RBI Repo Rate : रिझर्व्ह बॅंकेककडून रेपो दरात 50 bps ची वाढ...6.7 टक्के महागाईचा दर आणि 7.2 टक्के विकासदराचा अंदाज

Repo Rate Hike : भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास (Shaktikanta Das)यांनी शुक्रवारी पतधोरण समितीच्या घोषणेदरम्यान रेपो दर 50 बेस पॉईंट्सने वाढवून 5.40 टक्के केला जाईल असे सांगितले. 8 जून रोजी झालेल्या शेवटच्या बैठकीत आरबीआयने (RBI) रेपो दर 50 बेसिस पॉइंट्सने वाढवून 4.90 टक्के केला होता. 2022-23 या आर्थिक वर्षासाठी महागाईचा दर 6.7 टक्के राहण्याचा अंदाज आहे.

Breaking News
आरबीआयकडून रेपो रेटमध्ये वाढ 
थोडं पण कामाचं
  • आरबीआयकडून रेपो रेटमध्ये पुन्हा वाढ, आरबीआयने रेपो रेट 50 बेसिस पॉइंटने वाढवला
  • आर्थिक वर्षासाठी महागाईचा दर 6.7 टक्के राहण्याचा अंदाज
  • देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर 7.2 टक्के राहण्याचा आरबीआयचा अंदाज

RBI Repor rate hike : नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास (Shaktikanta Das)यांनी शुक्रवारी पतधोरण समितीच्या घोषणेदरम्यान रेपो दर 50 बेस पॉईंट्सने वाढवून 5.40 टक्के केला जाईल असे सांगितले. 8 जून रोजी झालेल्या शेवटच्या बैठकीत आरबीआयने (RBI) रेपो दर 50 बेसिस पॉइंट्सने वाढवून 4.90 टक्के केला होता. आरबीआयच्या पतधोरण समितीने भविष्यातील महागाई आरबीआयच्या उद्दिष्टाच्या आतच राहील यावरील प्रयत्नांवर आपले लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. पतधोरण समितीच्या घोषणेदरम्यान आरबीआयने चालू आर्थिक वर्षातील महागाईचा अंदाज व्यक्त केला, त्याचबरोबर देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर किती राहणार याचाही अंदाज व्यक्त केला. महागाई नियंत्रणावर आरबीआयने लक्ष केंद्रीत केले आहे. (Repo rate reaches to 5.40% as RBI increases repo rate by 50 bps) 

अधिक वाचा : Vice Presidential Election : उपराष्ट्रपतीपदासाठी शनिवारी मतदान

6.7 टक्के महागाई दराचा अंदाज

2022-23 या आर्थिक वर्षासाठी महागाईचा दर 6.7 टक्के राहण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे, 2023-24 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी ग्राहक किंमत -आधारित महागाई (CPI)5 टक्के राहण्याचा अंदाज आहे, असे यावेळी रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले.

विकासदर 7.2 टक्के राहण्याचा अंदाज

रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी 2022-23 या आर्थिक वर्षासाठी देशाच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धीदराचा अंदाज 7.2 टक्के इतका व्यक्त केला. ते म्हणाले की, पहिली तिमाही, दुसरी तिमाही, तिसरी तिमाही आणि चौथ्या तिमाहीचे अंदाज अनुक्रमे 16.2 टक्के, 6.2 टक्के, 4.1 टक्के आणि 4 टक्के इतके आहेत. दास यांनी असेही नमूद केले की 2023-24 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी अर्थव्यवस्थेचा प्रत्यक्ष वृद्धीदर 6.7 टक्के इतका असेल.

अधिक वाचा : एकमेकांसोबत लग्न न झाल्याचं होतं दु:ख; नैराश्यात विवाहितेची प्रियकरासोबत आत्महत्या

महागाई नियंत्रण आणि अर्थव्यवस्थेच्या वाढीची भूमिका

रिझर्व्ह बँकेने देखील अर्थव्यवस्थेच्या वाढीला पाठिंबा देताना महागाई आपल्या लक्ष्याच्या आत राहील याची खात्री करण्यासाठी आपली अनुकूल भूमिका मागे घेतली. "चालू वर्षाच्या कालावधीत महागाई कमी होण्याची चिन्हे असण्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज आहे. या अंदाजानुसार, 2022-23 या आर्थिक वर्षात भारत सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असेल." असे रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले. वस्तू आणि सेवांच्या निर्यातीसह आर्थिक मदतीमुळे चालू खात्यातील तूट ( CAD) योग्य मर्यादेत राहू शकते, असेही त्यांनी नमूद केले.

आरबीआयने म्हटले की कृषी क्षेत्राच्या वाढीच्या शक्यतेमुळे वाढीचा दृष्टीकोन आणि ग्रामीण उपभोगाचा फायदा मिळण्याची अपेक्षा आहे. "संपर्क-केंद्रित सेवांची मागणी आणि व्यवसाय आणि ग्राहकांच्या भावनांमध्ये सुधारणा यामुळे विवेकाधीन खर्च आणि शहरी उपभोग वाढला पाहिजे. गुंतवणुकीला चालना मिळण्यासाठी सरकारने केलेल्या भांडवली खर्चातील वाढ, बँक क्रेडिट सुधारणे आणि वाढत्या क्षमतेच्या वापरातून पाठिंबा मिळणे अपेक्षित आहे,”असेही पुढे आरबीआयने म्हटले आहे.

अधिक वाचा : Viral Video : छतावरून कोसळला तरुण, भावाने ‘कॅच’ करत वाचवला जीव

आरबीआयच्या औद्योगिक दृष्टीकोन सर्वेक्षणात सर्वेक्षण केलेल्या कंपन्यांना 2022-23 या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत उत्पादन आणि नवीन ऑर्डरमध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे. मात्र भू-राजकीय तणाव, जागतिक वित्तीय बाजारातील अस्थिरतेतील वाढ आणि जागतिक आर्थिक परिस्थिती गंभीर होण्याच्या धोक्यामुळे अर्थव्यवस्थेच्या वाढीवर परिणाम होतो.

गव्हर्नर शक्तिकांता दास म्हणाले की 2022-23 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन तिमाहीत महागाईदर 6 टक्क्यांच्या पातळीच्या वर राहण्याचा अंदाज आहे. “महागाईची वाढलेली पातळी आणि देशांतर्गत अर्थव्यवस्थेच्या हालचालीची लवचिकता लक्षात घेता, पतधोरणविषयक समितीने असे ठरवले की महागाईचा दबावावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि महागाई अपेक्षित पातळीत आणण्यासाठी निश्चित अशा पतधोरणाची आवश्यकता आहे, जेणेकरून अर्थव्यवस्थेची वाढ होण्याची खातरजमा करता येईल.” असे शक्तिकांता दास यावेळी म्हणाले.  रेपो दरात 50 bpsची वाढ करून तो 5.40 टक्क्यांवर नेण्याची घोषणा करताना आणि अनुकूल भूमिका मागे घेताना दास यांनी हे मत व्यक्त केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी