Green Energy | अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज करणार गुजरातमध्ये ग्रीन एनर्जीच्या प्रकल्पांमध्ये ५.९५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक

Vibrant Gujarat : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (Reliance Industries) पुढील १० ते १५ वर्षांमध्ये गुजरातमध्ये हरित ऊर्जा (Green Energy) आणि इतर प्रकल्पांमध्ये ५.९५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने गुरुवारी एका निवेदनात सांगितले की, कंपनी राज्यात एक लाख मेगावॅट अक्षय ऊर्जा प्रकल्प आणि ग्रीन हायड्रोजन इकोसिस्टमच्या (Green Hydrogen Ecosystem) विकासासाठी ५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

Reliance Industries in Green Energy projects
रिलायन्सची ग्रीन एनर्जीत मोठी गुंतवणूक योजना 
थोडं पण कामाचं
  • पुढील १० ते १५ वर्षांमध्ये गुजरातमध्ये हरित ऊर्जा प्रकल्पांमध्ये मोठी गुंतवणूक
  • रिलायन्स करणार ५.९५ लाख कोटींची गुंतवणूक
  • कारखाने उभारण्यासाठी ६०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक

Reliance Industries : नवी दिल्ली : सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी  (Mukesh Ambani)यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (Reliance Industries) पुढील १० ते १५ वर्षांमध्ये गुजरातमध्ये हरित ऊर्जा (Green Energy) आणि इतर प्रकल्पांमध्ये ५.९५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने गुरुवारी एका निवेदनात सांगितले की, कंपनी राज्यात एक लाख मेगावॅट अक्षय ऊर्जा प्रकल्प आणि ग्रीन हायड्रोजन इकोसिस्टमच्या (Green Hydrogen Ecosystem) विकासासाठी ५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. याशिवाय, कंपनी सौर फोटोव्होल्टेइक मॉड्यूल्स, हायड्रोजन उत्पादनासाठी इलेक्ट्रोलायझर, ऊर्जा साठवण बॅटरी आणि इंधन निर्मितीसाठी कारखाने उभारण्यासाठी ६०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यासोबतच येत्या तीन ते पाच वर्षांत २५,००० कोटी रुपये विद्यमान प्रकल्प आणि नवीन उपक्रमांमध्ये गुंतवले जातील. (Reliance Industries to invest Rs 5.9 lakhs in Green Energy projects in Gujarat)

याशिवाय, रिलायन्सने जिओचे (Reliance Jio)स्वतःचे टेलिकॉम नेटवर्क 5G मध्ये रूपांतरित करण्यासाठी तीन ते पाच वर्षांत ७,५०० कोटी रुपये आणि पुढील पाच वर्षांत रिलायन्स रिटेलमध्ये ३,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

व्हायब्रंट गुजरात परिषदेत करार  (Vibrant Gujarat)

व्हायब्रंट गुजरात समिट २०२२ च्या कार्यक्रमादरम्यान, RIL ने गुरुवारी गुजरात सरकारसोबत एकूण ५.९५ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. या प्रकल्पांमुळे राज्यात सुमारे दहा लाख रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. कंपनीने गुजरात सरकारशी सल्लामसलत करून कच्छ, बनासकांठा आणि धोलेरा येथे १,००,००० मेगावॅट क्षमतेच्या अक्षय ऊर्जा प्रकल्पांसाठी जमीन शोधण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. कंपनीने कच्छमध्ये ४.५ लाख एकर जमिनीची मागणी केली आहे.

रिलायन्सकडून ५ अब्ज डॉलरच्या भांडवलाची उभारणी

अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने शनिवारी सांगितले की ते परकीय चलन-आधारित बाँडद्वारे ५ अब्ज डॉलर पर्यंत उभारेल आणि विद्यमान कर्जाची परतफेड करण्यासाठी त्याचा वापर करेल. कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला सांगितले की तिच्या बोर्डाच्या वित्त समितीने शनिवारी झालेल्या बैठकीत वरिष्ठ असुरक्षित यूएस डॉलर निश्चित दर पत्रे नियमित अंतराने एक किंवा अधिक टप्प्यात जारी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली, एकूण रक्कम ५ अब्ज डॉलरची असेल.

त्याच वेळी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने गेल्या आठवड्यात घोषणा केली की त्यांनी तीन टप्प्यांत यूएस डॉलर बाँड जारी करून ४ अब्ज डॉलरची रक्कम उभारली आहे. भारताकडून आतापर्यंतचा हा सर्वात मोठा विदेशी चलन रोखे जारी करण्यात आला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, नोट्स तीन वेळा ओव्हर-सबस्क्राइब झाल्या होत्या, टॉप टियरने एकूण ११.५ अब्ज डॉलर्स घेतले होते. समूहाने १० वर्षांच्या टप्प्यात १.५ अब्ज डॉलर उभे केले आहेत. तर, ३० वर्षांच्या करारात १.७५ अब्ज डॉलर आणि ४० वर्षांच्या करारात ७५ कोटी डॉलर जमा केले आहेत.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी