Rekha Jhunjhunwala: रेखा झुनझुनवाला यांनी 'या' स्मॉलकॅप फार्मा स्टॉक्समध्ये गुंतवणूक करताच स्टॉक्सचा भाव वधारला

Rekha Jhunjhunwala portfolio: रेखा झुनझुनवाला यांनी स्मॉलकॅप स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.

Rekha Jhunjhunwala buys stocks in this smallcap company read details in marathi
Rekha Jhunjhunwala: रेखा झुनझुनवाला यांनी 'या' स्मॉलकॅप फार्मा स्टॉक्समध्ये गुंतवणूक करताच स्टॉक्सचा भाव वधारला 
थोडं पण कामाचं
  • रेखा झुनझुनवाला यांनी स्मॉलकॅप फार्मा कंपनीत केली गुंतवणूक
  • जाणून घ्या रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओत कोणत्या स्टॉक्सची पडली भर

Rekha Jhunjhunwala portfolio updates: भारतातील दिवंगत गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी स्मॉलकॅप फार्मा कंपनीत गुंतवणूक केली आहे. रेखा झुनझुनवाला यांनी डिसेंबर तिमाहीत सनफार्मा अ‍ॅडव्हान्स रिसर्च कंपनीत शेअर्स खरेदी केली आहे. (Rekha Jhunjhunwala buys shares in Sun Pharma Advanced Research Company)

कंपनीकडून देण्यात आलेल्या शेअर होल्डिंग बाबतच्या माहितीनुसार, डिसेंबर तिमाहीच्या अखेरीस रेखा झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे 62,92,134 इक्विटी शेअर्स होते. इतके शेअर्स म्हणजे कंपनीच्या एकूण शेअर्सच्या तुलनेत 1.94 टक्के हिस्सा आहे.

हे पण वाचा : जेवणासोबत कच्चा कांदा खाण्याचे फायदे

नुकतेच कंपनीकडून शेअर होल्डिंगच्या संदर्भात देण्यात आलेल्या माहितीनुसार, रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 21 कंपन्यांची पब्लिक होल्डिंग आहे. याची एकूण वॅल्यू अंदाजे 20097.7 कोटी रुपयांच्या आसपास आहे.

हे पण वाचा : हिवाळ्यात प्या गुळाचा चहा अन् जादू पहा

डिसेंबर तिमाहीत त्यांनी जियोजित फायनान्शिअल Geojit Financial, एप्टेक Aptech, कॅनरा बँक Canara Bank आणि एनसीसी NCC मध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांच्या पोर्टफोलिओत सिंगर इंडिया (Singer India), अ‍ॅग्रो टेक फूड्स (Agro Tech Foods), क्रिसिल Crisil, डीबी रिअ‍ॅलिटी DB Realty, ज्युबिलंट Jubilant Pharmova, स्टार हेल्थ Star Health आणिJubilant Ingrevia यांचा समावेश आहे.

हे पण वाचा : शिळे अन्न खाल्ल्यावर काय होते?

सनफार्मा अ‍ॅडव्हान्स रिसर्च कंपनी हा अंडरपरफॉर्मर स्टॉक आहे. गेल्या एका वर्षभरात या स्टॉकमध्ये तब्बल 35 टक्क्यांनी घसरण झाली आहे. गेल्या सहा महिन्यांत या स्टॉकने पाच टक्के निगेटिव्ह रिटर्न्स दिले आहेत.

मंगळवारी स्टॉकमध्ये तेजी

सन फार्मा अ‍ॅडव्हान्स रिसर्च कंपनी लिमिटेड स्टॉकमध्ये मंगळवारी तेजी पहायला मिळाली. मंगळवारी कंपनीच्या स्टॉकमध्ये 1.21 टक्क्यांनी वाढ झाली. या वाढीमुळे कंपनीचा स्टॉक 208.65 रुपयांपर्यंत पोहोचला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी