Multibagger Stock | या पेनीस्टॉकने एका वर्षात १ लाखाचे केले ८३ लाख, छप्परफाड कमाई

Investment in Penny Stock : गेल्या दीड वर्षात असे अनेक शेअर्स आले आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. अनेक छोटे शेअर्स मल्टीबॅगर स्टॉक्स (Multibagger Stock) झाले आहे. पेनी स्टॉकनेही गुंतवणूकदारांचे खिसे भरण्यात मोठा हातभार लावला आहे. असाच एक पेनी स्टॉक (Penny stock) म्हणजे डिग्जम (Digjam Ltd), जो गेल्या एका वर्षात मल्टीबॅगर ठरला आहे. सरलेल्या वर्षात म्हणजे २०२१ मध्ये शेअर बाजारात गुंतवणुकदारांनी तुफान कमाई केली.

Multibagger Penny stock
तुफान कमाई करून देणारा पेनी स्टॉक 
थोडं पण कामाचं
  • या पेनी स्टॉकने दिला ८३०० टक्क्यांचा परतावा
  • डिग्जॅम लि.च्या शेअरला लागले अप्पर सर्किट
  • छोट्या गुंतवणुकीतून गुंतवणुकदारांनी केली जबरदस्त कमाई

Multibagger stock 2022: मुंबई : कोरोना महामारीच्या काळात भारतीय शेअर बाजाराने (Share Market) गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. गेल्या दीड वर्षात असे अनेक शेअर्स आले आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. अनेक छोटे शेअर्स मल्टीबॅगर स्टॉक्स (Multibagger Stock) झाले आहे. पेनी स्टॉकनेही गुंतवणूकदारांचे खिसे भरण्यात मोठा हातभार लावला आहे. असाच एक पेनी स्टॉक (Penny stock) म्हणजे डिग्जम (Digjam Ltd), जो गेल्या एका वर्षात मल्टीबॅगर ठरला आहे. सरलेल्या वर्षात म्हणजे २०२१ मध्ये शेअर बाजारात  गुंतवणुकदारांनी तुफान कमाई केली. या काळात शेअर बाजारात चढउतारही आले. मागील वर्ष शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी कमाईचे ठरले. गुंतवणुकदारांनी या वर्षभरात अभूतपूर्व कमाई केली आहे. (Rs 1 Lakh invested in the Multibagger stock of Digjam Ltd turned into Rs 83 Lakhs in 1 year)

डिग्जॅम लि.च्या शेअरने दिला ८३०० टक्क्यांचा परतावा

वस्त्रोद्योगाशी संबंधित डिग्जॅम लि. चा (Share price of Digjam Ltd) शेअर एका वर्षापेक्षा कमी कालावधीत ३.८० रुपयांवरून ३२८ रुपयांपर्यंत वाढला आहे. या दरम्यान या शेअरमध्ये जवळपास ८३०० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. १ फेब्रुवारी २०२१ रोजी हा स्टॉक ३.८० रुपयांच्या पातळीवर होता. ७ जानेवारी २०२२ रोजी बंद झालेल्या सत्रात डिग्जमचा स्टॉक ३२८ रुपयांच्या पातळीवर वाढला आहे. या मल्टीबॅगर शेअरने (Multibagger Stock)गुंतवणुकदारांना मोठी संपत्ती कमावण्याची संधी दिली आहे. यावर्षी छोट्या आणि मध्यम श्रेणीतील शेअर्सनी मोठा परतावा दिला आहे. शेअर बाजारातील तेजी छोट्या आणि मध्यम श्रेणीतील शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांच्या फायद्याची ठरली आहे. कंपनीची स्थापना २०१५ मध्ये झाली होती.

१ लाखाचे झाले ८३ लाख

गेल्या दीड महिन्यातील या समभागावर नजर टाकली तर तो प्रति शेअर ६० रुपयांवरून ३१५ रुपयांपर्यंत वाढला आहे. या काळात त्यात ५०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. शेअर्समध्ये झपाट्याने वाढ झाल्याने गुंतवणूकदार श्रीमंत झाले आहेत. जर तुम्ही १ फेब्रुवारी २०२१ रोजी या स्टॉकमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे ८३ लाख रुपये झाले असते. डिग्जामच्या शेअरला सध्या अप्पर सर्किट लागले आहे. अजूनही हा शेअर मोठी तेजी दाखवतो आहे.

पेनी स्टॉक्स म्हणजे काय?

पेनी स्टॉक हे अत्यंत कमी मूल्याचे शेअर्स असतात. भारतीय शेअर बाजारातील पेनी स्टॉक्समध्ये १० रुपयांच्या खाली असलेल्या शेअर्सचा समावेश होतो. तर पाश्चात्य बाजारात, ५ डॉलरच्या खाली असलेल्या स्टॉकला पेनी स्टॉक म्हणतात. या प्रकारच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे अत्यंत जोखमीचे मानले जाते. पण गेल्या दीड वर्षात काही पेनी स्टॉक्सनी भारतीय बाजारात जबरदस्त परतावा दिला आहे.

शेअर बाजाराची हवा

मागील वर्षी सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांकांनी आपली आतापर्यतची उच्चांकी पातळी नोंदवली आहे. मागील काही आठवड्यात झालेल्या घसरणीमुळे हे दोन्ही निर्देशांक उच्चांकीवरून मागे फिरले आहेत. मात्र अजूनही शेअर बाजारात तेजी दिसून येते आहे. अर्थात हा आठवडा शेअर बाजारासाठी फारसा चांगला गेला नाही. सुरूवातीला झालेल्या घसरणीनंतर बाजार पुन्हा सावरला. मात्र चढ उतारांचा सिलसिला सुरू आहे. परकी गुंतवणुकदारांनी भारतीय शेअर बाजारातून मागील दोन महिन्यात मोठी रक्कम काढून घेतली असली तरी देशांतर्गत गुंतवणुकदारांच्या पैशाच्या जोरावर बाजारातील तेजी टिकून आहे. तरुण गुंतवणुकदार आणि नवीन गुंतवणुकदार वर्षभरात मोठ्या प्रमाणात बाजाराकडे आकर्षित झाले आहेत. मागील एका वर्षात मोठ्या संख्येने डीमॅट खाती सुरू झाली आहेत. 

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी