते आणि तिची काळजी घ्यायची होती, पण आईने याला नकार दिला आणि त्यांना त्यांच्या सासरी जाऊन काम शोधण्याचा सल्ला दिला. असे म्हटले जाते की ओबेरॉय जेव्हा घर सोडत होते तेव्हा त्यांच्या आईने त्यांना 25 रुपये दिले होते. 1922 साली प्लेगच्या संकटापासून वाचण्यासाठी ओबेरॉय शिमल्याला आले आणि तिथे त्यांनी सेसिल हॉटेलमध्ये फ्रंट डेस्क क्लर्कची नोकरी धरली. त्यांना 50 रुपये प्रति महिना पगार होता. त्यांनी या संधीचा पुरेपूर फायदा करून घेतला.

पत्नीचे दागिने गहाण ठेवून खरेदी केली मालमत्ता

1934मध्ये ओबेरॉय यांनी त्यांची पहिली प्रॉपर्टी, क्लार्क्स हॉटेल त्यांच्या गुरूकडून आपल्या पत्नीचे दागिने गहाण ठेवून विकत घेतली. पुढच्या पाच महिन्यात मेहनत करून त्यांनी सर्व कर्ज फेडले आणि नंतर कलकत्त्याचे 500 खोल्यांचे ग्रँड हॉटेल त्यांनी लीजवर चालवण्यासाठी घेतले. अशाप्रकारे पुढे जाता जाता त्यांनी भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या हॉटेल व्यवसायाची उभारणी केली. आज या कंपनीत 12,000पेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळतो. पाच देशांमध्ये 31 लक्झरी हॉटेल आणि क्रूझर त्यांच्या मालकीची आहेत आणि त्यांच्यातर्फे चालवली जातात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी