Reliance AGM: मुकेश अंबानी यांची सून श्लोकाच्या शेजारी बसलेली मुलगी आहे तरी कोण?

काम-धंदा
Updated Aug 13, 2019 | 20:49 IST | सुनिल देसले

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४२वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मुंबईत पार पडली. यावेळी मुकेश अंबानी यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. या एजीएममध्ये एक खास पाहुणी उपस्थित होती. ही पाहुणी आहे तरी कोण? जाणून घ्या...

Who is Radhika Merchant
कोण आहे ही खास पाहुणी?  |  फोटो सौजन्य: YouTube

थोडं पण कामाचं

  • रिलायन्स एजीएममध्ये मुकेश अंबानींनी केल्या मोठ्या घोषणा
  • रिलायन्स एजीएममध्ये मुकेश अंबानी यांच्या घरातील सर्व सदस्यांची उपस्थिती
  • रिलायन्स एजीएममध्ये आलेली खास पाहुणी कोण?

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीजची ४२वी वार्षिक सर्वसाधारण सभा मुंबईत पार पडली. या बैठीक रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. जिओ फायबर योजना, जिओ सेट टॉप बॉक्स, मोफत एलईडी टीव्ही यासारख्या घोषणा केल्या. मुकेश अंबानी यांनी केलेल्या या घोषणेनंतर मंगळवारी रिलायन्सच्या शेअर्समध्ये मोठी तेजी पहायला मिळाली. रिलायन्सच्या शेअर्समध्ये गेल्या दहा वर्षातील सर्वाधिक तेजी पहायला मिळाली.

radhika merchant

रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानी यांचा संपूर्ण परिवार उपस्थित होता. यामध्ये मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी, आई कोकिलाबेन अंबानी, मुलगा आकाश अंबानी आणि सून श्लोका अंबानी सुद्धा उपस्थित होत्या. मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी आणि अनंत अंबानी सुद्धा एजीएममध्ये उपस्थित होत्या. यासोबतच रिलायन्स एजीएमच्या बैठकीत एक खास पाहुणी सुद्धा उपस्थित होती. ही पाहुणी मुकेश अंबानी यांची सून श्लोका अंबानीच्या शेजारी बसली होती.

राधिका मर्चेंट असं या खास पाहुणीचं नाव आहे. राधिका मर्चेंट इनकोर हेल्थकेअरचे सीईओ आणि वाइस चेअरमन वीरेन मर्चेंट यांची मुलगी आहे. राधिकाने आपलं शालेय शिक्षण मुंबईतील केथेड्रल आणि जॉन कोनेन स्कूलमधऊन पूर्ण केलं आहे.

radhika merchant

राधिका मर्चेंच हिने आयबी डिप्लोमा बीडी सोमानी इंटरनॅशनल स्कूलमधून पूर्ण केला आहे. तर आपलं ग्रॅज्युएशन पॉलिटिक्स आणि इकोनॉमिक्समध्ये न्यूयॉर्क यूनिव्हर्सिटीमधून पूर्ण केलं आहे. अंबानी परिवाराच्या प्रत्येक मोठ्या समारोहात राधिकाची उपस्थिती पहायला मिळते. रिपोर्ट्सनुसार, राधिकाचं वयं २४ वर्षे आहे. राधिकाचा जन्म १८ डिसेंबर १९९४ मध्ये झाला आहे.

akash and isha ambani

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४२व्या एजीएममध्ये अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. रिलायन्सने सौदीमधील आरामको कंपनीसोबत करार केला आहे. या करारा अंतर्गत आरामको रिलायन्समध्ये ५.३ लाख कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. यासोबतच या एजीएममध्ये जिओ फायबर वेलकम ऑफरची सुद्धा घोषणा करण्यात आली. या योजनेची घोषणा कंपनीने गेल्यावर्षी आपल्या एजीएममध्ये केली होती.

जिओ फायबरची सेवा ४ सप्टेंबरपासून मिळण्यास सुरूवात होणार आहे. यासोबतच जिओ फर्स्ट डे फर्स्ट शो नावाने नवी सेवा २०२० मध्ये सुरू करणार आहे. ज्या अंतर्गत युजर्सला मोठ्या पडद्यावर रिलीज होणारा सिनेमा घर बसल्या पाहता येणार आहे. मुकेश अंबानी यांनी घोषणा केली की त्यांची कंपनी पुढील १८ महिन्यांत कर्जमुक्त होईल. सोबतच रिलायन्स इंडस्ट्रीज पुढील पाच वर्षांत रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेल यांना लिस्ट करेल.

जिओ फायबरचा वार्षिक प्लान खरेदी केल्यास ग्राहकांना एचडी किंवा फोर के एलईडी टीव्ही मोफत मिळणार आहे. तसेच या ग्राहकांना फोर के सेट टॉप बॉक्स देखील फ्री मिळणार आहे. जिओ फायबरमध्ये ग्राहकांना एक लँडलाइन फोन कनेक्शन दिलं जाणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
Reliance AGM: मुकेश अंबानी यांची सून श्लोकाच्या शेजारी बसलेली मुलगी आहे तरी कोण? Description: रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४२वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मुंबईत पार पडली. यावेळी मुकेश अंबानी यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. या एजीएममध्ये एक खास पाहुणी उपस्थित होती. ही पाहुणी आहे तरी कोण? जाणून घ्या...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...