NEFT पाठोपाठ RTGS २४ तासांत कधीही करता येणार

RTGS to become 24×7 from December डिसेंबर २०२० पासून कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही वेळी एनईएफटी प्रमाणेच आरटीजीएस करता येणार आहे.

RTGS to become 24×7 from December
NEFT पाठोपाठ RTGS २४ तासांत कधीही करता येणार 

थोडं पण कामाचं

  • NEFT पाठोपाठ RTGS २४ तासांत कधीही करता येणार
  • आयएमपीएस, एनईएफटी आणि आरटीजीएस कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही वेळी वापरण्याची सोय होणार
  • भारताचा वेगाने ऑनलाइन व्यवहार करणाऱ्या निवडक देशांमध्ये समावेश होणार

मुंबईः रिझर्व्ह बँकेने एक मोठा निर्णय घेतला. हा निर्णय डिसेंबर २०२० पासून लागू होणार आहे. या निर्णयामुळे एनईएफटी (National Electronic Fund Transfer- NEFT) पाठोपाठ आरटीजीएस (Real Time Gross Settlement - RTGS) २४ तासांमध्ये कधीही करता येईल. आधी बँका सुरू असताना विशिष्ट वेळेत एनईएफटी आणि आरटीजीएस करता येत होते. मात्र ऑनलाइन व्यवहार वाढू लागल्यावर आधी एनईएफटी नंतर आरटीजीएस या दोन्ही सेवा २४ तास वापरण्याचा पर्याय उपलब्ध होत आहे. डिसेंबर २०२० पासून कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही वेळी एनईएफटी प्रमाणेच आरटीजीएस करता येणार आहे. (RTGS to become 24×7 from December)

आयएमपीएस, एनईएफटी, आरटीजीएस कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही वेळी वापरण्याची सोय होणार

एनईएफटीमध्ये १ रुपया ते कितीही रकमेचे एका बँकेच्या खात्यातून दुसऱ्या बँकेच्या खात्यात हस्तांतर केले जाते. निवडक बँकांमध्ये एनईएफटीवर जास्तीत जास्त रकमेबाबत मर्यादा आहे. तर आरटीजीएसमध्ये किमान २ लाख रुपये ते कमाल कितीही रकमेचे एका बँकेच्या खात्यातून दुसऱ्या बँकेच्या खात्यात हस्तांतर केले जाते. आपण ऑनलाइन बँकिंग करत असाल तर स्वतःच्या खात्यातून स्वतःच एनईएफटी अथवा आरटीजीएस करू शकता. ऑनलाइन बँकिंग करत नसाल अथवा ते शक्य नसेल तर बँकेच्या माध्यामातून आपण एनईएफटी अथवा आरटीजीएस करुन रकमेचे एका बँकेच्या खात्यातून दुसऱ्या बँकेच्या खात्यात हस्तांतर करू शकता. जर एकाच बँकेच्या एका खात्यातून दुसऱ्या खात्यात रक्कम हस्तांतरित करायची असेल तर आयएमपीएस (Immediate Payment Service - IMPS) या पर्यायाचा वापर केला जातो. आपण ऑनलाइन बँकिंग करत असाल तर स्वतःच्या खात्यातून त्याच बँकेच्या दुसऱ्या खात्यात आयएमपीएसद्वारे रकमेचे हस्तांतर करू शकता. आयएमपीएस ही सेवाही कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही वेळी वापरणे शक्य आहे.

भारताचा वेगाने ऑनलाइन व्यवहार करणाऱ्या निवडक देशांमध्ये समावेश होणार

रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार एनईएफटीमध्ये आधी मोठ्या रकमा आणि मधूनच लहान रकमा असा प्राधान्यक्रम ठरवून १२ तासांच्या आत व्यवहार पूर्ण केला जातो. या उलट आरटीजीएसमध्ये प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या क्रमाने तातडीने व्यवहार पूर्ण केले जातात. याच कारणामुळे मोठ्या आर्थिक व्यवहारांसाठी व्यावसायिक आरटीजीएस करतात. तर किरकोळ व्यवहारांसाठी एनईएफटी केले जाते. आयएमपीएस, एनईएफटी आणि आरटीजीएस या संदर्भातले नियम प्रत्येक बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर बघता येतात तसेच प्रत्येक बँकेच्या ब्रँचमध्ये (शाखेत) या नियमांची माहिती मिळते. ऑनलाइन बँकिंगची सोय तसेच आयएमपीएस, एनईएफटी पाठोपाठ डिसेंबर पासून आरटीजीएस ही सेवा कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही वेळी वापरणे शक्य होणार आहे. यामुळे बँकांमधील रकमेच्या हस्तांतराचे व्यवहार वेगवान होणार आहेत. आयएमपीएस, एनईएफटी आणि आरटीजीएस या तिन्ही सेवा कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही वेळी वापरण्याची सोय केल्यानंतर भारताचा वेगाने ऑनलाइन व्यवहार करणाऱ्या निवडक देशांमध्ये समावेश होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी