रिलायन्स झाली रिलायन्स बीपी मोबिलिटी लिमिटेड

रिलायन्स आता रिलायन्स बीपी मोबिलिटी लिमिटेड (Reliance BP Mobility Limited - RBML) या नव्या नावाने कार्यरत होणार आहे.

Reliance BP Mobility Limited - RBML
रिलायन्स बीपी मोबिलिटी लिमिटेड  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

 • रिलायन्स झाली रिलायन्स बीपी मोबिलिटी लिमिटेड
 • नवी कंपनी JIO-BP ब्रँड अंतर्गत काम करणार
 • देशात ५५०० पेट्रोल पंप सुरू करण्याची योजना

मुंबईः रिलायन्स आणि बीपी या दोन्ही कंपन्या संयुक्तपणे (ril bp launch fuel and mobility joint venture) भारतात इंधन आणि ऊर्जा क्षेत्रात उत्तुंग भरारी मारण्यासाठी काम करणार आहेत. बीपीने गुरुवारी मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजसोबत १ बिलियन डॉलरचा पार्टनरशिपचा करार (joint venture) केला. या करारामुळे रिलायन्स आता रिलायन्स बीपी मोबिलिटी लिमिटेड (Reliance BP Mobility Limited - RBML) या नव्या नावाने कार्यरत होणार आहे. नव्या कंपनीत मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सचे ५१ टक्के मालकी हक्क आहेत तर इंग्लंडच्या बीपी कंपनीचे ४९ टक्के मालकी हक्क आहेत. 

नवी कंपनी JIO-BP ब्रँड अंतर्गत काम करणार

नवी कंपनी JIO-BP ब्रँड अंतर्गत काम करणार आहे. देशातील २१ राज्यांमध्ये ही कंपनी काम करणार आहे. याचा थेट फायदा जिओच्या लाखो ग्राहकांना लवकरच होणार आहे.

देशात ५५०० पेट्रोल पंप सुरू करण्याची योजना

सध्या  रिलायन्सचे देशात १४०० पेट्रोल पंप आहेत. ही संख्या नवी कंपनी ५ वर्षांच्या आत ५५०० करणार आहे. या प्रकल्पातून देशात ८० हजार नव्या रोजगारांची निर्मिती केली जाणार आहे. नवी कंपनी तेल उत्खनन, तेल शुद्धीकरण, वाहनांसाठी शुद्ध पेट्रोल आणि डिझेलची निर्मिती, विमानांसाठी शुद्ध पेट्रोलची निर्मिती, ल्युब्रिकंट्सची निर्मिती असे अनेक प्रकल्प हाताळणार आहे. या प्रकल्पांद्वारे देशातील इंधनाद्वारे होणारे प्रदूषण कमी केले जाईल, असेही करारानंतर दोन्ही पार्टनरकडून सांगण्यात आले. आगामी २० वर्षांत भारत हा तेलाचा सर्वात मोठा ग्राहक होईल, असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर रिलायन्स बीपी मोबिलिटी लिमिटेड या  कंपनीची स्थापना झाली आहे. कंपनी देशातील ३० ते ४५ प्रमुख विमानतळांवर मुख्य इंधन पुरवठादार होण्यासाठी नियोजन करत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांसाठी लवकरच दर्जेदार बॅटरीची निर्मिती करणार असल्याचेही RBMLने सांगितले.

धीरुभाईंच्या स्वप्नाची पूर्तता

मुकेश अंबानी यांचे वडील आणि रिलायन्सचे संस्थापक धीरुभाई अंबानी आखाती देशात पेट्रोल पंपावर नोकरी करत होते. बीपी (पूर्वाश्रमीची ब्रिटिश पेट्रोलियम कंपनी), शेल अशा कंपन्यांची तेलाची पिंप बघून ते भारतात मोठा खासगी तेल उद्योग सुरू करण्याचे स्वप्न बघत होते. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली याच कंपन्यांपैकी बीपी सोबत Joint Venture करुन रिलायन्सने त्या स्वप्नाची पूर्तता केली.

जिओमध्ये गुंतवणूक करण्यासाठी झालेले बारा थेट विदेशी गुंतवणुकीचे करार (२०२०)

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समुहातील रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड कंपनीने एप्रिल ते जुलै दरम्यान १२ विदेशी गुंतवणूकदारांना २५.०९ टक्के मालकी हक्क विकून १,१७,५८८.४५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक मिळवली आहे. 

 1. २२ एप्रिल - फेसबुक  - ४३ हजार ५७४ कोटींच्या गुंतवणुकीद्वारे ९.९९ टक्के मालकी हक्कांची खरेदी
 2. ३ मे  - सिल्व्हर लेक इक्विटी फर्म - ५,६५५.७५ कोटींच्या गुंतवणुकीतून १.१५ टक्के मालकी हक्कांची खरेदी
 3. ६ जून - सिल्व्हर लेक इक्विटी फर्म - ४,५४६.८० कोटींची गुंतवणूक करुन आणखी ०.९३ टक्के मालकी हक्कांची खरेदी
 4. ८ मे - व्हिस्टा इक्विटी पार्टनर्स - ११,३६७ कोटींच्या गुंतवणुकीतून २.३२ टक्के मालकी हक्कांची खरेदी
 5. १७ मे - जनरल अटलांटिक - ६,५९८.३८ कोटींची गुंतवणूक करुन १.३४ टक्के मालकी हक्कांची खरेदी
 6. २२ मे - केकेआर - ११,३६७ कोटींच्या गुंतवणुकीतून २.३२ टक्के मालकी हक्कांची खरेदी
 7. ५ जून - मुबादला इन्व्हेस्‍टमेंट - ९,०९३.६० कोटींच्या गुंतवणुकीतून १.८५ टक्के मालकी हक्कांची खरेदी
 8. ७ जून - अबुधाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी - ५,६८३.५० कोटींच्या गुंतवणुकीतून १.१६ टक्के मालकी हक्कांची खरेदी
 9. १३ जून - टीपीजी - ४,५४६.८० कोटींची गुंतवणूक करुन ०.९३ टक्के मालकी हक्कांची खरेदी
 10. १३ जून - एल कॅटर्टन (L Catterton) - १,८९४.५० कोटींची गुंतवणूक करुन ०.३९ टक्के मालकी हक्कांची खरेदी
 11. १९ जून - पीआयएफने २.३२ टक्के मालकी हक्क खरेदीसाठी मोजले  ११,३६७ कोटी रूपये
 12. ३ जुलै - इंटेल कॅपिटल कंपनीने जिओचे ०.३९ टक्के मालकी हक्क १,८९४.५ कोटी रुपयांना विकत घेतले

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी