आज रात्री १२ वाजेपासून १४ तासांसाठी पैसे ट्रान्सफर करण्याची 'ही' सुविधा बंद राहणार, कारण जाणून घ्या

काम-धंदा
Updated Apr 17, 2021 | 13:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

आरटीजीएस ही पैसे ट्रान्सफर करण्यासाठीची एक महत्त्वाची सुविधा आहे. व्यावसायिक किंवा मोठ्या रकमेचे ट्रान्सफर करण्यांसाठी ही सुविधा महत्त्वाची आहे. अर्थात आरटीजीएसचा वापर कोणताही नागरिक करू शकतो. या सुविधेद्वारे क

RTGS facility to remain close for 14 hours for system upgradation
अपग्रेडेशनसाठी आरटीजीएस सुविधा राहणार बंद 

थोडं पण कामाचं

  • व्यावसायिकांसाठी किंवा मोठ्या रकमेचे ट्रान्सफर करण्यासाठी सुविधा
  • ट्रान्सफरसाठी किमान रक्कम दोन लाख रुपये
  • आरटीजीएसमध्ये टेक्निकल अपग्रेडेशन

नवी दिल्ली : रिझर्व्ह बॅंकेने अलीकडेच एक महत्त्वाची घोषणा केली आहे. पैसे ट्रान्सफर करण्यासाठी असलेली रियल टाईम ग्रॉस सेटलमेंट अर्थात आरटीजीएस (RTGS)ही सुविधा रविवारी १४ तासांसाठी बंद राहणार आहे. सिस्टम अद्ययावत आणि अधिक सुरक्षित करण्यासाठी अपग्रेड करायची आहे, त्यामुळे ही सुविधा उपलब्ध राहणार नाही. १८ एप्रिल, रविवारी १२ am ते २ pm या दरम्यान ही सुविधा बंद राहील, अशी माहिती रिझर्व्ह बॅंकेने दिली आहे.

आरटीजीएस गुणवत्ता वाढवण्यासाठी अपग्रेडेशन

आरटीजीएसची गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि आरटीजीएस सिस्टमच्या डिझास्टर रिकवरी कालावधीला आणखी उत्तम बनवण्यासाठी १७ एप्रिल, २०२१ला कार्यालयीन कामकाज संपल्यानंतर आरटीजीएसमध्ये टेक्निकल अपग्रेडेशन केले जाणार आहे, असे आरबीआयने प्रसार माध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 


(As technical upgrade of RBI's #RTGS is scheduled after the close of business of April 17, 2021, #RTGS service will not be available from 00:00 hrs to 14.00 hrs on Sunday, April 18, 2021. #NEFT system will continue to be operational as usual during this period for #moneytransfers.)

अर्थात, या कालावधीत नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर म्हणजेच एनईएफटीची (NEFT)सुविधा पूर्णपणे सुरू राहणार आहे, हेदेखील आरबीआयने स्पष्ट केले आहे. या पद्धतीने आरटीजीएस सुविधा रविवारी रात्री १२ वाजेपासून सिस्टम अपग्रेडेशनसाठी बंद राहणार आहे. एनईएफटी नेहमीप्रमाणेच सुरू राहील, असे आरबीआयने सांगितले आहे.

काय आहे आरटीजीएस


आरटीजीएस म्हणजे रियल टाईम ग्रॉस सेटलमेंट (Real Time Gross Settlement). ही सुविधा ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरण्यात येते. ही सुविधा जवळपास नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर म्हणजेच एनईएफटी (NEFT) सारखीच असते. आरटीजीएसद्वारे रियल टाईममध्ये एका खात्यातून दुसऱ्या खात्यात अतिशय सुलभरित्या आणि सुरक्षितरित्या पैसे ट्रान्सफर केले जातात. आरटीजीएस प्रामुख्याने त्या ग्राहकांसाठी असते, जे मोठे व्यावसायिक आहे किंवा मोठ्या रकमांचे ट्रान्सफर एका खात्यातून दुसऱ्या खात्यात करतात. अर्थात आरटीजीएस सुविधेचा वापर कोणतीही व्यक्ती करू शकते. मात्र आरटीजीएस सुविधेचा वापर करण्यासाठी किमान दोन लाख रुपयांचे ट्रान्सफर करणे आवश्यक आहे. कमाल किती रकमेचे ट्रान्सफर करावे याचे कोणतेही बंधन मात्र नाही.

रिझर्व्ह बॅंकेचे निर्णय

अलीकडेच चालू आर्थिक वर्षाच्या आपल्या पहिल्याच द्वैमासिक पतधोरण समितीच्या बैठकीत आरबीआयने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यानुसार यापुढे फोन पे, गुगल पे, पेटीएमसारख्या पेमेंट्स बॅंकांना आरटीजीएस, एनईएफटी सुविधेचा वापर करण्याची परवानगी दिली आहे. या दोन्ही सुविधा रिझर्व्ह बॅंकेच्या अखत्यारित येत असून याआधी फक्त बॅंकांनाच या सुविधा वापरण्याची परवानगी होती.

देशात डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्याचे सरकारचे धोरण आहे. त्यामुळे मागील काही वर्षात सरकार सातत्याने डिजिटल अर्थव्यवस्थेसंदर्भात पावले उचलते आहे. यासाठी नवनवीन धोरणे आखली जात आहेत आणि नवीन नियमावली देखील बनवली जात आहे. डिजिटल व्यवहारांमुळे आर्थिक व्यवहार अधिक पारदर्शक, कार्यक्षम, गतीमान आणि सुरक्षित होतील ही अपेक्षा आहे. त्याचबरोबर दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सायबर क्राईमला आळा घालण्यासाठीही सरकार विविध पावले उचलते आहे. सायबर क्राईमला रोखण्यासाठी नवीन नियमावली देखील आणली जाते आहे. याचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी