Saving Account: सेव्हिंग खात्यांवरील व्यवहारांवर आता मर्यादा; आरबीआयची नवीन नियमावली

काम-धंदा
Updated Jun 12, 2019 | 18:19 IST | टाइम्स नाऊ मराठी

Saving Account: सेव्हिंग अकाऊंट किंवा जन धन योजनेच्या अंतर्गत उघडण्यात आलेल्या अकाऊंटमधून जर मर्यादेच्या बाहेर व्यवहार केले तर, त्यावर चार्जेस लागू करण्याचा अधिकार रिझर्व्ह बँकेने आता बँकांना दिला आहे.

Savings account
सेव्हिंग खात्यांवरील व्यवहारांवर आता मर्यादा  |  फोटो सौजन्य: BCCL

मुंबई : रिझर्व्ह बँकेच्या एका नियमाने सर्वसामान्यांना धक्का बसणार आहे. रिझर्व्ह बँकेने बेसिक सेव्हिंग बँक डिपॉझिट अकाऊंट (बीएसबीडीए) या प्रकारातील नियमावलीमध्ये बदल केला आहे. त्यानुसार सेव्हिंग अकाऊंट किंवा जन धन योजनेच्या अंतर्गत उघडण्यात आलेल्या अकाऊंटमधून जर मर्यादेच्या बाहेर व्यवहार केले तर, त्यावर चार्जेस लागू करण्याचा अधिकार बँकांना देण्यात आला आहे. प्रत्येक खात्याला कोणत्याही चार्जेसशिवाय व्यवहार करण्याची मर्यादा असून, त्याच्या पुढे बँक खातेदाराला त्यासाठी चार्जेस लागू करू शकते. या संदर्भात 'टाइम्स ऑफ इंडिया'ने एक वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार बँकांना त्यांच्या खातेदाराला महिन्यातून चार व्यवहार (महिन्याला बँकेतून पैसे काढण्याची सरासरी वेळ) कोणत्याही चार्जेस शिवाय करण्याची मर्यादा देता येणार आहे. तेथून पुढील प्रत्येक व्यवहाराला बँक चार्जेस लावू शकते. रिझर्व्ह बँकेच्या या नियमामुळे सामान्यांमध्ये मात्र नाराजी आहे.

ग्राहकांसाठीच नियमावलीत बदल

एखाद्या व्यक्तीचे किंवा महिलेचे बेसिक बँक खाते असेल तर, त्याला नव्याने दुसरे खाते सुरू करण्याची अनुमती रिझर्व्ह बँक देत नाही. त्याचप्रमाणे ‘बीएसबीडीए’च्या नियमानुसार बँकांना खातेदारांवर इतर कोणतेही चार्जेस लागू करण्यास स्पष्ट मर्यादा होत्या. यासंदर्भात आरबीआयने सर्व बँकांसाठी एक परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार ‘बीएसबीडीए’मध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यात सेव्हिंग खात्याला काही मर्यादित सुविधा असणार आहेत. त्या खात्यातून व्यवहार करण्यासाठी मर्यादा असणार आहे. ग्राहकांना उत्तम सुविधा देण्यासाठी खात्याशी संबंधित नियमावलीमध्ये बदल करण्यात आला आहे, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. या संदर्भात मुंबई आयआयटीचे गणित विषयाचे प्राध्यापक आशिष दास म्हणाले, ‘रिझर्व्ह बँकेच्या यापूर्वीच्या नियमामुळे एसबीआय आणि अॅक्सेस बँकेसारख्या काही बँकांना खातेदारांना चार्जेस लावता येत नसल्याने चार व्यवहारानंतर व्यवहारच बंद करून टाकत होत्या. त्यामुळे चार्जेस देण्याची तयारी असूनही ग्राहकांना सुविधा मिळत नव्हती.’

चेकबुकसाठीही मोजा पैसे

रिझर्व्ह बँकेने बँकांसाठी आणखी एका नव्या नियमाची घोषणा केली आहे. ‘बीएसबीडीए’ अंतर्गत येणाऱ्या सेव्हिंग खात्यांसाठी चेकबुक देता येणार आहे. पण, त्यासाठी बँकेने चार्जेस घ्यावेत. बँकेच्या शाखेत जाऊन खात्यावर पैसे भरणे किंवा एटीएममधून खात्यावर पैसे भरण्यावर तसेच इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर आणि चेकद्वारे पैसे भरण्यावर कोणत्याही प्रकारचे चार्जेस असणार नाहीत. ही सेवा मोफतच राहणार आहे. रिझर्व्ह बँकेची ही नवीन नियमावली आली असली तरी, त्यानुसार प्रत्येक बँक त्यांचे स्वतंत्र नियम ठरवत असते. त्यामुळे खातेदारांनी त्यांच्या-त्यांच्या बँकेत जाऊन या संदर्भात नीट माहिती घेणे उचित ठरेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Saving Account: सेव्हिंग खात्यांवरील व्यवहारांवर आता मर्यादा; आरबीआयची नवीन नियमावली Description: Saving Account: सेव्हिंग अकाऊंट किंवा जन धन योजनेच्या अंतर्गत उघडण्यात आलेल्या अकाऊंटमधून जर मर्यादेच्या बाहेर व्यवहार केले तर, त्यावर चार्जेस लागू करण्याचा अधिकार रिझर्व्ह बँकेने आता बँकांना दिला आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola