Recession in USA, Facebook parent company Meta will fire 11 thousand employees; Silicon Valley Bank collapsed : महाशक्ती अशी ओळख मिरविणाऱ्या अमेरिकेत एका मागून एक नवे गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. आधी कोरोना पाठोपाठ आर्थिक मंदी अशा दुहेरी संकटामुळे अमेरिका अडचणीत सापडली आहे.
आतापर्यंत 33 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्येच्या अमेरिकेत 10 कोटी 56 लाख 1 हजार 470 कोरोना रुग्ण आढळले आहे. यापैकी 10 कोटी 31 लाख 28 हजार 641 जण बरे झाले. सध्या अमेरिकेत 13 लाख 24 हजार 049 कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोनामुळे अमेरिकेत 11 लाख 48 हजार 780 जणांचा मृत्यू झाला आहे. अधिकृत आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक कोरोना मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत.
कोरोनाच्या जबर तडाख्याचा परिणाम अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. मागील काही महिन्यांपासून अमेरिकेत मंदीचे वारे वाहू लागले आहेत. अमेरिकेतील अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात सुरू केली आहे. या कपातीमुळे हजारो नागरिकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. या कर्मचारी कपातीचा नवा टप्पा सुरू होत असल्याचे चित्र आहे. फेसबुक या लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची पॅरेंट कंपनी असलेल्या मेटामधून 11 हजार कर्मचारी काढले जाणार आहेत. याआधी नोव्हेंबर 2022 मध्येही मेटाने 11 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढले होते. आता पुन्हा कर्मचारी कपात होणार आहे. मेटाच्या कर्मचारी कपातीचा परिणाम माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक कंपन्यांवर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मेटाचे कर्मचारी नोकरी जाण्याच्या भीतीने त्रस्त आहेत. दुसरीकडे अमेरिकेतील बलाढ्य समजली जाणारी सिलिकॉन व्हॅली बँक (Silicon Valley Bank : SVB) बुडली आहे. जगातील अनेक स्टार्टअप कंपन्यांना कर्ज पुरवठा करून बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपनी होण्यासाठी मदत करणारी बँक बुडली आहे.
अमेरिकेतील सर्वोत्तम बँक म्हणून फोर्ब्सने सिलिकॉन व्हॅली बँकेच्या कारभाराचे कौतुक केले. या घटनेला 1 महिना होण्याच्या आतच सिलिकॉन व्हॅली बँक बुडली. याआधी ऑक्टोबर 2020 मध्ये अमेरिकेत अलमेना स्टेट बँक बुडली. अडीच वर्षात अमेरिकेत दोन मोठ्या बँका बुडल्या. यामुळे अमेरिकेच्या आर्थिक स्थितीविषयी तसेच अमेरिकेतील बँकांच्या आर्थिक कारभाराची समीक्षा करणाऱ्यांच्या विश्वासार्हतेविषयी शंका उपस्थित करण्यास सुरुवात झाली आहे.
याआधी 2008 मध्ये 'लेहमन ब्रदर्स'ने दिवाळखोरी जाहीर केली होती. यानंतर अमेरिकेसह संपूर्ण जगात आर्थिक मंदीची लाट आली होती. आता पुन्हा एकदा मंदी येणार का यावरून तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
Rangpanchami : रंगपंचमी या सणाविषयी हे माहिती आहे का?
Yashwantrao Chavhan Speech : यशवंतराव चव्हाण जयंती निमित्त करा हे मराठी भाषण