रिलायन्सने देशातील बड्या शहरांमध्ये लाँच केलं JioMart, मिळणार 'एवढी' सूट 

रिलायन्सने (Reliance) देशातील मोठ्या शहरांमध्ये जिओमार्ट (JioMart) सेवा सुरू केली आहे. पाहा काय आहे याची खासियत.

reliance launches jiomart in major cities of the country everything available at single virtual store 5 percent discount also
रिलायन्सने देशातील बड्या शहरांमध्ये लाँच केलं JioMart, मिळणार 'एवढी' सूट   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • रिलायन्सने देशातील मोठ्या शहरांमध्ये जिओमार्ट सेवा सुरू केली
  • नवी मुंबई, कल्याण आणि ठाणेमध्ये या कंपनीचे १२०० हून अधिक किराणा दुकान आहेत.
  • ही सेवा आता मुंबई, पुणे, बंगळुरु, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकाता या शहरांमध्ये उपलब्ध आहे

मुंबई: रिलायन्सने शनिवारी (23 मे) देशातील प्रमुख शहरांमध्ये जिओमार्ट (JioMart) लाँच केले आहे. रिलायन्स जिओच्या नवीन ई-कॉमर्स व्हेंचरची वेबसाइट लाइव्ह झाली आहे. तसंच यावरुन ऑर्डर बुक होण्यास देखील  सुरुवात झाली आहे. आतापर्यंत कंपनीने नवी मुंबई, कल्याण आणि ठाणेमध्ये अॅपचं पायलट टेस्टिंग सुरु केलं आहे. जिथे याचे १२०० पेक्षा जास्त किराणा दुकानं आहेत. JioMart सेवा आता मुंबई, पुणे, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकाता यासारख्या शहरांमध्ये देखील उपलब्ध आहे.

ई-कॉमर्स वेबसाइट कृषी उत्पादने तसेच किराणा सामानाची विक्री देखील करीत आहे. वेबसाइटच्या About Us section मध्ये असं म्हटलं आहे की, आपल्या घरासाठी आपल्याला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी खरेदी करण्यासाठी आम्ही आपल्याला सुविधा प्रदान करतो. यात एकाच व्हर्च्युअल स्टोअरमधून ताजी फळे आणि भाज्या, तांदूळ, मसूर, तेल, पॅकेज्ड फूड, दुग्धजन्य पदार्थ, , पाळीव प्राण्यांचे अन्न, घरगुती साफसफाईच्या वस्तू आणि वैयक्तिक काळजी उत्पादने देण्यात येतात. वेबसाइटनुसार, बहुतेक उत्पादनांच्या एमआरपीवर कमीत कमी ५ टक्के सूट देण्यात आली आहे. 

जिओमार्ट रिलायन्सने भारतातील प्रमुख शहरांमध्ये जिओमार्ट सेवा सुरू केली आहे. ई-कॉमर्स वेबसाइट आवश्यक किराणा माल तसेच कृषी उत्पादनांची विक्री करीत आहे. कंपनी नवी मुंबई, कल्याण आणि ठाणे येथेही चाचणी घेत आहे. मुंबई, पुणे, बंगळुरू, चेन्नई अशा शहरांमध्ये आता जिओमार्ट सेवा उपलब्ध आहेत.

सोशल मीडिया कंपन्या फेसबुकने रिलायन्स जिओमध्ये ९.९९% टक्के भागीदारीसह ४३,५७४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. कंपनीने म्हटलं होतं की, एकूण गुंतवणुकीपैकी १४,९७६ कोटी रुपये  भविष्यातील वाढीसाठी जियो प्लॅटफॉर्मवर ठेवण्यात येतील. ज्यामध्ये व्हॉट्सअॅप जिओमार्ट शॉपिंग प्लॅटफॉर्मचा देखील समावेश आहे.

रिलायन्स जिओ कंपनीत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. अमेरिकन गुंतवणूक कंपनी विस्टा इक्विटी पार्टनर्स (Vista Equity Partners) जिओ कंपनीत २.३२ टक्के गुंतवणुकीसाठी ११,३६७ कोटी रुपयांचा व्यवहार करत आहे. रिलायन्स समुहाकडून करण्यात आलेल्या अधिकृत वक्तव्यांनुसार, या गुंतवणुकीअंतर्गत ४.९१ लाख कोटींचे समभाग आणि ५.१६ लाख कोटींच्या एन्टरप्रायजेस व्हॅल्यूचा व्यवहार करण्यात आला आहे. यानंतर रिलायंन्स जिओच्या समभागांची किंमत ४.९१ लाख कोटी तर एन्टंरप्रायजेस व्हॅल्यू ५.१६ कोटी इतकी  झाली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी