Multibagger Stock | या शेअरची किंमत ३६ रुपयांवरून पोचली ९४० रुपयांवर, दिला २,५०० टक्क्यांचा परतावा, जबरदस्त कमाई

Investment in Multibagger Stock : गेल्या वर्षी ४ जानेवारी ०२१ रोजी एक्सप्रो इंडियाच्या शेअरमध्ये (Xpro India)गुंतवलेले १ लाख रुपये आज २५.९६ लाख रुपये झाले असते. एक्सप्रो इंडिया या शेअरने (Xpro India) एका वर्षात त्याच्या भागधारकांना जवळपास २,५०० टक्के परतावा दिला आहे. एक्सप्रो इंडियाचा शेअर मल्टीबॅगर ठरला आहे. हा शेअर ४ जानेवारी २०२१ रोजी ३६.२० रुपयांवर होता. तो वाढून आज ९४० रुपयांवर पोचला आहे.

Multibagger Stock
मल्टीबॅगर शेअर 
थोडं पण कामाचं
  • या शेअरनेने दिला २५०० टक्क्यांचा परतावा
  • एक्सप्रो इंडियाच्या शेअरची जबरदस्त घोडदौड
  • एक लाखाचे झाले २५ लाख रुपये

Multibagger stock 2022: मुंबई : दीड भारतीय शेअर बाजाराने (Share Market) गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. गेल्या दीड वर्षात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. अनेक छोटे शेअर्स मल्टीबॅगर स्टॉक्स (Multibagger Stock) झाले आहे. एक्सप्रो इंडिया या शेअरने (Xpro India) एका वर्षात त्याच्या भागधारकांना जवळपास २,५०० टक्के परतावा दिला आहे. एक्सप्रो इंडियाचा शेअर मल्टीबॅगर ठरला आहे. हा शेअर ४ जानेवारी २०२१ रोजी ३६.२० रुपयांवर होता. तो वाढून आज ९४० रुपयांवर पोचला आहे. मागील १२ महिन्यांत या शेअरने २,४६९ टक्क्यांचा तूफान परतावा गुंतवणुकदारांना दिला आहे. त्या तुलनेत सेन्सेक्स या कालावधीत फक्त २३.६१ टक्क्यांनीच वाढला आहे. (Rs 1 Lakh invested in the Multibagger stock of Xpro India turned into Rs 25 Lakhs 1 year)

१ लाखाचे झाले २५.९६ लाख

गेल्या वर्षी ४ जानेवारी ०२१ रोजी एक्सप्रो इंडियाच्या शेअरमध्ये (Xpro India)गुंतवलेले १ लाख रुपये आज २५.९६ लाख रुपये झाले असते. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर ९३७.३५ रुपयांवर बंद होण्याआधी या स्मॉल कॅप स्टॉकने ४.९४ टक्क्यांनी घसरून ८९१ रुपयांच्या इंट्राडे नीचांकी पातळी गाठली. एक्सप्रो इंडियाच्या शेअरची (Xpro India)किंमत ५० दिवस, १०० दिवस आणि २०० दिवसांच्या मूव्हिंग सरासरीपेक्षा जास्त पण ५ दिवस आणि २० दिवसांच्या मूव्हिंग सरासरीपेक्षा कमी आहे.

कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न

सप्टेंबर २०२१ ला संपलेल्या तिमाहीत, १० प्रवर्तकांकडे ५०.०२ टक्के शेअर्स किंवा ५९.०९ लाख शेअर्स आणि२१,२०५ सार्वजनिक भागधारकांकडे कंपनीचे ४.९८ टक्के शेअर्स किंवा ५९.०४ लाख शेअर्स आहेत. २०,७५० सार्वजनिक भागधारकांकडे २ लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक भाग भांडवल होते आणि सप्टेंबर तिमाहीच्या शेवटी २४.१५ लाख शेअर्स किंवा २०.४५ % स्टेक होते. सप्टेंबर तिमाहीत २३ भागधारकांचे वैयक्तिक भाग भांडवल रु. २ लाखांपेक्षा जास्त होते. दोन परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी फर्ममध्ये ०.०१ टक्के हिस्सा किंवा ११,२४१ शेअर्स ठेवले आहेत. सप्टेंबर तिमाहीच्या अखेरीस ११ वित्तीय संस्थांकडे १,४२२ समभाग होते.

कंपनीची आर्थिक कामगिरी

आर्थिक कामगिरी फर्मच्या स्टॉकमधील बंपर वाढीच्या दिशेने होते आहे. तथापि, BSE ने स्टॉकला ASM LT स्टेज IV श्रेणी अंतर्गत ठेवले आहे ज्याचा स्टॉक व्यवहार करण्यापूर्वी विचार केला पाहिजे.  फर्मने मार्च २०२१ ला संपलेल्या आर्थिक वर्षात निव्वळ नफ्यात १,९८७ टक्क्यांनी वाढ नोंदवली. मार्च २०२० आर्थिक वर्षातील ०.४० कोटी नफ्याच्या तुलनेत गेल्या आर्थिक वर्षात निव्वळ नफा वाढून ८.३५ कोटी रुपये झाला.  मार्च २०२० आर्थिक वर्षातील ३५४.८४कोटी विक्रीच्या तुलनेत गेल्या आर्थिक वर्षात विक्री ५.२२ टक्क्यांनी वाढून ३७३.३५ कोटी रुपये झाली. सप्टेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा १०५.६९ टक्क्यांनी वाढून १०.८४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत ५.२७ कोटी रुपयांच्या नफ्यावर होता. कंपनीची विक्री सप्टेंबर २०२१ ला संपलेल्या तिमाहीत २९.५८टक्क्यांनी वाढून रु. १२६.५५ कोटी झाली आहे, ज्याची विक्री गेल्या आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत रु. ९७.६६ कोटी होती. तिमाही-दर-तिमाही आधारावर, जून तिमाहीत निव्वळ नफा रु. ५.०२ कोटींवरून ११५.९४ % वाढला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत विक्री रु. ९१.१२ कोटींवरून ३८.८८ % वाढली आहे.

Xpro इंडिया ही बिर्ला समूहाची फर्म आहे, जी रेफ्रिजरेटर्ससाठी कॅपेसिटर आणि लाइनर्ससाठी पॅकेजिंग साहित्य तयार करण्यात गुंतलेली आहे. सध्या, भारतात कॅपेसिटरसाठी पॅकेजिंग मटेरियल बनवणारी ही एकमेव फर्म आहे आणि व्यवसाय भांडवल-केंद्रित असल्यामुळे कोणताही प्रतिस्पर्धी नाही.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी