Richest Woman : भारतातील सर्वात श्रीमंत महिला (Richest Woman) होण्याचा बहुमान यंदा रोशनी मलहोत्रा (Roshani Malhotra) यांनी सलग दुसऱ्या वर्षी (Second year) पटकावला आहे. एचसीएल टेक्नॉलॉजीजच्या (HCL Technologies) उत्तराधिकारी रोशनी यांच्या नावे तब्बल 84 हजार 330 कोटींची मालमत्ता आहे. या यादीत दुसरं स्थान पटकावलं आहे. ई-कॉमर्स फर्म असणाऱ्या Nykaa च्या संस्थापक फाल्गुनी नायर यांनी. बायोकॉनच्या किरण मुजुमदार-शॉ या गेल्या वर्षी दुसऱ्या स्थानी होत्या. मात्र यंदा नायर यांनी त्यांना मागे टाकलं आहे. नायर यांच्या नावे सध्या 57,520 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
कोटक प्रायव्हेट बँकिंग हरून यांच्याकडून दरवर्षी भारतातील सर्वात श्रीमंत महिलांच्या नावांची यादी जाहीर केली जाते. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी महिलांच्या सरासरी संपत्तीत झालेली वाढ ही 300 कोटी असल्याचं समोर आलं आहे. गेल्या वर्षी हा आकडा 100 कोटी एवढा नोंदवला गेला आहे. 2021 मध्ये श्रीमंतांच्या यादीत असणाऱ्या महिलांची सरासरी संपत्ती ही 4,170 कोटी रुपयांच्या घऱात आहे. गेल्या वर्षी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात श्रीमंत महिलांच्या यादीतील सरासरी संपत्तीचा आकडा हा 2,725 कोटी रुपये होता.
अधिक वाचा - Sanjay Raut : महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्ता परिवर्तन झालं तरी मला आश्चर्य वाटणार नाही- संजय राऊत
भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत असणाऱ्यांच्या तुलनेत महिलांकडे असणारी संपत्ती मात्र कमी आहे. भारतातील टॉप 100 श्रीमंत महिलांची संपत्ती ही देशाच्या जीडीपीच्या तुलनेत 2.8 टक्के आहे. मात्र देशातील टॉप 100 (महिला व पुरुष) श्रीमंतांच्या यादीचा विचार केला, तर या यादीत असणाऱ्यांची संपत्ती ही देशाच्या जीडीपीच्या 39 टक्के आहे.
अधिक वाचा - ४५ वर्षीय करोडपती महिलेने १४ वर्षीय मुलासोबत जबरदस्ती ठेवले शारीरिक संबंध आणि मग घडलं असं की...
देशातील टॉप 100 श्रीमंत महिलांच्या यादीत व्यवस्थापनाचं काम कऱणाऱ्या तीन महिलांचा समावेश आहे. यामध्ये पेप्सिको कंपनीच्या सीईओ इंद्रा नुयी यांच्या नावे 5,040 कोटींची संपत्ती आहे. एचडीएफसीच्या व्यवस्थापकीय संचालक रेणू सूद कर्नाड यांच्या नावे 870 कोटी तर कोटक महिंद्रा बँकेच्या शांती एकंबरम यांच्या नावे 320 कोटींची संपत्ती आहे. या यादीत यंदा 25 नव्या चेहऱ्यांचा समावेश झाला आहे. Confluent या स्ट्रिमिंग डाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या को-फाउंडर नेहा नारखेडे यांच्या नावे 13,380 कोटींची संपत्ती आहे.
या यादीत स्टार्ट अप फाउंडर महिलांनादेखील स्थान पटकावलं आहे. त्यामध्ये Byju’s च्या दिव्या गोकूळनाथ (36), बिझनेसच्या ऋचा कालरा (38), यांच्या नावे अनुक्रमे 4,550 आणि 2,600 कोटींच्या संपत्तीची नोंद झाली आहे. भारतात महिला प्रगती करत असल्याचं हे लक्षण मानलं जात असून देशातील महिलांसाठी ही बाब प्रेरणादायी आहे.