Petrol-diesel price reduction : इंधनावरील उत्पादन शुल्क 5 ते 10 रुपयांनी कमी केल्यानं , केंद्राचं होणार 1 लाख कोटींचे नुकसान

काम-धंदा
भरत जाधव
Updated Nov 04, 2021 | 16:03 IST

Petrol-diesel price reduction  : सरकारने पेट्रोलच्या दरात 5 रुपये आणि डिझेलच्या दरात 10 रुपये उत्पादन शुल्क कर (Petrol-Diesel Excise Duty Cut) कमी केला. कपात केल्यामुळे सरकारच्या महसुलात दरमहा 8,700 कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. 

Reducing excise duty on fuel by Rs 5 to 10 will cost the Center Rs 1 lakh crore
केंद्राचं होणार 1 लाख कोटींचे नुकसान  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • सरकारने पेट्रोलच्या दरात 5 रुपये आणि डिझेलच्या दरात 10 रुपये उत्पादन शुल्क कर (Petrol-Diesel Excise Duty Cut) कमी केला.
  • कपात केल्यामुळे सरकारच्या महसुलात दरमहा 8,700 कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे.

Petrol-diesel price reduction  : नवी दिल्ली :   सरकारने पेट्रोलच्या दरात 5 रुपये आणि डिझेलच्या दरात 10 रुपये उत्पादन शुल्क कर (Petrol-Diesel Excise Duty Cut) कमी केला. कपात केल्यामुळे सरकारच्या महसुलात दरमहा 8,700 कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. 

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol diesel price) दरात भरमसाठ वाढ झाली आहे. पण आता ऐन दिवाळीच्या (diwali 2021) मुहुर्तावर अखेर मोदी सरकारने (modi government decision on petrol diesel excise duty) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काहीशी

 कपात करून सर्वसामान्यांना दिलासा दिला. 

केंद्र सरकारच्या निर्णयानंतर अनेक राजकीय नेत्यांनी स्वागत केलं शिवाय टीकाही केली आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी म्हमाल्या की, भाजपने भीतीपोटी हे दर कमी केले. तर राज्यातील भाजपची सध्या सर्वात कट्टर विरोध असलेल्या शिवसेनेनेही केंद्रावर टीका केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, सरकारने आधी पन्नास ते शंभर रुपये वाढवली आता पाच रुपये कमी केली. 
मात्र भाजपचे नेत्यांनी केंद्राच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. अर्थ मंत्रालयाने सांगितले की, भारत सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्कातील कपात 4 नोव्हेंबर 2021 पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतील. उत्पादन शुल्कातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कपात आहे.

सरकारने पेट्रोलच्या दरात 5 रुपये आणि डिझेलच्या दरात 10 रुपये उत्पादन शुल्क कर (Petrol-Diesel Excise Duty Cut) कमी केला आहे.  सामान्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार असला तरीही केंद्र सरकारच्या तिजोरीवर यामुळे मोठा भार पडणार आहे. दरमहा 8,700 कोटी रुपयांचे महसुलाचे नुकसान होणार एप्रिल-ऑक्टोबरमधील वापराच्या आकडेवारीवर आधारित, उत्पादन शुल्कात कपात केल्यामुळे सरकारच्या महसुलात दरमहा 8,700 कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. ऑइल इंडस्ट्रीशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वार्षिक आधारावर साधारण 1 लाख कोटी रुपयांहून अधिकचा परिणाम होईल.

केंद्राच्या महसुलावर चालू आर्थिक वर्षाच्या उर्वरित कालावधीसाठी 43,500 कोटी रुपयांचा परिणाम होईल. दरम्यान उत्पादन शुल्कातील कपात आज 4 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे दिल्लीतील पेट्रोलची किंमत सध्याच्या 110.04 रुपये प्रति लीटरवरून 105.04 रुपये प्रति लीटरवर खाली येईल, तर डिझेलची किंमत (Diesel Price Today) प्रति लीटर 98.42 रुपयांवरून 88.42 रुपये प्रति लीटरवर येईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी