Multibagger Stock | जबरदस्त ! हा छोटासा शेअर आहे पैशांची खाण... एक लाखाच्या गुंतवणुकीचे झाले ४ कोटी ३२ लाख, घोडदौड सुरूच...

Penny Stock : जीआरएम ओव्हरसीज (GRM Overseas) या कंपनीच्या शेअरनेदेखील गुंतवणुकदारांना आयुष्यभराची कमाई करून दिली आहे. या मल्टीबॅगर शेअरने (Multibagger stock) गुंतवणुकदारांना कल्पनेपलीकडचा परतावा दिला आहे. १.९० रुपयांचा हा शेअर सध्या ८२१.५० रुपये प्रति शेअरच्या पातळीवर पोचला आहे. या दहा वर्षात हा शेअर ४३२ पटींनी वाढला आहे. जीआरएम ओव्हरसीजच्या शेअरने या कालावधीत ४३,१३६ टक्क्यांचा प्रचंड परतावा गुंतवणुकदारांना दिला आहे.

Multibagger Penny Stock
मल्टीबॅगर पेनी स्टॉक 
थोडं पण कामाचं
  • या पेनीस्टॉकने १० वर्षात दिला ४३,१३६ टक्क्यांचा परतावा
  • १.९० रुपयांचा शेअर पोचला ८२१ रुपयांवर
  • एक लाखाच्या गुंतवणुकीचे मूल्य झाले ४.३२ कोटी रुपये

Multibagger Penny Stock : मुंबई : शेअर बाजारात (Share Market) पेनी स्टॉक हे एखाद्या छुप्या हिऱ्याप्रमाणेप्रमाणेच असतात. एखाद्या दमदार पेनी स्टॉकमधील गुंतवणुक रंकाला राजा बनवू शकते. जर त्या कंपनीचे बिझनेस मॉडेल चांगले असेल आणि कंपनीची आर्थिक कामगिरी दीर्घकालावधीसाठी चांगली दिसत असेल तर अशा शेअर्समधील गुंतवणूक ही तुमच्यासाठी पैशांची खाण ठरू शकते. जीआरएम ओव्हरसीज (GRM Overseas) या कंपनीच्या शेअरनेदेखील गुंतवणुकदारांना आयुष्यभराची कमाई करून दिली आहे. या मल्टीबॅगर शेअरने (Multibagger stock) गुंतवणुकदारांना कल्पनेपलीकडचा परतावा दिला आहे. १.९० रुपयांचा हा शेअर सध्या ८२१.५० रुपये प्रति शेअरच्या पातळीवर पोचला आहे. (Rs 1 Lakh invested in the Multibagger stock of GRM Overseas have become Rs 4 crore 32 Lakhs 10 years)

जीआरएम ओव्हरसीजच्या शेअरने दिला तब्बल ४३,१३६ टक्क्यांचा परतावा

जीआरएम ओव्हरसीज या कंपनीचा शेअर मल्टीबॅगर ठरला आहे. या शेअरने मागील दहा वर्षात छप्परफाड परतावा दिला आहे. १० वर्षांपूर्वी हा शेअर १.९० रुपये प्रति शेअरच्या (Share price of GRM Overseas)पातळीवर होता. सध्या हा शेअर ८२१.५० रुपयांवर पोचला आहे. आजही या शेअरला अप्पर सर्किट लागले आहे. या दहा वर्षात हा शेअर ४३२ पटींनी वाढला आहे. जीआरएम ओव्हरसीजच्या शेअरने या कालावधीत ४३,१३६ टक्क्यांचा प्रचंड परतावा गुंतवणुकदारांना दिला आहे.

एक लाखाच्या गुंतवणुकीचे झाले ४ कोटी ३२ लाख

जीआरएम ओव्हरसीजच्या शेअरने धुवॉंधार बॅटिंग करत गुंतवणुकदारांना श्रीमंत बनवले आहे. अगदी १ लाखाच्या गुंतवणुकीने गुंतवणुकदार करोडपती झाले आहे. मागील दहा वर्षात या शेअरमध्ये गुंतवलेल्या १ लाख रुपयांचे मूल्य आज ४ कोटी ३२ लाख रुपये इतके आहे. तर महिनाभरात १ लाखाचे १.६० लाख झाले आहेत. सहा महिन्यात या शेअरने १ लाखाचे ५ लाख केले आहेत. वर्षभरात या शेअरमध्ये गुंतवलेल्या १ लाख रुपयांचे मूल्य आज २४ लाख रुपयांच्या आसपास झाले आहे. ५ वर्षापूर्वी तुम्ही जर जीआरएम ओव्हरसीजच्या शेअरमध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज तुमच्या हाती १.७४ कोटी रुपये असते.

वर्षभरापासून जबरदस्त तेजीत

मागील एका महिन्यातच हा शेअर ५०५ रुपयांवरून ८२१ रुपयांवर पोचला आहे. जवळपास ६० टक्क्यांचा परतावा या शेअरने ३० दिवसात दिला आहे. तर मागील सहा महिन्यात या शेअरने ४०० टक्क्यांपेक्षाही जास्त परतावा दिला आहे. १५६ रुपयांवरून ८२१ रुपयांपर्यतची तेजी या शेअरने दाखवली आहे. मागील फक्त एका वर्षातच या शेअरने २,२०० टक्क्यांचा दणदणीत परतावा दिला आहे. वर्षभरापूर्वी ३४ रुपयांवर असणारा हा शेअर ८०० रुपयांच्या पार झाला आहे.

पेनी स्टॉकमधील गुंतवणूक

मात्र पेनी स्टॉकमधील गुंतवणूक (Investment in Penny Stock) ही जोखमीची असते. खास करून जेव्हा तुम्ही दीर्घकालावधीसाठी गुंतवणूक करत असता तेव्हा जोखीम जास्त असते. कारण पेनी स्टॉकमध्ये व्यवहार तुलनेने कमी होतात. यात खरेदी-विक्रीसाठी उपलब्ध शेअर्सची संख्या कमी असते आणि तुलनेने फार थोड्या लोकांकडे मोठ्या संख्येने शेअर्स असतात. मात्र जर त्या कंपनीचे बिझनेस मॉडेल चांगले असेल आणि कंपनीची आर्थिक कामगिरी दीर्घकालावधीसाठी चांगली दिसत असेल तर अशा शेअर्समधील गुंतवणूक ही तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी