Rupee value today | रुपयात झाली मोठी घसरण, पाहा तुमच्यावर काय होणार परिणाम

Rupee value in Dollar | आज डॉलरच्या (Dollar) तुलनेत रुपयाच्या (Rupee) मूल्यातदेखील घसरण होत रुपयाचे मूल्य ३० पैशांनी घसरले आहे. डॉलरच्या तुलनेत आज रुपया ७५.४२ रुपये प्रति डॉलरच्या पातळीवर घसरला. ही आठ आठवड्यातील नीचांकी पातळी आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन (Omicron) व्हेरियंटच्या जगभर होत असलेल्या फैलावामुळे जागतिक बाजारपेठेत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Rupee value in Dollar
डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घसरले 
थोडं पण कामाचं
  • डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात घसरण
  • शेअर बाजारात आज मोठी घसरण
  • ओमायक्रॉनमुळे जागतिक बाजारपेठेत अनिश्चिततेचे वातावरण

Rupee value in Dollar | नवी दिल्ली: शेअर बाजारात (Share market)आज मोठी घसरण झाली. त्याच पार्श्वभूमीवर आज डॉलरच्या (Dollar)तुलनेत रुपयाच्या (Rupee) मूल्यातदेखील घसरण होत रुपयाचे मूल्य ३० पैशांनी घसरले आहे. डॉलरच्या तुलनेत आज रुपया ७५.४२ रुपये प्रति डॉलरच्या पातळीवर घसरला. ही आठ आठवड्यातील नीचांकी पातळी आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन (Omicron) व्हेरियंटच्या जगभर होत असलेल्या फैलावामुळे जागतिक बाजारपेठेत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. (Rupee slips 30 paise today against dollar, see the impact on common man)

कच्चे तेल महागले

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या भावात तेजी आली आहे. सध्या कच्च्या तेलाच्या भावात २.७० टक्के तेजी दिसून येते आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव ७१.७७ डॉलर प्रति बॅरलच्या पातळीवर आहेत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. आज सेन्सेक्स ९४९ अंशांच्या घसरणीसह ५६,७४७ अंशांच्या पातळीवर बंद झाला. डॉलर इंडेक्स सध्या ९६.१७७ च्या पातळीवर आहे. मागील सात आठवड्यापासून सातत्याने डॉलर इंडेक्समध्ये तेजी दिसून येते आहे.

महागाईमध्ये होणार वाढ

जर डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घसरले तर त्यामुळे महागाईमध्ये वाढ होते. जर महागाई वाढली तर सर्वसामान्य माणसाचे आयुष्य आणखी अवघड होऊन बसते. सर्व वस्तूंच्या किंमतींमध्ये वाढ होते. त्यामुळे लोकांची खरेदी क्षमता कमी होते. याशिवाय रुपया कमजोर झाल्याने आयातीचा खर्च वाढतो. आयात खर्च वाढल्यामुळे देशाच्या खजिन्यात घट होते.

परदेशातील शिक्षण, प्रवास महागतो

जे लोक परदेशात शिकतात त्यांच्यावर रुपयाच्या घसरणीमुळे आणखी बोझा वाढतो. शिवाय परदेश प्रवास महाग होतो. डॉलरच्या तुलनेत रुपयात घसरण झाल्यामुळे परकी गुंतवणुकदारदेखील गुंतवणूक कमी करतात. 

परकी गुंतवणुकदारांनी शुक्रवारी केली ३,३५६ कोटींच्या शेअरची विक्री

बीएसईच्या सेन्सेक्समध्ये ९४९.३२ अंशांची घसरण होत तो ५६,७४७.१४ अंशांच्या पातळीवर बंद झाला. शेअर बाजारातील आकडेवारीनुसार परकी संस्थात्मक गुंतवणुकदारांनी बाजारातून पैसा काढून घेतला आहे. त्यांनी शुक्रवारी ३,३५६.१७ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली आहे.

आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक सुरू

रिझर्व्ह बॅंकेच्या द्वैमासिक पतधोरण समितीची तीन दिवसीय बैठकीला सोमवारी म्हणजे आज सुरूवात झाली. आरबीआय पतधोरणात फारसा बदल न करण्याचीच शक्यता आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांच्या अध्यक्षतेखालील पतधोरण समितीच्या बैठकीतील निर्णयांची घोषणा आठ डिसेंबरला केली जाणार आहे. आरबीआय व्याजदरात बदल करते याकडे सर्वांचे लक्ष आहे. याआधी आरबीआयने २२ मे, २०२० ला व्याजदरात बदल केला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी