Adani Electricity : इलेक्ट्रीक बिलाची तक्रार सोडवा व्हिडिओ कॉलिंगद्वारे, अदानी इलेक्ट्रिसिटीची मुंबईकरांसाठी नवी सेवा 

अदानी इलेक्ट्रिसिटीकडून मुंबईकर ग्राहकांसाठी नवीन डिजिटल सेवांचे दालन खुले करण्यात आले आहे.  ग्राहकांना दूरस्थपणे प्रवेशाची मुभा देणाऱ्या अदानी इलेक्ट्रिसिटीच्या नाविन्यपूर्ण सेवा

Resolve electricity bill complaints through video calling, Adani Electricity's new service for Mumbaikars
इलेक्ट्रीक बिलाची तक्रार सोडवा व्हिडिओ कॉलिंगद्वारे 
थोडं पण कामाचं
  •  व्हिडिओ कॉलद्वारे कस्टमर केअर अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची ग्राहकांना सुविधा
  • मूल्यवर्धित वैशिष्ट्यांसह संपूर्ण परवाना क्षेत्रामध्ये ७० स्व-मदत किऑस्कची सज्जता
  •  कृत्रिम प्रज्ञेने (एआय) सक्षम चॅटबॉट ‘इलेक्ट्रा’ लवकरच मराठी, हिंदी भाषेत उपलब्ध होणार 

मुंबई  : अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लि. (अदानी इलेक्ट्रिसिटी) ने भारताच्या स्वातंत्र्याचे ७६ वे वर्ष आणि अदानी इलेक्ट्रिसिटीच्या ‘पॉवर ऑफ सर्व्हिस’ (सेवेतून बळ) या मूळ सेवा तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने ग्राहकांना सक्षम करण्यासाठी चार नवीन डिजिटल सेवा सुरू केल्या आहेत.
या नवीन डिजिटल सुविधांचा ग्राहकांना त्यांच्या मोबाईल उपकरणांद्वारे त्यांच्या घरातून, कार्यालयातून किंवा घरापासून लांब फिरस्तीवर असताना दूरस्थपणे अदानी इलेक्ट्रिसिटीच्या सेवांचा लाभ घेता येई येईल.  (Resolve electricity bill complaints through video calling, Adani Electricity's new service for Mumbaikars)

अधिक वाचा : जगात नंबर 3! गौतम अदानींनी बर्नार्ड अर्नॉल्टला टाकले मागे

नवीन सेवांच्या अनावरणांबाबत बोलताना अदानी इलेक्ट्रिसिटीचे व्यवस्थापकीय संचालक कंदर्प पटेल म्हणाले, “पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने (पीएफसी) नुकत्याच जाहीर केलेल्या देशातील वीज वितरण कंपन्यांच्या क्रमवारीत अदानी इलेक्ट्रिसिटीला मुंबईची प्रथम क्रमांकाची सेवा म्हणून स्थान दिले आहे आणि आमचा विश्वास आहे की, ते आमच्या 'पॉवर ऑफ सर्व्हिस' (सेवेतून बळ) या धारणेवरील विश्वासाचेच फलित आहे. या नवीन सेवांद्वारे, आम्हाला खात्री आहे की आम्ही सर्वात पसंतीची वीज वितरण सेवा म्हणून आमचे स्थान आणखी मजबूत करू.”

अधिक वाचा : Suicide in Maharashtra : आत्महत्येत देशात महाराष्ट्राचा क्रमांक प्रथम, तब्बल ६ टक्क्यांनी आत्महत्यांमध्ये वाढ

अदानी इलेक्ट्रिसिटीने व्ही-असिस्ट हे व्हर्च्युअल कॉन्टॅक्ट सेंटर सुरू केले आहे जेथे ग्राहक व्हिडिओवर कस्टमर केअर अधिकाऱ्यांशी संवाद साधू शकतात. अशा प्रकारची अभिनव सेवा सुरू करणारी अदानी इलेक्ट्रिसिटी ही जगातील वीज वितरण क्षेत्रातील पहिली कंपनी आहे. सध्या प्रचलित व्यक्तीनिरपेक्ष स्वरूपाच्या हेल्पलाईन वापरणाऱ्या ग्राहकांच्या अनुभतीपेक्षा, खूप वेगळ्या प्रकारची ही सेवा आहे आणि अदानी इलेक्ट्रिसिटीशी ग्राहकांच्या परस्परसंवादामध्ये वैयक्तिकृत घटकाला सामावून घेणारी आहे.

अधिक वाचा : Ganesh Chaturthi 2022:  गणेश चतुर्थीला बाप्पाच्या या रंगाच्या मूर्तीची करा स्थापना, प्रत्येक इच्छा होईल पूर्ण

ग्राहकांना रोख आणि धनादेशाद्वारे देयक भरणा करण्याचा पर्याय, रोख बदल स्वीकारण्याचा पर्याय, देयकाच्या काही भागाचा भरणा करण्याचा पर्याय, देयकाची प्रत डाउनलोड करणे, तक्रारी नोंदवणे आणि व्हिडिओ कॉल्समध्ये संपर्क साधणे यासारख्या विशेष क्षमतांसह प्रगत स्व-मदत (सेल्फ हेल्प) किऑस्क देखील सुरू केले गेले आहेत. वीज वितरण कंपनीने मुंबईच्या पश्चिम उपनगरात पन्नास पेक्षा जास्त ठिकाणी सोयीस्करपणे असे ७० सेल्फ हेल्प किऑस्क यंत्र बसवले आहेत.

अधिक वाचा : रेल्वे क्रॉसिंगवर थोडक्यात बचावला, बाईकचा झाला चेंदामेंदा 

अदानी इलेक्ट्रिसिटीचे चॅटबॉट ‘इलेक्ट्रा’ आता उत्कृष्ट क्षमतेसह प्रस्तुत केले गेले आहे आणि वापरकर्त्याच्या चांगल्या अनुभवासाठी नैसर्गिक भाषा प्रक्रिया (नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग - एनएलपी) आणि कृत्रिम प्रज्ञा (एआय) या सारख्या तंत्रज्ञानाच्या समावेशाचे सामर्थ्य त्याने मिळविले आहे. परिणामी ‘इलेक्ट्रा’ लवकरच ग्राहकांशी मराठी आणि हिंदी भाषांमध्ये संवाद साधेल. अदानी इलेक्ट्रिसिटीच्या संकेतस्थळ, अॅप आणि व्हॉट्सअॅपद्वारे ‘इलेक्ट्रा’शी विनासायास संपर्क साधला जाऊ शकेल.

नवीन डिजिटल सुविधांच्या प्रस्तुतीचा एक भाग म्हणून, अदानी इलेक्ट्रिसिटी स्मार्ट मीटर्स देखील सादर करत आहे, ज्याद्वारे ग्राहकांना त्यांच्या विजेच्या वापराच्या पद्धतींचे अधिक चांगल्या प्रकारे निरीक्षण करता येते. जसे की 'तुमचे रिअल टाइम मीटर रीडिंग जाणून घ्या,' अथवा 'प्रीपेड/पोस्ट-पेड मीटरिंगची सुविधा सक्षम करणे', 'सोलर ग्राहकांसाठी नेट मीटरिंग सुविधा', आणि 'रिमोट डिस्कनेक्शन/कनेक्शनसाठी विनंती.' अशा आज्ञावलीचा वापर करता येईल.
कार्यान्वयनापासून गेल्या चार वर्षांत, अदानी इलेक्ट्रिसिटीने आपल्या ग्राहकांसाठी अधिक जलद नवीन विजेची जोडणी, लक्षात ठेवण्यास सुलभ २४x७ अहोरात्र कार्यरत कस्टमर केअर क्रमांक १९१२२, नेव्हिगेशनची सहजता देणारे संकेतस्थळ, चॅटबॉट, अदानी इलेक्ट्रिसिटी अॅप, व्हॉट्सअॅप सेवा, ग्रीन एनर्जी पर्याय, अनुदानित दरात रुफटॉप सोलर पीव्ही प्रकल्प, ऊर्जा कार्यक्षम उपकरणांची सवलतीच्या दरात विक्री, मुंबईकरांच्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी समर्पित सर्वसमावेशक चार्जिंग नेटवर्क तैनात करणे अशा अनेकानेक नाविन्यपूर्ण सेवांचा अंतर्भाव उत्तरोत्तर केला आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी