RIL shareholders to meet on May 2 for Jio Financial demerger : उद्योगपती मुकेश अंबानी यांचा रिलायन्स समूह आता आर्थिक सेवा क्षेत्रात उतरणार आहे. यासाठी रिलायन्स समूह जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लाँच करणार आहे. ही आर्थिक सेवा देणारी देशातली पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक असेल असा विश्वास रिलायन्स समुहाने व्यक्त केला आहे.
रिलायन्स शेअर होल्डर्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लाँच करत असल्याची औपचारिक घोषणा करणार आहे. याआधी मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात रिलायन्सने फायनान्शिअल सर्व्हिसेस लाँच करणार असल्याचे सूतोवाच केले होते. केले होते. आता रिलायन्स ही फायनान्शिअल सर्व्हिसेस लाँच करत आहे.
जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीच्या योजनांविषयी रिलायन्स शेअर होल्डर्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत थोडक्यात माहिती दिली जाईल. प्राथमिक अंदाजानुसार जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीचे बाजारमूल्य 90 हजार कोटी ते दीड लाख कोटी रुपये असण्याची शक्यता आहे. कंपनीच्या एका शेअरची किंमत 179 रुपये असेल असा अंदाज आहे.
भारतात एचडीएफसी बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक या चार मोठ्या खासगी वित्तसंस्थांनंतर पाचव्या स्थानी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस असेल असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत. याच वर्षी एचडीएफसी ही वित्तसंस्था एचडीएफसी बँकेत विलीन होणार आहे. यामुळे जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस देशातील चार मोठ्या खासगी वित्तसंस्थांमध्ये चौथ्या स्थानावर असेल, असाही अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहे.
जिओमुळे बजाज फायनान्स, पेटीएम आणि फोनपेच्या आर्थिक व्यवहारांवर परिणाम होईल असा अंदाज व्यक्त होत आहे. रिलायन्सचा कस्टमर बेस मोठा आहे. या बेसचा फायदा जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस या वित्तसंस्थेला होईल, असे मत अभ्यासक व्यक्त करत आहेत. तज्ज्ञांच्या मते आकारमानाचा विचार केल्यास जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस ही वित्तसंस्था पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा या दोन बँकांपेक्षा मोठी असेल.
जिओ टेलिकॉमची ग्राहक संख्या 42.6 कोटींपेक्षा जास्त आहे. तसेच जिओ टेलिकॉमची देशात 17 हजार 225 स्टोअर आहे. जिओच्या सर्व स्टोअरमध्ये मिळून दर महिन्याला 20 कोटींपेक्षा जास्त ग्राहक येत असतात. या ग्राहकांना जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस सेवांचा लाभ घेणे सोपे होणार आहे. इतरांनाही जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या सेवांचा फायदा घेता येईल. यामुळेच जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस ही वित्तसंस्था देशातली एक मोठी वित्तसंस्था होणार असल्याचे चित्र आहे.
अलिकडेच 'मेट्रो कॅश अँड कॅरी'वर ताबा मिळवण्यात जिओचे व्यवस्थापन यशस्वी झाले आहे. आता रिलायन्स समूह जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लाँच करत आहे. ज्यांच्याकडे रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर आहेत त्यांना एका शेअरवर एक शेअर या प्रमाणात जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचे शेअर मिळणार आहेत. ही प्रक्रिया सुरू करण्यासाठी 2 मे 2023 रोजी शेअर होल्डरच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय होतील असे वृत्त आहे. ही प्रक्रिया ठरल्याप्रमाणे पूर्ण झाली तर जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस सप्टेंबर 2023 पर्यंत शेअर बाजारात लिस्टेड होणार असल्याचे समजते.
अंबानींच्या पार्टीतले हे रुचकर पदार्थ बघून तोंडाला सुटेल पाणी
AI ने तयार केले दिग्गजांचे सेल्फी घेतानाचे फोटो