Multibagger Stock 2022 update : मुंबई : मागील वर्षी उच्चांकी पातळी गाठलेला शेअर बाजार (Share Market)सध्या चढउतार नोंदवतो आहे. मागील आठवडाभरात बाजारात घसरण झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक खाली आले आहेत. मात्र या अभूतपूर्व वर्षभरात शेअर बाजाराच्या घोडदौडीत काही शेअर्सनी जबरदस्त तेजी दाखवत मोठा परतावा दिला आहे. एखाद्या दमदार स्टॉकमध्ये संयमाने केलेली गुंतवणुक ही तुम्हाला मोठी कमाई करून देऊ शकते. जिंदाल फोटो लि. (Jindal Photo Limited) या कंपनीच्या शेअरनेदेखील गुंतवणुकदारांना आयुष्यभराची कमाई करून दिली आहे. या मल्टीबॅगर शेअरने (Multibagger stock) गुंतवणुकदारांना दणदणीत परतावा दिला आहे. (Rs 1 Lakh invested in the Multibagger stock of Jindal Photo Limited have become Rs 15 Lakhs 1 year)
जिंदाल फोटो या कंपनीचा शेअर मल्टीबॅगर ठरला आहे. या शेअरने मागील १ वर्षात छप्परफाड परतावा दिला आहे. २२ जानेवारी २०१९ हा शेअर २८.५५ रुपये प्रति शेअरच्या (Share price of Jindal Photo Limited)पातळीवर होता. सध्या हा शेअर ४०७.६५ रुपयांवर पोचला आहे. अजूनही या शेअरमध्ये तेजी दिसते आहे. या वर्षभरात हा शेअर जवळपास १४.५ पट वाढला आहे. जिंदाल फोटोच्या शेअरने या कालावधीत १,३५३ टक्क्यांचा प्रचंड परतावा गुंतवणुकदारांना दिला आहे.
या कंपनीच्या शेअर्सने प्रत्येक गुंतवणूकदाराचे पैसे कमावण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. जिंदाल फोटोचे शेअर्स गेल्या एका वर्षात जवळपास १५ पटीने वाढले आहेत सोप्या शब्दात, जर एखाद्याने वर्षापूर्वी जिंदाल फोटोच्या शेअर्समध्ये १ लाख रुपये गुंतवले असतील, तर त्यांचे गुंतवणुकीचे मूल्य आज जवळपास १५ लाख रुपये असते. डिसेंबर २०२१ मध्ये या शेअरच्या किंमतीत मोठी घसरण झाली होती. मात्र पुन्हा एकदा या शेअरमध्ये जबरदस्त तेजी आली आहे. या शेअरला अप्पर सर्किटदेखील लागले आहे.
कंपनीची स्थापना २००४ मध्ये झाली होती. जिंदाल फोटो ही कंपनी जिंदाल समूहातील आघाडीची कंपनी आहे.
मागील काही आठवड्यात झालेल्या घसरणीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक उच्चांकीवरून मागे फिरले आहेत. तरुण गुंतवणुकदार आणि नवीन गुंतवणुकदार वर्षभरात मोठ्या प्रमाणात बाजाराकडे आकर्षित झाले आहेत. मागील एका वर्षात मोठ्या संख्येने डीमॅट खाती सुरू झाली आहेत. तरुण गुंतवणुकदार आणि नवीन गुंतवणुकदार वर्षभरात मोठ्या प्रमाणात बाजाराकडे आकर्षित झाले आहेत. मागील एका वर्षात मोठ्या संख्येने डीमॅट खाती सुरू झाली आहेत. घसरणीनंतर मागील काही दिवसात बाजार पुन्हा सावरला आहे.
(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.)