कसा मिळवाल रिलायन्स जिओकडून HD, 4K LED टीव्ही मोफत?

काम-धंदा
Updated Aug 13, 2019 | 10:59 IST

Jio LED Free TV: रिलायन्स जिओने गीगा फायबरची घोषणा केली असून आता यासोबत एलईडी टीव्ही मोफत देण्याचीही घोषणा केली आहे. पाहा कसा मिळवाल टीव्ही.

Mukesh_Ambani_BCCL
कसा मिळवाल रिलायन्स जिओकडून HD, 4K LED टीव्ही मोफत?  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

 • रिलायन्स जिओ आता चक्क एलईडी टीव्ही मोफत देणार
 • जिओने गीगा फायबरची केली घोषणा
 • मुकेश अंबांनीनी यूजर्ससाठी केल्या अनेक नव्या घोषणा

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी काल (सोमवार) जियो फायबर लाँचिंगची घोषणा केली. यावेळी त्यांनी जाहीर केलं की, ५ सप्टेंबरला जिओ फायबर सेवा सुरु होणार आहे. यासोबतच त्यांनी जिओ फायबर वेलकम ऑफरची देखील घोषणा केली. जिओ फायबर आणि जिओ सेट टॉप बॉक्स सोबत मिळणार आहे. यावेळी मुकेश अंबानी म्हणाले की, जिओ फायबर आणि जिओ सेट टॉप बॉक्स हे एलईडी टीव्हीसोबत चांगलं चालतं. जर जिओ फायबर ग्राहकांनी जर वार्षिक प्लॅन सब्सक्राईब केला तर त्यांना HD किंवा 4K LED टीव्ही मोफत मिळणार आहे. यासोबतच त्यांना 4K सेट टॉप बॉक्स देखील मोफत मिळणार आहे. 

रिलायन्स जिओकडून मोफत एलईडी टीव्ही मिळवायचा असल्यास तुम्हाला फक्त एकच काम करावं लागणार आहे ते म्हणजे जिओ फायबरचा वार्षिक प्लॅन तुम्हाला खरेदी करावा लागणार आहे. 

जियो फायबरमध्ये आपल्याला काय-काय मिळणार? 

 1. जियो फायबरमध्ये आपल्याला एक लँडलाइन फोन कनेक्शन मोफत मिळणार आहे. 
 2. एक डिजिटल सेट टॉप बॉक्स मिळेल  
 3. अल्ट्रा एचडी एंटरटेनमेंट
 4. वर्च्युअल रियालिटी कंटेंट
 5. मल्टी पार्टी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग
 6. व्हॉईस इनेबल्ड वर्च्युअल असिसटेंट
 7. इंटरेक्टिव गेमिंग
 8. होम सिक्युरिटी
 9. एचडी, 4के टीव्ही

जियो सेट टॉप बॉक्समध्ये लोकल केबल टीव्ही सिग्नल देखील चालणारआ हे. याचा अर्थ असा की, हा सेट टॉप बॉक्स लोकल केबल टीव्ही ऑपरेटरसाठी देखील काम करणार आहे. 

मुकेश अंबानी यांनी मुंबईत जिओ फायबर प्लॅनची काल घोषणा केली होती. ज्यामध्ये फायबर प्लॅन हा ७०० रुपयांपासून १० हजार रुपये प्रति महिना असा असणार आहे. यामध्ये ग्राहकांना फक्त एकाच गोष्टीसाठी पैसे द्यावे लागणार आहेत. याबाबत अंबानी म्हणाले की, 'तुम्हाला या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवरुन मोबाइल किंवा फिक्स्ड लाइनचे सर्व व्हॉईस कॉलची सुविधा मोफत मिळणार आहे. फिक्स्ड लाइनवर इंटरनॅशनल व्हॉईस कॉलिंग अमेरिका आणि कॅनडासाठी फक्त ५०० रुपये महिन्याचा प्लॅन असणार आहे.' 

जियो फायबरच्या प्लॅनमध्ये १०० mbps पासून तब्बल १ Gbps पर्यंत इंटरनेट स्पीड मिळणार आहे. यामुळे भारतात फिक्स्ड लाइन डेटाच्या क्लॉलिटीमध्ये खूपच सुधारणा होणार आहे. यावेळी अंबानींनी असा दावा केला आहे की, भारतात जगाच्या तुलनेत १/१० कमी किंमतीत जिओ फायबर सेवा मिळणार आहे. 

जिओ होम फोनसाठी सध्या असलेले टॅरिफ प्लॅन हे खूपच स्वस्त असल्याचं रिलायन्सने म्हटलं आहे. यावेळी जिओ फायबर ग्राहकांना जिओ पोस्टपेड प्लस सुविधा देखील देण्यात येणार आहे. यामुळे यूजर्संना प्लॅटिनम ग्रेड सर्विस आणि प्रोडक्टचा अनुभव मिळणार आहे. 

यासोबतच जियोच्या ग्राहकांना घरीच सिम सेटअपची सुविधा मिळणार आहे. याशिवाय आपल्याला सर्व डिव्हाइसवर डेटाची सुविधा मिळणार आहे. तसंच आपण फॅमेली प्लॅनमध्ये डेटा देखील शेअर करु शकता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
कसा मिळवाल रिलायन्स जिओकडून HD, 4K LED टीव्ही मोफत? Description: Jio LED Free TV: रिलायन्स जिओने गीगा फायबरची घोषणा केली असून आता यासोबत एलईडी टीव्ही मोफत देण्याचीही घोषणा केली आहे. पाहा कसा मिळवाल टीव्ही.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...