RBI Hikes Repo Rate: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) पुन्हा एकदा लोकांना धक्का देऊ शकते. एप्रिल महिन्यात होणाऱ्या चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) बैठकीत रिझर्व्ह बँक व्याजदरात वाढ करण्याच्या तयारीत आहे असा अंदाज लावला जात आहे. देशातील किरकोळ चलनवाढीचा दर सध्या 6 टक्क्यांच्या वर आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हसह इतर देशांच्या मध्यवर्ती बँकांनी व्याजदरांबाबत आपली आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. त्यामुळे रिझव्र्ह बँकही रेपो रेटमध्ये वाढ करु शकते. 2023-24 या आर्थिक वर्षातील पतधोरणाची पहिली बैठक 3 एप्रिलपासून सुरू होणार असून 6 एप्रिलपर्यंत चालणार आहे.
तज्ञांच्या मते, चलनविषयक धोरण बैठकीत रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉईंटची वाढ होऊ शकते. एप्रिलमध्ये होणाऱ्या चलनविषयक धोरणाच्या बैठकीत, समिती उच्च किरकोळ चलनवाढीचा दर आणि विकसित देशांच्या मध्यवर्ती बँकांनी विशेषतः अमेरिकन फेडरल रिझर्व्ह, युरोपियन सेंट्रल बँक आणि बँक ऑफ इंग्लंड यांनी उचललेल्या पावलांचा विचार करेल.
आधिक वाचा: New rules:1 एप्रिलपासून लागू होणार नवे नियम, सतर्क रहा कारण तुमची छोटीशी चूक करू शकते मोठे नुकसान
मागील वर्षीच्या मे महिन्यापासून आतापर्यंत रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये 2.50 टक्क्यांनी वाढ केली आहे. उच्च महागाई दर नियंत्रित करण्यासाठी 2022 मध्येच सलग पाच वेळा वाढ करण्यात आली होती. त्याचा परिणामही दिसून आला आणि महागाईचा दर खाली आला. परंतु फेब्रुवारी 2023 मध्ये पॉलिसी रेटमध्ये वाढ केली.
रेपो रेटच्या वाढीवर नजर टाकल्यास मे 2022 मध्ये 0.40 टक्के, जून 2022 मध्ये 0.50 टक्के, ऑगस्ट 2022 मध्ये 0.50 टक्के, सप्टेंबर 2022 मध्ये 0.50 टक्के आणि डिसेंबर 2022 मध्ये 0.35 टक्के वाढ झाली होती. यानंतर, फेब्रुवारी 2023 मध्ये रेपो दरात पुन्हा 0.25 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती.
आधिक वाचा: Government Schemes For Girl: 'या' 5 सरकारी योजना देतात मुलींच्या स्वप्नांना बळ, असा करा अर्ज
पुढील एमपीसी बैठकीत रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा रेपो दरात 0.25 टक्के किंवा 25 बेसिस पॉईंटने वाढ केल्यास EMI वाढणार आहे. त्यानंतर वाढून 6.75 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे जनतेवर कर्जाचा बोजा वाढणार आहे. रेपो दरात वाढ झाल्यामुळे गृहकर्ज, कार कर्ज आणि वैयक्तिक कर्जासह सर्व प्रकारची कर्जे महाग होतील आणि अधिक ईएमआय भरावा लागेल.
RBI च्या रेपो रेटचा बँकांच्या कर्जावर थेट परिणाम होतो. जेव्हा हा दर कमी होतो, तेव्हा कर्ज स्वस्त होते आणि हा दर वाढल्यानंतर, बँका कर्ज महाग करतात. याचा परिणाम गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्जावर होतो.
हा एक दर आहे ज्यावर RBI इतर बँकांना कर्ज देते. तर रिव्हर्स रेपो रेटला RBI बँकांना पैसे ठेवण्यावर व्याज देते. रेपो रेटमध्ये घट झाल्यास कर्जाचा ईएमआय कमी होतो, तर रेपो दरात वाढ झाल्याने सर्व प्रकारची कर्जे महाग होतात.