How To Earn Money | १०० रुपयांची नोट एका फटक्यात करून देईल ३ लाखांची कमाई, पाहा कसे

Old currency note | अलीकडे अनेक नवनवीन पद्धतीने पैसे कमावण्याचे मार्गदेखील (Money making ideas) समोर आले आहेत. काही डिजिटल प्लॅटफॉर्म्सनी (Digital platform) प्रत्येक स्तरातील नागरिकांना कमाईची संधी निर्माण करून दिली आहे. शिवाय यासाठी मोठी गुंतवणूक किंवा भांडवलाची आवश्यकता नसते. फक्त १ रुपये, २ रुपये, ५ रुपये, १० रुपये, २० रुपये, ५० रुपये किंवा १०० रुपयांची एक नोट विकूनदेखील लाखोंची कमाई करता येते. जुन्या नोटा किंवा नाणी (Old currency or coin) यांना सध्या मागणी आहे.

sale Old currency or coin on digital platforms
जुन्या नोटा आणि नाणी विकून लाखोंची कमाई 
थोडं पण कामाचं
  • जुन्या नोटा आणि नाण्यांना मोठी मागणी
  • ईबे या वेबसाइटवर जाऊन विका ७८६ नंबर असलेल्या नोटा
  • घरबसल्या लाखोंची कमाई करण्याची संधी

How To Earn Money | नवी दिल्ली : कोरोना काळात सर्वसामान्य माणसाला मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते आहे. गरीब किंवा अल्पउत्पन्न गटातील नागरिकांची परिस्थिती तर अतिशय गंभीर झाली आहे. मात्र या संकटकाळात अनेक नवनवीन पद्धतीने पैसे कमावण्याचे मार्गदेखील (Money making ideas) समोर आले आहेत. काही डिजिटल प्लॅटफॉर्म्सनी (Digital platform) प्रत्येक स्तरातील नागरिकांना कमाईची संधी निर्माण करून दिली आहे. शिवाय यासाठी मोठी गुंतवणूक किंवा भांडवलाची आवश्यकता नसते. फक्त १ रुपये, २ रुपये, ५ रुपये, १० रुपये, २० रुपये, ५० रुपये किंवा १०० रुपयांची एक नोट विकूनदेखील लाखोंची कमाई करता येते. जुन्या नोटा किंवा नाणी (Old currency or coin) यांना सध्या मागणी आहे. या वेबसाइटच्या माध्यमातून जुन्या नोटा किंवा नाण्यांची विक्री करून चांगली कमाई करता येते आहे. (Sale old coins or currency notes & earn in lakhs)

जुन्या नोटा आणि नाण्यांना मोठी मागणी

भारतात आणि जगभरातदेखील जुन्या नोटा आणि नाण्यांना मोठी मागणी आहे. त्यातच भारतीयांना बचतीची सवय असते. काही लोक घरात जुन्या नोटा आणि नाण्यांचे कलेक्शन जमा करतात. अशा लोकांसाठी या नव्या वेबसाइट वरदानच ठरल्या आहेत. १ रुपयाचे नाणे असो किंवा १०० रुपयांची नोट, जर तुमच्याकडे जुन्या काळातील चलन असेल तर त्याची किंमत आज लाखोंमध्ये आहे. घरबसल्याच तुम्ही मोठी कमाई करू शकता. पाहूया तुम्हाला लाखोंची कमाई कशी करता येईल. एका नोटेच्या बदल्यात तुम्हाला लाखो रुपये कमावता येतील. ही नोट १० रुपये, २० रुपये, ५० रुपये किंवा १०० रुपयांची असू शकते. अट फक्त इतकीच की या नोटेवर ७८६ हा क्रमांक असला पाहिजे. जर तुमच्याकडे असलेल्या नोटेवर हा क्रमांक असेल तर तुम्ही ती नोट विकून ३ लाख रुपये सहज कमावू शकता.

घरबसल्या कमवा लाखो

यासाठी तुम्हाला बाजारात जाण्याची किंवा विक्रेता शोधण्याचीदेखील आवश्यकता नाही. तुम्ही तुमचे नशीब ईबे (ebay)या ई-कॉमर्स वेबसाइटवर देखील आजमावू शकता. ७८६ हा क्रमांक अनेकजण लकी नंबर समजतात. त्यामुळे हा नंबर असलेल्या नोटेसाठी ते मोठी किंमत मोजण्यास तयार असतात. तुमच्याकडे असलेली जुनी नोट कशी विकायची ते पाहा. जर तुमच्याकडे १ रुपयापासून ते २००० रुपयांपर्यतची कोणतीही नोट असो आणि त्यावर जर ७८६ नंबर असेल तर त्याला तुम्ही ईबे या वेबसाइटवर पोस्ट करा. तुम्हाला त्या नोटेची किती किंमत अपेक्षित आहे तेदेखील द्या.

नोट विकण्याची पद्धत-

  1. सर्वात आधी  www.ebay.com या वेबसाइटवर लॉग इन करा.
  2. होम पेजवर जा आणि नोंदणीसाठी क्लिक करा. स्वत:ला विक्रेत्याच्या रुपात नोंदवा.
  3. तुमच्याकडे जी खास नोट आहे तिचा फोटो काढून तो वेबसाइटवर अपलोड करा. तुमच्या या नोटेबद्दल ईबे जाहिरात करेल. ही वेबसाइट ज्या लोकांना जुन्या नोटा आणि नाणी विकत घेण्याची इच्छा आहे. त्यांच्यापर्यत पोचवेल. 
  4. तुमची नोट विकत घेण्यास इच्छुक असलेले लोक तुमची ऑफर पाहतील आणि जर त्यांची इच्छा असेल तर ते तुमच्याशी संपर्क करतील. त्यांच्याशी चर्चा करून तुम्ही तुमच्याकडे असलेली नोट विकू शकाल.
  5. अर्थात इथे एक बाब लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे नोटांची खरेदी विक्री करण्याचा कोणताही अधिकार आरबीआयने या वेबसाइट किंवा कंपनीला दिलेला नाही. त्यामुळे हा व्यवहार खात्रीलायकपणे करणे, या व्यवहाराची खातरजमा करणे, खरेदी करणारी व्यक्ती योग्य आहे की नाही याबाबत सावध राहण्याची जबाबदारी तुमचीच असणार आहे. या फसवणुकीला बळी न पडता योग्य ती खबरदारी तुम्ही घेतली पाहिजे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी