तुमचे पोस्टात खाते आहे का? जरूर वाचा ही बातमी

काम-धंदा
Updated Dec 11, 2020 | 17:55 IST | टाइम्स नाऊ मराठी

तुमचे पोस्टात बचत खाते आहे का? जर असेल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण पोस्टाकडून नियम बदलले जात आहेत.

post office
तुमचे पोस्टात खाते आहे का? जरूर वाचा ही बातमी 

थोडं पण कामाचं

  • आता ग्राहकांना पोस्टामध्ये बचत खात्यात १२ डिसेंबरपासून कमीत कमी ५०० रूपये ठेवणे गरजेचे आहे
  • भारतीय पोस्टाने १२ डिसेंबरपासून नियमांमध्ये होणाऱ्या बदलांची माहिती ट्विटरवरून दिली आहे.
  • पोस्टातील बचत खात्यांवर वर्षाला ४ टक्के व्याज मिळते.

मुंबई: पोस्टात बचत खाते(saving account in indian post office) खोलायला जात असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची माहिती आहे. १२ डिसेंबरपासून पोस्टातील बचत खात्याच्या नियमांमद्ये(rules for savings account) बदल होत आहेत. जर तुम्हाला याबाबत माहिती नाही आहे तर जाणून घ्या. पोस्टाच्या नव्या नियमानुसार आता ग्राहकांना पोस्टामध्ये बचत खात्यात १२ डिसेंबरपासून कमीत कमी ५०० रूपये ठेवणे गरजेचे आहे. असे न केल्यास ग्राहकांना दंड भरावा लागेल. 

भारतीय पोस्टाने १२ डिसेंबरपासून नियमांमध्ये होणाऱ्या बदलांची माहिती ट्विटरवरून दिली आहे. पोस्टाने आपल्या ट्विटमध्ये असे लिहिले की पोस्टाच्या बचत खात्यामध्ये कमीत कमी रक्कम ठेवणे अनिवार्य आहे. या ट्विटमध्ये अशीही माहिती देण्यात आली आहे की शुक्रवार ११ डिसेंबर ननंतर पोस्टातील बचत खात्यावर लागू करण्यात आलेल्या शुल्कावरील दंडापासून वाचण्यासाठी आपल्या खात्यात कमीत कमी ५०० रूपये बॅलन्स असल्याची खात्री करून घ्या. नाहीतर आर्थिक वर्ष २०२०च्या अखेरीस तुमच्या खात्यातून दंड म्हणून १०० रूपये कापले जातील. 

पोस्टातील बचत खात्यांवर वर्षाला ४ टक्के व्याज मिळते. व्याजाचे कॅलक्युलेशन महिन्याच्या १०व्या तारखेस आणि महिन्याच्या अखेरीस या दरम्यान अतिरिक्त राशीच्या आधारावर केले जाते. ग्राहक आपल्या सुविधेनुसार कोणत्याही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्य आपले अकाऊंट सुरू करू शकतात. 

पोस्टात बचत खाते एखादी व्यक्ती, अथवा जॉईंट अकाऊंट खोलले जाऊ शकते. १० वर्षाच्या वरही अल्पवयीनांनाही बचत खाते सुरु करता येते. एका व्यक्तीच्या नावावर केवळ एकच बचत खाते खोलता येते. तसेच अल्पवयीनांच्या नावावरही एकच खाते खोलता येते. पोस्टात बचत खाते सुरू करण्याच्या वेळेस नॉमिनीची गरज आहे. 

या सुविधा मिळतात

पोस्टात बचत खाते सुरू केल्यास ग्राहकांना अनेक सुविधा मिळतात

  1. चेक अथवा एटीएमची सुविधा
  2. नॉमिनेशन सुविधा
  3. अकाऊंट एका पोस्टातून दुसऱ्या पोस्टात ट्रान्सफर करण्याची सुविधा
  4. नेटबँकिंग / मोबाईल बँकिंगची सुविधा
  5. ऑनलाईन फंड ट्रान्सफरची सुविधा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी