Reliance Market Cap | रिलायन्स इंडस्ट्रीजचे मोठे नुकसान, शेअर बाजारात बुडाले 68,404 कोटी रुपये

Reliance Industries : जागतिक शेअर बाजारात (Share Market) मंदीचेच वातावरण राहिल्यामुळे देशातील शेअर बाजारात शेअर्स विक्रीचा दबाव होता. शेअर बाजारातील जोरदार घसरणीमुळे रिलायन्स इंडस्ट्रीजचा (Reliance Industries Share Price) समभाग चार टक्क्यांनी घसरला. मात्र, दिवसभराच्या व्यवहारात सेन्सेक्सच्या (Sensex)या सर्वात मोठ्या कंपनीचा समभाग एकावेळी एक टक्क्यांपर्यंत चढला होता. नंतर रिलायन्सच्या शेअरच्या किंमतीत (Reliance Share price) घसरण झाली.

Reliance Market Cap fall
रिलायन्सने गमावले 68,404 कोटी रुपये  
थोडं पण कामाचं
  • शेअर बाजारातील घसरणीचा रिलायन्सला मोठा फटका
  • मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य 68,404 कोटी रुपयांनी घसरले
  • राष्ट्रीय शेअर बाजारात कंपनीचा शेअर 3.95 टक्क्यांनी घसरून 2,379.90 रुपयांवर बंद झाला

Reliance Share Price update : मुंबई : सोमवारी जागतिक शेअर बाजारात (Share Market) मंदीचेच वातावरण राहिल्यामुळे देशातील शेअर बाजारात शेअर्स विक्रीचा दबाव होता. शेअर बाजारातील जोरदार घसरणीमुळे रिलायन्स इंडस्ट्रीजचा (Reliance Industries Share Price) समभाग चार टक्क्यांनी घसरला. मात्र, दिवसभराच्या व्यवहारात सेन्सेक्सच्या (Sensex)या सर्वात मोठ्या कंपनीचा समभाग एकावेळी एक टक्क्यांपर्यंत चढला होता. नंतर रिलायन्सच्या शेअरच्या किंमतीत (Reliance Share price) घसरण झाली. ऑक्टोबर-डिसेंबर 2021 या तिमाहीत रिलायन्सने दमदार कामगिरी केली आहे. कंपनीची ही आतापर्यतची सर्वोत्तम तिमाही कामगिरी आहे. (Reliance Industries losses market cap of Rs 68,404 crore in share market crash)

रिलायन्सच्या शेअरच्या किंमतीत ४ टक्क्यांची घसरण   

मुंबई शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यापारात कंपनीचा शेअर 1.04 टक्क्यांनी वाढून 2,504.10 रुपयांवर पोहोचला. तथापि, नंतर तो प्रारंभिक नफा गमावला. शेवटी, रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर मुंबई शेअर बाजारात 4.06 टक्क्यांच्या तोट्यासह 2,377.55 रुपयांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारात कंपनीचा शेअर 3.95 टक्क्यांनी घसरून 2,379.90 रुपयांवर बंद झाला. दिवसभराच्या व्यवहारादरम्यान तो 1.08 टक्क्यांच्या वाढीसह 2,504.75 रुपयांवर गेला होता.
     
मुंबई शेअर बाजारावर कंपनीचे बाजार भांडवल 68,404.59 रुपयांनी घसरून 16,08,275.41 कोटी रुपये झाले. सोमवारी बीएसईचा ३० शेअर्स असलेला सेन्सेक्स १,५४५.६७ अंकांनी किंवा २.६२ टक्क्यांनी घसरून ५७,४९१.५१ अंकांवर बंद झाला.

मुंबई शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य 17 जानेवारी रोजी 280.02 लाख कोटी रुपयांवरून 19.52 लाख कोटी रुपयांनी घसरून 260.50 लाख कोटी रुपयांवर आले. बाजार निरीक्षकांचे असे मत आहे की नकारात्मक जागतिक घटक, परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी शेअर्सची केलेली प्रचंड विक्री ( FIIs) आणि यूएस फेडरल रिझर्व्हच्या कडक धोरणाच्या भीतीने जगभरातील जोखमीच्या गुंतवणूक पर्यायांवर मोठा परिणाम होत भारतातील शेअर बाजार गडगडला आणि कोसळला.

शेअऱ बाजाराची घसरगुंडी

शेअर बाजारात (Share Market Fall) पाच दिवसांच्या घसरणीत गुंतवणूकदारांनी सुमारे 20 लाख कोटी रुपयांची संपत्ती गमावली. या पाच सत्रांमध्ये मुंबई शेअर बाजाराचा (BSE)निर्देशांक असलेला सेन्सेक्स (Sensex)सोमवारी 3,817 अंशांनी गडगडत 57,500 अंशांच्या पातळीवर पोहोचला. निर्देशांक 17 जानेवारीच्या 61,308.91 अंशांच्या पातळीवरून 24 जानेवारी रोजी 6.23 टक्क्यांनी घसरून 57,491.51 अंशावर आला. त्याचप्रमाणे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा असलेला निफ्टीदेखील (Nifty)याच कालावधीत 6.33 टक्क्यांनी घसरून 17,149.10 अशांच्या पातळीवर आला. आज सेन्सेक्समध्ये 1,545.67 अंशांची घसरण होत तो 57,491.51 अंशांच्या पातळीवर आला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी आज 468.05 नी कोसळून 17,149.10 अंशांच्या पातळीवर आला.

क्रिप्टोकरन्सीमध्येही मोठी घसरण

शेअर बाजाराबरोबरच क्रिप्टोकरन्सीमध्येदेखील जबरदस्त घसरण झाली आहे. युक्रेनवर रशियन हल्ल्याच्या (Ukraine conflict) भीतीने जगभरातील जोखमीच्या गुंतवणूक प्रकारातील विक्री वाढल्याने बिटकॉइन (Bitcoin) सोमवारी जवळपास 9% घसरून सहा महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळीवर आहे. जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी असणारे बिटकॉइन 8.8% घसरून 33,058 डॉलरच्या (Bitcoin price) पातळीवर व्यवहार करत होती. बिटकॉइनचे हे 23 जुलै नंतरचे सर्वात कमी मूल्य आहे. नोव्हेंबरमध्ये 69,000 डॉलरच्या सार्वकालिक उच्चांकावरून बिटकॉइन आतापर्यत 50% पर्यंत खाली आले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी