Aadhaar Card New Rule | नवीन आधार कार्ड बनवण्याचे बदलले नियम, UIDAI दिली माहिती

Aadhaar Card New Rule | तुम्ही जर नवीन आधार कार्ड बनवणार असाल तर हे बदल लक्षात घ्या. अलीकडच्या काळात आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे ओळखपत्र आणि कागदपत्र बनले आहे. युआयडीएआयने (UIDAI)आधार कार्ड बनवण्याच्या प्रक्रियेत बदल केला आहे. युआयडीएआयने या संदर्भातील माहिती दिली आहे की आता तुम्ही आधार कार्ड कसे बनवू शकता.

Aadhaar Card New Rule
आधार कार्डचा नवा नियम 
थोडं पण कामाचं
  • आधार कार्ड बनवण्याच्या नियमात बदल
  • ५ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी बायोमेट्रिक (फिंगरप्रिंट आणि आय स्कॅन) प्रक्रियेची गरज आता रद्द करण्यात आली
  • बाल आधार कार्ड तुमच्याकडे ९० दिवसांच्या आत मिळणार

Aadhaar Card New Rule | नवी दिल्ली : आधार कार्ड (Aadhar card) बनवण्याच्या नियमात बदल झाला आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन आधार कार्ड बनवणार असाल तर हे बदल लक्षात घ्या. अलीकडच्या काळात आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे ओळखपत्र आणि कागदपत्र बनले आहे. युआयडीएआयने (UIDAI)आधार कार्ड बनवण्याच्या प्रक्रियेत बदल केला आहे. युआयडीएआयने या संदर्भातील माहिती दिली आहे की आता तुम्ही आधार कार्ड कसे बनवू शकता. पाहूया पूर्ण प्रक्रिया. (Rule for Aadhar card changed, UIDAI gave the information)

आधार कार्डाचे नियम बदलले

लहान मुलांसाठीचे बाल आधार (Baal Aadhaar Card Benefits) या आधार कार्डाच्या खाली निळ्या रंगाचा व्हेरियंट आहे. तो ५ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी दिला जातो. मात्र आता नव्या नियमानुसार पाच वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी कोणत्याही बायोमेट्रिक डिटेलची आवश्यकता नसेल. ५ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी बायोमेट्रिक (फिंगरप्रिंट आणि आय स्कॅन) प्रक्रियेची गरज आता रद्द करण्यात आली आहे. तर मुलांचे वय पाच वर्षे झाल्यानंतर मात्र बायोमेट्रिक प्रक्रियेची आवश्यकता असणार आहे.

आवश्यक कागदपत्रे

आधार कार्डसाठीच्या आवश्यक कागदपत्रांमध्ये पासपोर्ट, पॅन कार्ड, वोटर आयडी, ड्रायव्हिंग लायसन्स, नरेगा जॉब कार्ड इत्यादींचा समावेश आहे. तर पत्त्याच्या पुराव्यासाठी पासपोर्ट, बॅंकेचे स्टेटमेंट, पासबुक, पोस्ट ऑफिस अकाउंट स्टेटमेंट, रेशन कार्ड इत्यादींचा समावेश आहे.

असे बनवा लहान मुलांचे आधार कार्ड (बाल आधार)-

  1. - बाल आधार बनवण्यासाठी सर्वात आधी युआयडीएआयच्या वेबसाइटवर जा.
  2. - इथे आधार कार्ड रजिस्ट्रेशनचा पर्याय निवडा.
  3. - आता यामध्ये आवश्यक डिटेल, मुलांचे नाव आणि इतर बायोमेट्रिक माहिती भरा.
  4. - आता रहिवासी पत्ता, परिसर, राज्य इत्यादी माहिती भरा आणि सब्मिट करा.
  5. - आधार कार्डसाठी रजिस्ट्रेशन निश्चित करण्यासाठी अपॉइंटमेंट या पर्यायावर क्लिक करा.
  6. - जवळचा एनरोलमेंट सेंटर निवडा, आपली अपॉइंटमेंट निश्चित करा आणि ठरलेल्या दिवशी तिथे जा.

एनरोलमेंट सेंटरवर बनणार आधार

एनरोलमेंट सेंटरवर ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, नात्याचा पुरावा, जन्मतारीख इत्यादी कागदपत्रे सोबत न्यावीत. केंद्रातील अधिकारी त्याची पडताळणी करतील. जर मुलाचे वय पाच वर्षापेक्षा जास्त असेल तर बायोमेट्रिक माहिती घेतली जाईल. मात्र पाच वर्षांखालील मुलासाठी बाटोमेट्रिक माहितीची आवश्यकता नसते. 

९० दिवसात मिळेल बाल आधार

या प्रक्रियेनंतर प्रोसेस ट्रॅक करण्यासाठी एक अॅक्नॉलेजमेंट नंबर मिळेल. त्यानंतर ६० दिवसांच्या आत नोंदणीकृत मोबाइल नंबर एक एसएमएस येईल. बाल आधार कार्ड तुमच्याकडे ९० दिवसांच्या आत पोचेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी