RBI Repo Rate: RBI ने कर्जदारांना दिला दिलासा, रेपो रेट 6.50 टक्क्यांवर कायम

RBI Repo Rate : भारतीय रिझर्व्ह बँकेने यावेळी रेपो दरात वाढ केली नाही. त्यामुळे कर्जदारांना दिलासा मिळाला आहे. RBI गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, रेपो दर वाढवण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

 Reserve Bank of India not changed Repo Rate
RBI Repo Rate: RBI ने कर्जदारांना दिला दिलासा, रेपो रेट 6.50 टक्क्यांवर कायम  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज महाग होणार नाही.
  • रेपो दर 6.50 टक्क्यांवर कायम
  • मध्यमवर्गीय आणि छोट्या व्यावसायिकांना दिलासा

RBI Monetary Policy April 2023 : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने रेपो दरात वाढ केलेली नाही. मध्यवर्ती बँकेने रेपो दर 6.50 टक्क्यांवर कायम ठेवला आहे. यामुळे (loan) कर्जदारांच्या ईएमआयमध्ये कोणत्याही स्वरुपाची वाढ होणार नाही. आरबीआयचा रेपो दर कायम ठेवल्याने मध्यमवर्गीय आणि छोट्या व्यावसायिकांच्या खिशावर  (EMI) ईएमआयचा बोजा यावेळी वाढणार नाही. याचा परिणाम असा होईल की गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज महाग होणार नाही. ( Reserve Bank of India not changed Repo Rate)

अधिक वाचा : 8th Pay Commission : या दिवशी लागू होईल 8th Pay Commission! सरकारी बाबूंच्या पगारात होणार बंपर वाढ

चालू आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये महागाई दर 5.2 टक्के राहण्याचा अंदाज आहे, असे आरबीआयने म्हटले आहे. त्यांच्या मते, एप्रिल ते जून या तिमाहीत तो 5.1 टक्के असू शकतो. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे की, चालू आर्थिक वर्षात महागाई कमी होईल, त्यावर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरूच राहतील.

केंद्रीय बँकेने आठ पतधोरण बैठकींपैकी सहा वेळा रेपो दरात वाढ केली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यापासून ही प्रक्रिया सुरू झाली. तेव्हा आरबीआयचा रेपो रेट ४ टक्के होता आणि आता रिझर्व्ह बँकेचा रेपो दर ६.५ टक्क्यांवर पोहोचला आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणतात की, जागतिक स्तरावरील वाढत्या संकटाला लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

अधिक वाचा : Gautam Adani यांची संपत्ती घटली!, Mukesh Ambani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

किरकोळ चलनवाढीचा दर फेब्रुवारीमध्ये वार्षिक आधारावर 6.44 टक्क्यांनी वाढला होता, जो जानेवारीमध्ये 6.52 टक्क्यांपेक्षा कमी होता. पण, मागील 12 पैकी 10 रीडिंगसाठी, चलनवाढ मध्यवर्ती बँकेच्या 2 टक्के ते 6 टक्क्यांच्या  लक्ष्य श्रेणीपेक्षा जास्त आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी