Reliance Industries Largest Taxpayer : मुंबई : आज रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारण सभा (Reliance AGM 2022) झाली. रिलायन्सची ही 45 व्या वार्षिक सर्वसाधारण सभा होती. या प्रसंगी रिलायन्सचे चेअरमन आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आणि कंपनीच्या कामगिरीचा आढावा घेतला. रिलायन्स (Reliance Industries)ही भारतातील सर्वात मोठी करदाता आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात राष्ट्रीय तिजोरीत कंपनीकडून कररुपाने दिले जाणारे योगदान 39% वाढून ते तब्बल 1,88,012 कोटी रुपयांवर पोचले आहे. विशेष म्हणजे, 2021-22 या आर्थिक वर्षात 100 अब्ज डॉलरपेक्षा जास्त वार्षिक कमाई करणारी रिलायन्स ही पहिली भारतीय कंपनी ठरली. (Reliance Industries is the largest taxpayer of India, paid Rs 1,88,012 taxes in FY22)
याशिवाय मुकेश अंबानी पुढे म्हणाले, रिलायन्स जिओचे उच्च-गुणवत्तेचे, निरर्थक आणि नेहमीच उपलब्ध असणारे फायबर-ऑप्टिक नेटवर्क हे भारताच्या कानाकोपऱ्यातून डेटा ट्रॅफिकचा कणा आहे. जिओचे सर्व भारत उपलब्ध असलेले फायबर-ऑप्टिक नेटवर्क 11 लाख किमी लांबीचे आहे. या नेटवर्कची लांबी पुथ्वीभोवती 27 वेळा चक्कर मारल्यावर होणाऱ्या अंतराएवढी आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 45 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आपल्या मुख्य भाषणादरम्यान, मुकेश अंबानी म्हणाले की त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये 320,000 नोकऱ्या निर्माण केल्या आहेत आणि ते भारतातील सर्वात मोठ्या रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांपैकी एक बनले आहेत.
अधिक वाचा : Ganesh Chaturthi 2022: मस्तकहीन गणेशाची केली जाते पूजा, केदारनाथजवळ आहे हे रहस्यमय बाप्पाचे मंदिर
अब्जाधीश मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या भागधारकांना सांगितले की ते पुढील वर्षी कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रिलायन्स रिटेल आणि रिलायन्स जिओच्या नियोजित आयपीओसंदर्भात (IPO)माहिती देतील. वास्तविक भागधारक, गुंतवणुकदार आणि सर्वत्र अशी चर्चा होत होती की याच वार्षिक सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानी जिओ आणि रिलायन्स रिटेलच्या आयपीओची घोषणा करतील. भागधारकांच्या प्रश्नांना उत्तर देताना मुकेश अंबानी म्हणाले, “जिओ आणि रिटेलसाठीच्या आयपीओवरील मुद्द्यावर मी आमच्या संचालक मंडळासोबत तुमची मते जाणून घेईन. आयपीओ कधी येणार आणि त्याचे मूल्य किती असणार हे निश्चित आहे. मी दोन्ही व्यवसायांच्या योजनांची रूपरेषा दिली आहे. जिओ आमच्या 5G सेवेला आक्रमकपणे पुढे नेत आहे आणि रिटेल वेगाने वाढीच्या मार्गावर आहे. मी पुढील वर्षी या दोन्ही कंपन्यांच्या आयपीओबद्दलची माहिती तुम्हाला देईल.
अधिक वाचा : Hair Care Tips : केसांना तेल कधी लावायचे हे माहित आहे का? चुकीच्या वेळी लावल्याने गळतात केस
रिलायन्स जिओ पुढील दोन महिन्यात म्हणजे दिवाळीपर्यत जगातील सर्वात मोठी 5G सेवा (Jio 5G) सुरू करणार आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio)येत्या दोन महिन्यांत मेट्रो शहरांमध्ये आपल्या ग्राहकांसाठी 'जगातील सर्वात मोठी' 'स्टँडअलोन' 5G' सेवा सुरू करेल, अशी घोषणा रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी आज रिलायन्स 45 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली.