आजच्या धकाधकीच्या आयुष्यात (Hectic life) कधीही कोणासोबतही कोणताही दुर्घटना (accidents) घडू शकते. अशा परिस्थितीत आपल्या कुटुंबाला (family) आर्थिक समस्यांपासून (financial problems) वाचवण्यासाठी सर्वांनीच विमा पॉलिसीचा (insurance policy) आधार घ्यायला हवा. पण यासाठी योग्य ती विमा पॉलिसी निवडणे हे अत्यंत गरजेचे आहे जेणेकरून ती आपल्यासाठी आणि आपल्या स्वप्नांसाठी गरज पडेल त्यावेळी फायद्याची ठरू शकेल.
यासोबत योग्य त्या वेळी विमा पॉलिसी घेणे हे फार महत्वपूर्ण आहे. विमा पॉलिसी खरेदी करण्याबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न असतात की ही विमा पॉलिसी कधी आणि कोणत्या वयात खरेदी करावी आणि कोणता विमा प्लॅन त्यांच्यासाठी योग्य असेल. या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही आपल्याला देणार आहोत.
तज्ञांच्या म्हणण्यानुसार कोणत्याही प्रकारच्या अकस्मात जोखमी किंवा दुर्घटनांपासून स्वतःचे आणि कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी २०व्या वर्षी जीवन विमा उतरवावा. कमी प्रीमियम दर हा याचा फायदा आहे. २५व्या वर्षी टर्म विमा घेणाऱ्या व्यक्तीला ३० वर्षांच्या कालावधीसाठी एकूण ७ हजार रुपयांचे प्रीमियम भरावे लागते तर ३० वर्षीय व्यक्तीला त्यावेळी पॉलिसी घेतल्यास ९ हजार रुपयांचे प्रीमियम भरावे लागते. याचा अर्थ वय अधिक असल्यास जीवन विमा पॉलिसी घेतल्यास प्रीमियमही अधिक भरावे लागेल.
जीवन विम्याशिवाय आरोग्य विमाही कमी वयातच उतरवणे गरजेचे आहे. असे केल्याने आपण योग्य आरोग्य विमा योजनेमुळे आपल्याला कोणताही रोग झाल्यास त्याच्या इलाजासाठी वर्षानुवर्षे कव्हर करत राहता. जीवन आणि आरोग्य विम्याप्रमाणेच घराचा विमा उतरवणेही करजेचे आहे. हे करताना आपल्या सर्व गोष्टींचे योग्य ते मूल्यमापन करा जेणेकरून या सर्व गोष्टींचे योग्य ते लाभ आपल्याला मिळू शकतील.