Jio Offer | जिओचा स्वस्त आणि जबरदस्त प्लॅन, ८४ दिवस रोज ३ जीबी डेटासह Disney+ Hotstar मोफत

Jio plan | जिओ (Reliance Jio) आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या व्हॅलिडिटी आणि डेटा (Data)लिमिटचे प्लॅन बाजारात आणत असते. कमी डेटा वापरणाऱ्या ग्राहकांसाठी रिलायन्स जिओकडे अनेक प्लॅन (Jio Plans) उपलब्ध आहेत. जर तुम्हाला दररोज २ जीबी किंवा ३ जीबी डेटाची गरज असेल तर यासाठीचे जबरदस्त प्लॅन जाणून घ्या. या प्लॅन्समध्ये ग्राहकांसाठी हाय स्पीड डेटा, अनलिमिटेड कॉलिंगसोबत असंख्य सुविधा दिल्या जातात.

Jio cheapest offer
जिओचे स्वस्त प्लॅन 
थोडं पण कामाचं
  • रिलायन्स जिओचे स्वस्त आणि मस्त प्लॅन
  • हाय स्पीड डेटा, अनलिमिटेड कॉलिंगसोबत असंख्य सुविधा
  • जिओ अॅप्सचे आणि डिस्ने + हॉटस्टारचे सब्स्क्रिप्शनदेखील मोफत

Reliance Jio Cheapest plan | नवी दिल्ली : रिलायन्स जिओ (Reliance Jio) आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या व्हॅलिडिटी आणि डेटा (Data)लिमिटचे प्लॅन बाजारात आणत असते. कमी डेटा वापरणाऱ्या ग्राहकांसाठी रिलायन्स जिओकडे अनेक प्लॅन (Jio Plans) उपलब्ध आहेत. जर तुम्हाला दररोज २ जीबी किंवा ३ जीबी डेटाची गरज असेल तर यासाठीचे जबरदस्त प्लॅन जाणून घ्या. या प्लॅन्समध्ये ग्राहकांसाठी हाय स्पीड डेटा, अनलिमिटेड कॉलिंगसोबत असंख्य सुविधा दिल्या जातात. पाहूया जिओचे प्लॅन्स. (Reliance Jio is offering 3 GB data for 84 days with free Disney+ Hotstar)

रिलायन्स जिओचा ४१९चा रुपयांचा प्लॅन

रिलायन्स जिओचा हा प्लॅन २८ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज इंटरनेटसाठी ३ जीबी डेटा मिळतो. याचप्रकारे जिओ ग्राहक टोटल ८४ जीबी डेटाचा वापर करू शकतात. याव्यतिरिक्त या प्लॅनमध्ये ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग सुविधा दिली जाते. एवढेच नव्हे तर यामध्ये दररोज १०० एसएमएसचीदेखील ऑफर दिली जाते आहे. याशिवाय जिओ अॅप्सचे सब्सिक्रिप्शनदेखील मिळते आहे.

जिओचा ६०१ रुपयांचा प्लॅन

रिलायन्स जिओचा ६०१ रुपयांचा प्लॅन २८ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह मिळतो. यामध्ये ग्राहकांना इंटरनेटसाठी दररोज ३ जीबी डेटा मिळतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामध्ये ६ जीबी डेटा एक्स्ट्रादेखील दिला जातो आहे. म्हणजेच ग्राहकांना ९० जीबी डेटाची सुविधा मिळते आहे. याव्यतिरिक्त या प्लॅनमध्ये ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग सुविधा दिली जाते. एवढेच नव्हे तर यामध्ये दररोज १०० एसएमएसचीदेखील ऑफर दिली जाते आहे. म्हणजेच एकूण २८०० एसएमएस पाठवता येतील. याशिवाय जिओ अॅप्सचे सब्सिक्रिप्शनदेखील मिळते आहे. त्याचबरोबर एक वर्षांसाठी डिस्ने + हॉटस्टारचे सब्स्क्रिप्शनदेखील मोफत मिळते आहे. 

रिलायन्स जिओचा ११९९ रुपयांचा प्लॅन

रिलायन्स जिओचा हा प्लॅन ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना इंटरनेट वापरण्यासाठी दररोज ३ जीबी डेटा मिळतो आहे. याचप्रकारे जिओ युजर्स एकूण २५२ जीबी डेटाचा  वापर करू शकतात. दररोज मिळणाऱ्या डेटाची स्पीड कमी होत ६४ केबीपीएस होतो. या रिचार्जमध्ये ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड फ्री कॉलिंगची सुविधादेखील दिली जाते आहे. इतकेच नाही तर या प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएससुद्धा ग्राहकांना दिले जात आहेत. याशिवाय जिओ अॅप्सचे सब्स्क्रिप्शनदेखील मिळते आहे. 

जिओचा नवीन रिचार्ज प्लॅन माय जिओ ऍपवर जाऊन Other Plans मध्ये गेल्यावर Value सेक्शनवर दिसेल. जर एक रुपयाचा रिचार्ज ग्राहकाने १० वेळा केला तर, ग्राहकाला एक जीबी डेटा मिळले. कंपनीकडे १५ रुपयांच्या प्लॅनमध्ये एक जीबी डेटा मिळतो. त्यामुळे १५ रुपयांच्या रिचार्जपेक्षा हा एक रुपयांचा प्लॅन ग्राहकांना अधिक स्वस्त पडेल. स्पर्धेत आघाडीवर राहण्यासाठी जिओ सातत्याने नवे प्लॅन आणत असते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी