Multibagger Stock | या केमिकल कंपनीच्या ६४ पैशांच्या शेअरने १ लाखाचे केले १७ कोटी, पिढ्यानपिढ्यांची कमाई

Investment in Multibagger: ज्योती रेझिन्सचा (Share price of Jyoti Resins) शेअर १७ वर्षांच्या कालावधीत ६४ पैशांवरून १,१४० रुपयांपर्यंत वाढला आहे. या दरम्यान या शेअरमध्ये जवळपास १,७८,०२५ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. १६ जानेवारी २००४ ला हा स्टॉक ६४ पैशांच्या रुपयांच्या पातळीवर होता. तर आज दिवसअखेर बाजार बंद झालेल्या सत्रात ज्योती रेझिन्सचा स्टॉक १,१४० रुपयांच्या पातळीवर वाढला आहे.

Multibagger Stock
मल्टीबॅगर शेअर 
थोडं पण कामाचं
  • या पेनी स्टॉकने दिला १,७८,०२५ टक्क्यांचा परतावा
  • ज्योती रेझिन्सच्या शेअरने करून दिली पिढ्यानपिढ्यांची कमाई, लाखाचे झाले कोट्यवधी
  • या शेअरच्या किंमतीत झाली १७८१ पट वाढ

Multibagger stock 2022: मुंबई : कोरोना महामारीच्या काळात भारतीय शेअर बाजाराने (Share Market) गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. गेल्या दीड वर्षात असे अनेक शेअर्स आले आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. अनेक छोटे शेअर्स मल्टीबॅगर स्टॉक्स (Multibagger Stock) झाले आहे. पेनी स्टॉकनेही गुंतवणूकदारांचे खिसे भरण्यात मोठा हातभार लावला आहे. मात्र काही शेअर्स असे आहेत ज्यांनी दीर्घकालावधीत गुंतवणुकदारांना आयुष्यभराची कमाई करून दिली आहे. असाच एक पेनी स्टॉक (Penny stock) म्हणजे ज्योती रेझिन्स (Jyoti Resins) या केमिकल कंपनीचा. हा पेनीस्टॉक १७ वर्षात मल्टीबॅगर ठरला आहे. (Rs 1 Lakh invested in the Multibagger stock of Jyoti Resins turned into Rs 17 crore in 17 years)

ज्योती रेझिन्सच्या शेअरने दिला १,७८,०२५ टक्क्यांचा परतावा

ज्योती रेझिन्सचा (Share price of Jyoti Resins) शेअर १७ वर्षांच्या कालावधीत ६४ पैशांवरून १,१४० रुपयांपर्यंत वाढला आहे. या दरम्यान या शेअरमध्ये जवळपास १,७८,०२५ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. १६ जानेवारी २००४ ला हा स्टॉक ६४ पैशांच्या रुपयांच्या पातळीवर होता. तर आज दिवसअखेर बाजार बंद झालेल्या सत्रात ज्योती रेझिन्सचा  स्टॉक १,१४० रुपयांच्या पातळीवर वाढला आहे. या मल्टीबॅगर शेअरने (Multibagger Stock)गुंतवणुकदारांना प्रचंड संपत्ती कमावण्याची संधी दिली आहे. शेअर बाजारातील तेजी छोट्या आणि मध्यम श्रेणीतील शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांच्या फायद्याची ठरली आहे. कंपनीची स्थापना १९९३ मध्ये झाली होती. ही एक केमिकल क्षेत्रातील कंपनी आहे.

१ लाखाचे झाले १७.८१ कोटी रुपये

मागील १७ वर्षात हा शेअर ६४ पैसे प्रति शेअरवरून १,१४० रुपयांपर्यंत वाढला आहे. या काळात त्यात १,७८,०२५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. हा शेअर या कालावधीत १७८१ पट वाढला आहे. शेअर्समध्ये मोठी वाढ झाल्याने गुंतवणूकदार श्रीमंत झाले आहेत. जर तुम्ही१६ जानेवारी २००४ रोजी या स्टॉकमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे १७.८१ लाख रुपये झाले असते. 

पेनी स्टॉक्स म्हणजे काय?

पेनी स्टॉक हे अत्यंत कमी मूल्याचे शेअर्स असतात. भारतीय शेअर बाजारातील पेनी स्टॉक्समध्ये १० रुपयांच्या खाली असलेल्या शेअर्सचा समावेश होतो. तर पाश्चात्य बाजारात, ५ डॉलरच्या खाली असलेल्या स्टॉकला पेनी स्टॉक म्हणतात. या प्रकारच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे अत्यंत जोखमीचे मानले जाते. पण गेल्या दीड वर्षात काही पेनी स्टॉक्सनी भारतीय बाजारात जबरदस्त परतावा दिला आहे.

सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांकांनी आपली आतापर्यतची उच्चांकी पातळी नोंदवली आहे. मागील काही आठवड्यात झालेल्या घसरणीमुळे हे दोन्ही निर्देशांक उच्चांकीवरून मागे फिरले आहेत. तरुण गुंतवणुकदार आणि नवीन गुंतवणुकदार वर्षभरात मोठ्या प्रमाणात बाजाराकडे आकर्षित झाले आहेत. मागील एका वर्षात मोठ्या संख्येने डीमॅट खाती सुरू झाली आहेत. तरुण गुंतवणुकदार आणि नवीन गुंतवणुकदार वर्षभरात मोठ्या प्रमाणात बाजाराकडे आकर्षित झाले आहेत. मागील एका वर्षात मोठ्या संख्येने डीमॅट खाती सुरू झाली आहेत. घसरणीनंतर मागील काही दिवसात बाजार पुन्हा सावरला आहे.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.)
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी