Rules Change 1st March 2023: LPG पासून ते रेल्वेच्या वेळापत्रकापर्यंत, 1 मार्चपासून बदलणार अनेक नियम, ज्याचा खिशावर होईल थेट परिणाम

New Rules from March 2023: 1 मार्च 2023 पासून अनेक नियमांत बदल होणार आहे. या बदलत्या नियमांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. जाणून घ्या कसा...

rules change from 1st march lpg price bank holidays payment rules read news in marathi
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • एक मार्च पासून अनेक नियमांत होणार बदल
  • जाणून घ्या काय होणार हे बदल आणि ज्याचा तुमच्या खिशावर कसा होणार परिणाम

Rules change from 1st March: मार्च महिन्यात अनेक सण, उत्सव आहेत आणि त्यामुळेच अनेक सुट्ट्याही आहेत. मात्र त्यासोबतच मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच अनेक नियमांत बदल सुद्धा होणार आहेत. या नियमांबाबत तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. जाणून घ्या मार्च महिन्याच्या पहिल्या तारखेपासून कोणत्या-कोणत्या नियमांत बदल होणार आहेत.

LPG गॅस सिलेंडरचे दर

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅस सिलेंडरचे दर अपडेट केले जातात. फेब्रुवारी महिन्यात एलपीजीच्या दरात कोणतेही बदल करण्यात आले नव्हते. 1 जानेवारी रोजी व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 25 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. मात्र, यावेळी मार्च महिन्यात घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या दरात बदल होऊ शकतात.

हे पण वाचा : परीक्षेपूर्वी अक्रोड का खावे?

CNG दरात होऊ शकतात बदल

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला LPG, CNG आणि PNG चे दर अपडेट होतात. फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रात महानगर गॅस लिमिटेड (MGL) ने सीएनजीच्या दरात कपात केली होती त्यानंतर मुंबईत सीएनजीचा दर 87 रुपये प्रति किलोग्रॅम इतका झाला होता. मात्र, दिल्लीत कोणतेही बदल झाले नव्हते. आता शक्यता वर्तवण्यात येत आहे की, या महिन्यात दिल्लीत सीएनसीच्या दरात बदल होऊ शकतात.

बँक कर्ज महागणार?

नुकतीच आरबीआयने रेपो रेटमध्ये वाढ केली त्यानंतर अनेक बँकांकडून MCLR दरात वाढ होऊ शकते. अंदाज वर्तवण्यात येत आहे की, मार्च महिन्यात बँक लोन महागण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा : गरोदरपणात पहिल्या महिन्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंत काय खावे?

स्पेशल ट्रेन्स धावणार

1 मार्चपासून हजारो पॅसेंजर ट्रेन आणि 5 हजार मालगाड्यांच्या वेळापत्रक बदल केले जाण्याची शक्यता आहे. तसेच मार्च महिन्यात अनेक सण, उत्सव आहेत. होळी सणानिमित्त भारतीय रेल्वेकडून अनेक स्पेशल ट्रेन्स चालवण्याची शक्यता आहे. या संदर्भात भारतीय रेल्वे आपल्या अधिकृत वेबसाईटवर माहिती देईल.

काशी विश्वनाथ मंदिरात आरती

वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिरात आरती महागणार आहे. या ठिकाणी मंगला आरतीसाठी भाविकांना पूर्वीपेक्षा 150 रुपये अधिक द्यावे लागणार आहेत. या ठिकाणी आधी आरतीसाठी 350 रुपये द्यावे लागत होते मात्र आता 500 रुपये द्यावे लागणार आहेत. यासोबतच सप्तऋषि आरती, श्रृंगार भोग आरती आणि मध्याह्न भोग आरतीच्या तिकीटासाठी 120 रुपये द्यावे लागतील. यापूर्वी याची किंमत 180 रुपये होती जी आता 300 रुपये होईल. हा नवा नियम 1 मार्च 2023 पासून लागू होईल.

हे पण वाचा : ... म्हणून डोळ्यातून वारंवार येतं पाणी

सोशल मीडिया पोस्ट

सोशल मीडियाच्या संदर्भात अनेक गोष्टींवर मार्च महिन्यात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इन्स्टाग्राम, फेसबूक आणि ट्विटरवर भडकाऊ पोस्ट करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई आणि मोठा दंड ठोठावला जाण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी