YCMOU Recruitment : यशवंतराव चव्हाण विद्यापीठात...२ लाखांपर्यतचा पगार, पाहा नोकरभरती

Job Opportunity : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात अधिकारीपदाची जागा भरली जाणार आहे. ही जागा वित्त अधिकारी या पदाची आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने यासाठी वेबसाइटवर माहिती दिली आहे. पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयाची अट, कामाचा अनुभव, अर्जाची अंतिम मुदत या गोष्टींची माहिती वेबसाइटवर देण्यात आली आहे.

YCMOU Recruitment
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नोकरभरती 
थोडं पण कामाचं
  • यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात नोकरीची संधी
  • वित्त अधिकारीपदासाठी नोकरभरती
  • २ लाखांपर्यतचे वेतन, निवृत्तीनंतरचे लाभ मिळणार

Job Opportunity : मुंबई : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात अधिकारीपदाची जागा (YCMOU Recruitment)भरली जाणार आहे. ही जागा वित्त अधिकारी या पदाची आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने यासाठी वेबसाइटवर माहिती दिली आहे. पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयाची अट, कामाचा अनुभव, अर्जाची अंतिम मुदत या गोष्टींची माहिती वेबसाइटवर देण्यात आली आहे. इच्छूक उमेदवारांकडून या पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. (Recruitment at YCMOU with salary upto Rs 2 lakh)

वित्त अधिकारी पदासाठी भरती

यशंवतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात वित्त अधिकारी पदासाठी अर्ज करताना पदव्युत्तर पदवीमध्ये म्हणजे मास्टर डिग्रीमध्ये ५५ टक्के गुण असणे आवश्यक आहे. उमेदवारांकडे असिंस्ट मॅनेजर या पदावर काम केल्याचा किमान १५ वर्षांचा अनुभव असला पाहिजे. याशिवाय उमेदवाराकडे शिक्षण संस्थेत किंवा संशोधन संस्थेत काम केल्याचा अनुभव हवा. वित्त अधिकारी या पदासाठी वयाची अट किमान ४५ वर्षे ही आहे. 

सेवानिवृत्तीनंतरचे फायदे मिळणार

या पदाचा कार्यकाळ ५ वर्षांचा असणार आहे. त्यानंतर सदर उमेदवाराला सरकारी नियमानुसार आणि विद्यापीठाच्या नियमानुसार निवृत्तीनंतरचे लाभ दिले जाणार आहेत. या पदासाठीचे वेतनदेखील खूप आकर्षक असून १,३१,००० रुपयांपासून ते २,१६,००० रुपयांपर्यतचे वेतन मिळणार आहे. या पदासाठी सातव्या वेतन आयोगाप्रमाणेच वेतन दिले जाणार आहे. या पदासाठी आरक्षणदेखील लागू असणार आहे. आरक्षण वर्गातील उमेदवारांना नियमानुसार सवलत मिळेल. 

यशंवतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि प्रथितयश मुक्त विद्यापीठ असून या विद्यापीठातून हजारो विद्यार्थी पदव्या घेत असतात. विद्यापीठातील नोकरभरतीविषयी आणि त्याच्याशी निगडीत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी विद्यापीठाच्या वेबसाइटवर व्हिजिट करा.

अर्ज ऑफलाइन करावा लागणार

या पदासाठी ऑफलाइन स्वरुपात अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करताना फायनान्स ऑफिसर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, ज्ञानगंगोत्री, गोवर्धन, गंगापूर डिमजवळ, नाशिक- ४२२ २२२ या पत्त्यावर अर्ज पाठवयाचा आहे. खुल्या प्रवर्गासाठी ५०० रुपये आणि राखीव वर्गासाठी २५० रुपये शुल्क अर्जासोबत भरायचे आहे. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २० जानेवारी २०२२  ही आहे. अर्जातील त्रुटीमुळे अर्ज बाद होऊ शकतो त्यामुळे याची खबरदारी उमेदवारांनी घ्यायची आहे.

यशंवतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील ही संधी पात्र उमेदवारांसाठी अतिशय चांगली संधी आहे. यात चांगल्या वेतनाबरोबरच सेवानिवत्तीनंतरचेदेखील फायदे मिळणार आहेत. सातव्या वेतन आयोगाचे लाभ निवड झालेल्या उमेदवाराला मिळणार आहेत. खुल्या आणि आरक्षित प्रवर्गासाठी ही संधी आहे. या पदासाठीचे वेतन १,३१,००० रुपयांपासून ते २,१६,००० रुपयांपर्यत असणार आहे. या पदासाठी सातव्या वेतन आयोगाप्रमाणेच वेतन दिले जाणार आहे. या पदासाठी आरक्षणदेखील लागू असणार आहे. आरक्षण वर्गातील उमेदवारांना नियमानुसार सवलत मिळेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी