LPG Price: घरगुती सिलेंडरच्या दरात पुन्हा विक्रमी वाढ; सर्वसामान्यांना बसला मोठा झटका 

काम-धंदा
Updated May 07, 2022 | 09:11 IST | टाइम्स नाऊ मराठी

Domestic LPG Price Increases । सर्वसामान्य जनतेला शनिवारची म्हणजे आजची सकाळ एक झटका देणारी ठरली आहे. कारण घरगुती सिलेंडरच्या (LPG) किंमतींमध्ये ५० रूपयांची मोठी वाढ झाली आहे. घरगुती एलपीजीच्या वाढलेल्या किमती आजपासून देशभरात लागू झाल्या आहेत.

 Record increase in domestic cylinder price by Rs 50 again
घरगुती सिलेंडरच्या दरात पुन्हा विक्रमी वाढ  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सर्वसामान्य जनतेला शनिवारची म्हणजे आजची सकाळ एक झटका देणारी ठरली आहे.
  • घरगुती सिलेंडरच्या किंमतींमध्ये ५० रूपयांची मोठी वाढ झाली आहे
  • दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत ९९९.५० रूपयांवर गेली आहे.

Domestic LPG Price Increases । मुंबई : सर्वसामान्य जनतेला शनिवारची म्हणजे आजची सकाळ एक झटका देणारी ठरली आहे. कारण घरगुती सिलेंडरच्या (LPG) किंमतींमध्ये ५० रूपयांची मोठी वाढ झाली आहे. घरगुती एलपीजीच्या वाढलेल्या किमती आजपासून देशभरात लागू झाल्या आहेत. आता दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत ९९९.५० रूपयांवर गेली आहे. (Record increase in domestic cylinder price by Rs 50 again). 

अधिक वाचा : भारतीय संघात चौथ्या क्रमांकासाठी हे खेळाडू प्रमुख दावेदार

५० रूपयांनी झाली विक्रमी वाढ

दरम्यान, याआधी २२ मार्च रोजी घरगुती एलपीजीची किंमत प्रति सिलेंडर ५० रूपयांनी वाढवण्यात आली होती. त्यानंतर दिल्लीतील अनुदानित १४.२ किलो एलपीजी सिलेंडरची किंमत ९४९.५० रूपयांवर पोहचली आहे. 

पेट्रोलियम उद्योगाच्या प्राथमिक आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये एलपीजीचा वापर महिन्याच्या आधारावर ९.१ टक्क्यांनी घसरून २२ लाख टन एवढा राहिला आहे, हा दर एप्रिल २०२१ च्या तुलनेत ५.१ टक्क्यांनी वाढला आहे. मार्चपूर्वी घरगुती एलपीजीच्या किमतीत मागील वर्षी ६ ऑक्टोबरला बदल करण्यात आला होता. 

LPG  सिलेंडर १०२.५० रूपयांनी महागला

लक्षणीय बाब म्हणजे अलीकडेच सरकारी तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीतही वाढ केली होती. व्यावसायिक एलपीजी सिलेंडर १०२.५० रूपयांनी महागला आहे. नवी किंमत लागू झाल्यानंतर दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत १ मे पासून २२५३ रूपयांवरून २३५५.५० रूपयांपर्यंत वाढली आहे. 

तर १ मे रोजी जेट इंधनही महागले होते. दिल्लीत एअर टर्बाइन इंधनाची किंमत ११६८५१.४६ रुपये प्रति किलोलीटर झाली आहे. यापूर्वी १६ एप्रिल रोजी एटीएफच्या किमतीत वाढ करण्यात आली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी