Tax Deduction | अर्थमंत्र्यांनी जर हे केले...तर घर खरेदी करणाऱ्यांना होईल जबरदस्त फायदा

Real Estate : आधीच्या अर्थसंकल्पांप्रमाणेच याही अर्थसंकल्पातून रिअल इस्टेट उद्योगाला खूप अपेक्षा आहेत. रिअल इस्टेट क्षेत्राशी (Real Estate sector) संबंधित लोक या उद्योगाला चालना मिळण्याच्या सर्व आशा बाळगून आहेत. अर्थमंत्र्यांचा अर्थसंकल्प रिअल इस्टेटच्या बाजूने असेल, अशी त्यांना आशा आहे. ज्यामध्ये विकासकांसोबत घर खरेदी करणाऱ्यांना करात सूट देण्याबरोबरच अनेक सवलतींचा समावेश असावा अशी अपेक्षा आहे.

Real Estate sector
रिअल इस्टेट क्षेत्राच्या अपेक्षा 
थोडं पण कामाचं
  • रिअल इस्टेट क्षेत्राला अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा
  • गृहकर्जावरील व्याजावरील करकपात हा महत्त्वाचा मुद्दा
  • गृहकर्जाच्या व्याजावरील कर कपातीची मर्यादा 2 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करावी अशी मागणी

Budget 2022 : नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या (Modi Government) आधीच्या अर्थसंकल्पांप्रमाणेच याही अर्थसंकल्पातून रिअल इस्टेट उद्योगाला खूप अपेक्षा आहेत. रिअल इस्टेट क्षेत्राशी (Real Estate sector) संबंधित लोक या उद्योगाला चालना मिळण्याच्या सर्व आशा बाळगून आहेत. अर्थमंत्र्यांचा अर्थसंकल्प रिअल इस्टेटच्या बाजूने असेल, अशी त्यांना आशा आहे. ज्यामध्ये विकासकांसोबत घर खरेदी करणाऱ्यांना करात सूट देण्याबरोबरच अनेक सवलतींचा समावेश असावा अशी अपेक्षा आहे. (Real Estate sector expects tax deduction limit to be increased on interest)

गृहकर्जाच्या व्याजाची मर्यादा वाढवण्याची मागणी

रिअल इस्टेट क्षेत्राला चालना देण्यासाठी या अर्थसंकल्पात गृहकर्जाच्या व्याजावरील कर कपातीची मर्यादा 2 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करावी, अशी मागणी जागतिक मालमत्ता सल्लागार असलेल्या नाइट फ्रँक इंडिया या कंपनीने केली आहे. याशिवाय मूळ रकमेवर 1.50 लाख रुपयांपर्यंत 80C सूट स्वतंत्रपणे द्यावी, अशी त्यांची मागणी आहे.

अर्थव्यवस्थेत रिअल इस्टेटचा सर्वात मोठा वाटा

नाइट फ्रँक इंडिया या रिअल इस्टेट क्षेत्राचा सर्व्हे करणाऱ्या कंपनीने असे मत व्यक्त केले आहे आहे की देशाच्या जीडीपीमध्ये रिअल इस्टेट क्षेत्राचा वाटा सर्वात जास्त आहे. या उद्योगात दुसऱ्या क्रमांकावर नोकऱ्या आहेत. रिअल इस्टेटशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे 200 हून अधिक उद्योग जोडलेले आहेत. कोरोना महामारीचा या क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला आहे. अशा स्थितीत अर्थसंकल्पाकडून या क्षेत्राच्या सुधारणेच्या अपेक्षा आहेत.

नाइट फ्रँक इंडियाने अर्थसंकल्पाकडून असलेल्या अपेक्षांविषयी आणि सूचनांविषयी म्हटले आहे की, प्राप्तिकराच्या कलम 24 अंतर्गत आत्तापर्यंत मिळणारी व्याज सवलत 2 लाख रुपयांवरून 5 लाखांपर्यंत वाढवावी. 80C अंतर्गत स्वतंत्रपणे मूळ रकमेवर 1.50 लाख रुपयांपर्यंत सूट देण्याची तरतूद असावी. असे केल्याने, परवडणाऱ्या घरांना बूस्टर डोस मिळेल.

रिअल इस्टेटची भुरळ सर्वसामान्यांबरोबरच सेलिब्रिटींनादेखील

रिअल इस्टेट किंवा प्रॉपर्टीची भुरळ फक्त सर्वसामान्यांनाच नव्हे तर सेलिब्रिटींनादेखील असते. गुंतवणुकीसाठी रिअल इस्टेटला नेहमी प्राधान्य दिले जाते. कोरोना काळात या क्षेत्राकडे अनेक सेलिब्रिटींनी आपली गुंतवणूक वळवली आहे. सुरक्षित आणि चांगला परतावा यामुळे मोठ्या शहरांमध्ये आजही या क्षेत्रात पैसा ओतला जातो. रिअल इस्टेट (Real estate) हा गुंतवणुकीचा एक लोकप्रिय पर्याय (Popular investment) आहे. अनेकजण कोणत्यातरी प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करतात. रिअल इस्टेटविषयीचे हे आकर्षण फक्त सर्वसामान्य गुंतवणुकदारांनाच नव्हे तर बॉलीवूडच्या आघाडीच्या स्टार्सनादेखील (Bollywood star) आहे. बॉलीवूड स्टार रिअर इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक करून दणकून कमाई करत आहेत. यामध्ये सलमान खान (Salman Khan), अक्षय कुमार (Akshay Kumar), ह्रतिक रोशन (Hrithik Roshan), काजोलपासून ते अमिताभ बच्चनपर्यत (Amitabh Bachchan) सर्वच कलाकारांचा समावेश आहे. अर्थसंकल्पात रिअल इस्टेटविषयी खास तरतूदी झाल्यास या क्षेत्रातील गुंतवणुकीचा ओघ वाढू शकतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी