Cryptocurrency Investment | या क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवलेल्या ५०० रुपयांचे सातच दिवसात झाले तब्बल १,५०० कोटी रुपये, कसे ते पाहा

Wealth creation : मागील काही दिवसात क्रिप्टोकरन्सीमध्ये जबरदस्त घसरण झाली आहे. मात्र तरीही क्रिप्टोकरन्सीकडे (Cryptocurrency) अनेकजण गुंतवणुकीचा जबरदस्त पर्याय आणि मोठी संपत्ती उभारण्याचे साधन म्हणून पाहतात. थोडेसे पैसे गुंतवून चटकन मोठा परतावा मिळत मोठी रक्कम कमावण्यासाठी अनेकजण क्रिप्टोकरन्सीकडे वळत असतात. अशीच एक क्रिप्टोकरन्सी आहे जिने फक्त सातच दिवसात तब्बल २.९ अब्ज टक्के परतावा देत गुंतवणुकदारांना राजा बनवले आहे.

Cryptocurrency Investment
क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणूक 
थोडं पण कामाचं
  • सात दिवसांत २.९ अब्ज टक्के परतावा
  • क्रिप्टो मार्केटमध्ये होऊ शकते रिकव्हरी
  • एकता अजूनही सार्वकालिक उच्चांकीपेक्षा खाली आहे

Bumper Return from Cryptocurrency : नवी दिल्ली :  क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक (Cryptocurrency Investment) करणे नेहमीच धोक्याचे असते. ती कधी वर जाईल, कधी घसरेल हे सांगणेही अवघड आहे. त्याचा बाजार जितका वेगाने वर जातो तितकाच तो खाली जातो. मागील काही दिवसात तर क्रिप्टोकरन्सीमध्ये जबरदस्त घसरण झाली आहे. मात्र तरीही क्रिप्टोकरन्सीकडे (Cryptocurrency) अनेकजण गुंतवणुकीचा जबरदस्त पर्याय आणि मोठी संपत्ती उभारण्याचे साधन म्हणून पाहतात. थोडेसे पैसे गुंतवून चटकन मोठा परतावा मिळत मोठी रक्कम कमावण्यासाठी अनेकजण क्रिप्टोकरन्सीकडे वळत असतात. अशीच एक क्रिप्टोकरन्सी आहे जिने फक्त सातच दिवसात तब्बल २.९ अब्ज टक्के परतावा देत गुंतवणुकदारांना राजा बनवले आहे. (Rs 500 invested in Ekta has become Rs 1,500 crore with bumper returns)

सात दिवसांत दिलेला अभूतपूर्व परतावा

दरम्यान, असेच एक क्रिप्टो टोकन (Crypto Token) समोर आले आहे, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना घसघशीत परतावा दिला आहे. त्याच्या परताव्याची माहिती मिळाल्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. या क्रिप्टोचे नाव 'एकता' (Ekta)आहे. या क्रिप्टो टोकनबद्दल अजून फारशी माहिती समोर आलेली नाही, परंतु गेल्या सात दिवसांत याने आश्चर्यकारक परतावा दिला आहे. एकता (Ekta)या क्रिप्टोकरन्सीने गुंतवणुकदारांना रंकाचा राजा बनवले आहे.

५०० रुपयांचे जेव्हा १,५०० कोटी होतात 

Coinmarketcap.com ने दिलेल्या माहितीनुसार, 'एकता' या क्रिप्टो टोकनने काही दिवसांपूर्वीच सात दिवसांत गुंतवणूकदारांना सुमारे २.९ अब्ज टक्के परतावा दिला आहे. याचा अर्थ असा की जर तुम्ही आठवड्याभरापूर्वी फक्त 500 रुपये गुंतवले असते तर आज ते सुमारे १,५०० कोटी झाले असते.

उपलब्ध माहितीनुसार, ही एक ब्लॉकचेन आहे जी भौतिक मालमत्ता आणि समुदायांना ऑन-चेन बनविण्यावर केंद्रित असलेले ब्लॉकचेन आहे. या टोकनची सार्वजनिक सूची लवकरच होणार आहे. आतापर्यंत, सीड फंडिंग आणि खाजगी विक्रीतून ५० लाख डॉलरपेक्षा जास्त जमा करण्यात यशस्वी झाले आहे. 'एकता'ने आठवडाभरात आश्चर्यकारक परतावा दिला असला तरीही, तो अजूनही त्याच्या जुन्या सार्वकालिक उच्चांकाच्या खाली आहे. क्रिप्टो मार्केटमध्ये या टोकनचा वाटा खूपच कमी आहे. त्याचे mcap (Ekta Coin MCap) ५० लाख डॉलर्सपेक्षा कमी आहे.

क्रिप्टोकरन्सीमधील घसरण ्आणि नीचांकी पातळी

क्रिप्टोकरन्सीमधील चढउतारांकडे बोट दाखवत तज्ज्ञांनी म्हटले आहे की क्रिप्टोकरन्सी किती जोखमीची आहे आणि यात किती अनपेक्षित गोष्टी घडू शकतात याची सध्याच्या स्थितीवरून कल्पना येते. फेडरल रिझव्‍‌र्हच्या धोरणानंतर डिजिटल-अॅसेट स्पेसमध्ये क्रिप्टोकरन्सी आणि स्टॉक दोघांच्या बाबतीत एक दमदार थीम उदयास आली आहे. क्रिप्टोकरन्सीने आणि शेअर बाजार या दोन्ही जोखमीच्या गुंतवणूक पर्यायांनी अलीकडच्या काळात एक नवीन टप्पा ओलांडला आहे. आगामी काळात क्रिप्टोकरन्सीच्या मूल्याकडे जगाचे लक्ष असणार आहे. युक्रेनवर रशियन हल्ल्याच्या (Ukraine conflict) भीतीने जगभरातील जोखमीच्या गुंतवणूक प्रकारातील विक्री वाढल्याने बिटकॉइन (Bitcoin) सोमवारी जवळपास 9% घसरून सहा महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळीवर आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी