सावधान ! तुमच्याकडे असलेली २००० रुपयांची नोट नकली तर नाही ना?

काम-धंदा
Updated Aug 30, 2019 | 11:03 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Rupees 2000 notes: नव्याने चलनात आणलेल्या २००० रुपयांच्या नोट संदर्भात एक महत्वाची बातमी आहे. कारण, याच अशीच दोन हजार रुपयांची बनावट नोट पाकिस्तानमधून भारतात येत असल्याची माहिती आहे.

Rs 2000 notes
पाकिस्तानने छापली २००० रुपयांची बनावट नोट  |  फोटो सौजन्य: IANS

नवी दिल्ली: चलनामधील दोन हजार रुपयांच्या नोट पाहून सुरक्षा यंत्रणांना सुद्धा झटका बसला आहे. कारण, या नोट बनावट असल्याचं समोर आलं असून हा नोटा पाकिस्तानातून भारतात आल्या आहेत. पाकिस्तानी तंत्राने भारतीय चलनातील दोन हजार रुपयांप्रमाणेच अगदी हुबेहुब दिसणारी बनावट नोट तयार केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच कुठल्याही सरकारी मदतीशिवाय हे शक्य नसल्याचं बोललं जात आहे. पाकिस्तानी सिक्युरिटी प्रेसमध्ये या नोटा छापण्यात आलेल्या या बनावट नोटा आणि भारतीय चलनातील खऱ्या नोटा यांच्यातील फरक करताना भारतीय सुरक्षा यंत्रणा, दिल्ली पोलीस चक्रावले आहेत.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलद्वारे नुकतंच बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. त्यानंतर या सर्वांच्या मागे पाकिस्तानी सरकारी तंत्र असल्याचं माहिती समोर येत आहे. पाकिस्तानी सरकारी तंत्र भारताची अर्थव्यवस्था उद्धवस्त करण्यासाठी हाय-कॉलिटीच्या बनावर नोटा छापत आहे. चौकशीत समोर आले आहे की, कराचीमधील 'मलीर-हॉल्ट' परिसरात असलेल्या 'पाकिस्तानी सिक्युरिटी प्रेस' येथे छापण्यात येणाऱ्या बनावट नोटांमध्ये पहिल्यांदाच 'ऑप्टिकल वेरियबल इंक'चा वापर करण्यात आला आहे.

Pakistan copy Indian Currency

ही विशेष प्रकारची शाई २००० रुपयांच्या नोटमधील धाग्यात वापरण्यात येते. या शाईची खास बाब म्हणजे नोटवर ही शाई हिरव्या रंगाची दिसते. नोट वर-खाली केल्यास या शाईचा रंग बदलून निळा होतो. सूत्रांच्या मते, सहा महिन्यांपूर्वी पकडण्यात आलेल्या बनावट नोटा तपासल्या होत्या त्यावेळी यावर या शाईचा वापर होत नसल्याचं दिसलं होतं. ही विशेष प्रकारची शाई परदेशी कंपनी बनवते आणि ज्याचा पुरवठा काही ठराविक देशांच्या सरकारलाच करण्यात येतो.

आयएसआयचा हात

सूत्रांच्या मते, पाकिस्तानी सरकारच्या मदतीशिवाय या शाईचा वापर बनावट भारतीय नोटा छापण्यासाठी केला जाऊ शकत नाही. 'ऑप्टिकल वेरियबल इंक'च्या वाराने आता हे स्पष्ट झालं आहे की, पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणा आयएसआयच्या मदतीने पाकिस्तानी सिक्युरिटी प्रेसमध्ये भारतीय चलनातील बनावट नोटा छापण्यात येत आहे. या नोटांची छपाई झाल्यावर त्या भारतात वितरण करण्यासाठी कराचीत बसलेला भारताचा मोस्ट वॉन्टेड डॉन दाऊद इब्राहिम याची मदत घेतली जात असल्याचीही माहिती आहे.

पाकिस्तानी सरकारी प्रेसमध्ये बनावट नोटांची छपाई

पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांनी आता कराचीमधील सरकारी प्रेसमध्ये छापण्यात येणाऱ्या बनावट नोटांवर भारतीय चलनातील सीरिज नंबरची सुद्धा कॉपी केली आहे. दिल्ली पोलिसांनी नुकत्याच जप्त केलेल्या बनावट नोटांवर हे दिसून आलं आहे. या नोटांवर '७एफके' सीरिज छापण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...