Rupee at all-time low : रुपयाची घसरगुंडी थांबेना! पहिल्यांदाच पोचला 80 रुपये प्रति डॉलरच्या ऐतिहासिक नीचांकीवर

Rupee fall : आज मंगळवारी ( 19 जुलै) रोजी भारतीय रुपया (Indian Rupee) सलग दुसऱ्या दिवशी सुरुवातीच्या व्यापारात 80 प्रति अमेरिकन डॉलरच्या (Dollar) विक्रमी नीचांकी पातळीवर घसरला आहे. सोमवारी, रुपया 80-प्रति-डॉलरवर पोचला होता. मात्र त्यानंतर 79.97 रुपया प्रति डॉलरच्या पातळीवर बंद झाला होता. म्हणजे 80 च्या खाली बंद होण्यासाठी रुपयाने थोडीशी सुधारणा दाखवली होती.

Rupee hits all-time low
रुपयाच्या मूल्यात ऐतिहासिक घसरण 
थोडं पण कामाचं
  • डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य पोचले 80 डॉलरवर
  • आठ वर्षांत डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे मूल्य 16.08 रुपयांनी घसरले
  • मागील काही आठवड्यांपासून रुपयाच्या मूल्यात सातत्याने घसरण

Rupee hits all-time low : नवी दिल्ली : आज मंगळवारी ( 19 जुलै) रोजी भारतीय रुपया (Indian Rupee) सलग दुसऱ्या दिवशी सुरुवातीच्या व्यापारात 80 प्रति अमेरिकन डॉलरच्या (Dollar) विक्रमी नीचांकी पातळीवर घसरला आहे. सोमवारी, रुपया 80-प्रति-डॉलरवर पोचला होता. मात्र त्यानंतर 79.97 रुपया प्रति डॉलरच्या पातळीवर बंद झाला होता. म्हणजे 80 च्या खाली बंद होण्यापूर्वी रुपयाने थोडीशी सुधारणा दाखवली होती. गेल्या आठ वर्षांत डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे मूल्य 16.08 रुपयांनी (25.39 टक्के) घसरल्याचे केंद्र सरकारने सोमवारी संसदेत मान्य केले. (Rupee reached at al time low level amid strong dollar)

अधिक वाचा : GST rate hike : जीएसटी दरात वाढ झाल्याने, काय महाग झाले आणि काय स्वस्त...पाहा यादी

सरकारची संसदेत माहिती

अर्थ मंत्रालयाने संसदेत माहिती दिली की 2014 मध्ये, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) नुसार, रुपयाचा विनिमय दर डॉलरच्या तुलनेत 63.33 रुपये होता. 11 जुलै 2022 पर्यंत तो 79.41 रुपये प्रति डॉलरवर घसरला होता.

शेअर बाजारातून निघणाऱ्या भांडवलाची चिंता

भारतीय शेअर बाजारातून परकी गुंतवणुकदारांनी 1,650 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केल्यामुळे भारतीय रुपयासाठी भांडवल बाहेर जाणे ही एक मोठी चिंता आहे. गेल्या काही आठवड्यांपासून, रुपया जवळजवळ प्रत्येक दुसर्‍या दिवशी नवीन नीचांक गाठत आहे. मात्र देशांतर्गत चलनाला आधार देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने हस्तक्षेप केल्‍याच्‍या आशेवर सोमवारी सुरूवातीला रुपया सावरला होता आणि तो 79.41 रुपये प्रति डॉलर या नवीन नीचांकी पातळीवर स्थिरावला.

अधिक वाचा : Gold-Silver Rate Today, 19 July 2022: सोन्याच्या भावात चढउतार, गुंतवणुकदारांमध्ये सोन्याबद्दल नकारात्मक कल, पाहा ताजा भाव

"ब्रिटिश पाउंड, जपानी येन आणि युरो सारखी चलने भारतीय रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलरच्या तुलनेत अधिक कमकुवत झाल्या आहेत आणि त्यामुळे 2022 मध्ये या चलनांच्या तुलनेत भारतीय रुपया मजबूत झाला आहे," असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

युरोपियन युनियन मंदीच्या उंबरठ्यावर

Kristal.AI,चे संस्थापक आणि सीईओ, आशीष चंदा, म्हणाले की जागतिक गुंतवणुकदार युरोपियन युनियनच्या मंदीच्या जोखमींपेक्षा अमेरिकन बाजारांच्या सुरक्षिततेची निवड करत आहेत. रशियाने हिवाळ्यात गॅस पुरवठा खंडित करण्याचा धोका आणि महागाई नियंत्रित करण्यासाठी ईसीबीच्या मंद किंवा फारच कमी हस्तक्षेपाचा अर्थ असा आहे की युरोपियन युनियनमध्ये मंदी जवळ आली आहे, असे ते म्हणाले.

"म्हणूनच गुंतवणूकदार युरो विकत आहेत आणि डॉलर खरेदी करत आहेत. यामुळे अनिश्चिततेच्या काळात सर्वात सुरक्षित चलन म्हणून डॉलरचे महत्त्व अधिक दृढ होते. एक भारतीय गुंतवणुकदार म्हणून, एखाद्याला त्यांच्या गुंतवणुकीचे डॉलरमध्ये वाढ करण्याचा सल्ला दिला जाईल कारण रुपया आणखी घसरण्याची अपेक्षा आहे. असे ते पुढे म्हणाले.

अधिक वाचा : EPFO Update: पीएफ खातेधारकांना मिळणार अधिक रक्कम! ईपीएफओ घेणार आहे मोठा निर्णय

रुपयाचा विनिमय दर काय आहे?

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचा विनिमय दर हा मूलत: एक अमेरिकन डॉलर खरेदी करण्यासाठी आवश्यक असलेल्या रुपयांची संख्या आहे. हे केवळ अमेरिकन वस्तू खरेदी करण्यासाठीच नाही तर इतर वस्तू आणि सेवा ज्यासाठी भारतीय नागरिक आणि कंपन्यांना डॉलर्सची गरज आहे अशा संपूर्ण बाजारासाठीचे हे एक महत्त्वाचे मापदंड आहे.

जेव्हा रुपया घसरतो तेव्हा भारताबाहेरून एखादी वस्तू विकत घेणे (आयात) महाग होते. त्याच तर्कानुसार, जर एखादी व्यक्ती उर्वरित जगाला (विशेषतः अमेरिका) वस्तू आणि सेवा विकण्याचा (निर्यात) करण्याचा प्रयत्न करत असेल, तर रुपयाची घसरण भारताची उत्पादने अधिक स्पर्धात्मक बनवते कारण घसरणीमुळे परदेशी लोकांना भारतीय उत्पादने खरेदी करणे स्वस्त होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी