Inflation | नवी दिल्ली : देशातील किरकोळ महागाईमध्ये (Retail inflation)वाढ झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात किरकोळ महागाई (Inflation) वाढून ४.९१ टक्क्यांवर पोचली आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या (RBI) महागाईच्या उद्दिष्टाच्या रेंजच्या वरच्या बाजूला महागाई पोचली आहे. फळे आणि भाजीपाला (fruits and vegetables) यांच्या वाढलेल्या किंमतीमुळे देशातील किरकोळ महागाईत वाढ झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात किरकोळ महागाई ४.४८ टक्क्यांवर गेली होती. तर नोव्हेंबर २०२० मध्ये किरकोळ महागाईदर ६.९३ टक्क्यांवर पोचला होता. (Retail inflation rises to 4.91% in November as fruits, vegetables prices rise)
रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने किरकोळ महागाईदर ४ टक्क्यांवर ठेवण्याचा, यात २ टक्के जास्त किंव कमी या रेंजमध्ये ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवलेले होते. नोव्हेंबर महिन्यात आकडेवारीनुसार सलग पाचव्या महिन्यात रिझर्व्ह बॅंकेच्या रेंजमध्ये महागाईदर आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार अन्नधान्याची महागाई नोव्हेंबर महिन्यात वाढून १.८७ टक्क्यांवर पोचली आहे. ऑक्टोबर महिन्यात अन्नधान्याची महागाई ०.८५ टक्के होती. मुख्य क्षेत्रातील महागाईदर नोव्हेंबर महिन्यात ६.१ टक्क्यांवर पोचला आहे, ऑक्टोबरमध्ये हाच महागाईदर ५.८ टक्के होता.
कच्च्या तेलाची आयात मागील महिन्यात १६ टक्क्यांनी घटली आहे. भारताच्या आयातीत कच्च्या तेलाचा वाटा सर्वाधिक असतो. कच्चे तेल सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात ७६ डॉलर प्रति बॅरलच्या पातळीवर व्यवहार करते आहे. रिझर्व्ह बॅंकेनेनुसार चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत महागाई उच्चांकीवर पोचण्याची आणि त्यानंतर कमी होत जाण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बॅंकेने मागील आठवड्यात झालेल्या पतधोरण समितीच्या द्वैमासिक बैठकीत रेपो रेट न बदलता ४ टक्क्यांवरच स्थिर ठेवला होता. कोरोना महामारीच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटमुळे निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर आरबीआयने रेपो रेट स्थिर ठेवले आहेत. पतधोरण समितीच्या सलग नवव्या बैठकीत आरबीआयने व्याजदर स्थिर ठेवले आहेत.
भारताच्या औद्योगिक उत्पादनातदेखील सलग दुसऱ्या महिन्यात घसरण झाली आहे. ऑक्टोबरमध्ये औद्योगिक उत्पादन ३.२ टक्क्यांवर होते. यात मुख्यत: खाणउद्योग, वीजनिर्मिती आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राने चांगली कामगिरी केली आहे. इंडस्ट्रियल प्रॉडक्शनच्या इंडेक्समध्ये मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचा वाटा ७७.६३ टक्के असतो. यात ऑक्टोबर महिन्यात २ टक्क्यांची वाढ झाली आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे.
देशात महागाईमुळे (Inflation) सर्वसामान्य माणूस त्रस्त झाला आहे. पेट्रोल-डिझेलच्या दराबरोबरच (Petrol price) आता टोमॅटोच्या भावातदेखील (Tomato price)वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत देशभरात पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात (Goa) बियर ही पेट्रोल आणि टोमॅटोपेक्षा स्वस्त झाली आहे. समोर आलेल्या वृत्तानुसार गोव्यात एका बियरची किंमत (Beer price in Goa) ही एक लिटर पेट्रोल किंवा एक किलो टोमॅटोपेक्षा स्वस्त आहे. गोव्यात लोकप्रिय असलेली गोवा किंग्स पिल्सनर ६० रुपये प्रति किलोच्या किंमतीने मिळते आहे. तर एक किलो टोमॅटोचा भाव हा पेट्रोलच्या दराशी स्पर्धा करतो आहे.