1 एप्रिलपासून सुरू झाली सरल पेन्शन योजना, कुटुंबातील 'या' व्यक्तींना मिळू शकेल फायदा

काम-धंदा
Updated Apr 01, 2021 | 15:02 IST | टाइम्स नाऊ मराठी

1 एप्रिलपासून सरल पेन्शन योजनेला सुरुवात होत आहे. विमा नियामक इरडाने दिशानिर्देश जारी करून जीवन विमा कंपन्यांना एका नावाने आणि अटी आणि नियमांनुसार 1 एप्रिल 2021पासून सरल पेन्शन योजना सुरू करण्यास सांगितले आहे.

Pension scheme
एक एप्रिलपासून सुरू झाली सरल पेन्शन योजना, कुटुंबातील या लोकांना मिळू शकेल फायदा  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • योजना सुरू झाल्यापासून सहा महिन्यांनंतर कधीही करता येणार सरेंडर
  • जाणून घ्या एन्युटी म्हणजे काय
  • अधिक सोयीचे आणि फायदेशीर

1 एप्रिलपासून सरल पेन्शन योजनेला (Saral Pension Scheme) सुरुवात होत आहे. विमा नियामक (insurance regulator) इरडाने (IRDA) जीवन विमा कंपन्यांना (life insurance companies) 1 एप्रिल 2021पासून सरल पेन्शन योजना सुरू करण्यास सांगितले होते. सरल पेन्शन योजनेअंतर्गत विमा कंपन्यांना फक्त दोन वार्षिकी देण्याचा पर्याय दिला जाईल. इरडाकडून दिल्या गेलेल्या दिशानिर्देशात (guidelines) सांगितले की, सरल पेन्शन योजनेअंतर्गत मॅच्युरिटीचे लाभ (maturity benefits) मिळणार नाहीत. मात्र यात 100 टक्के खरेदी मूल्याच्या (purchase cost) परताव्याचा पर्याय (return option) असेल.

योजना सुरू झाल्यापासून सहा महिन्यांनंतर कधीही करता येणार सरेंडर

इरडाच्या दिशानिर्देशांमध्ये सांगण्यात आले आहे की, ही पॉलिसी चालू झाल्याच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या कालावधीनंतर कोणत्याही वेळी ही पॉलिसी सरेंडर करता येऊ शकते. दिशानिर्देशात असेही सांगितले गेले आहे की किमान एन्यूटी रक्कम एक हजार रुपये प्रति महिना, तीन हजार रुपये प्रति महिना, सहा हजार रुपये प्रति महिना किंवा 12 हजार रुपये प्रति महिना असणार आहे. इरडाने सांगितले की, विमा कंपन्यांच्या योजनेत एकरूपता राखण्यासाठी आणि सर्व जीवन विमा कंपन्यांकडून उत्पादने उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना एका सरासरी ग्राहकाच्या गरजा पूर्ण करेल.

जाणून घ्या एन्युटी म्हणजे काय

कोणत्याही निवृत्तीवेतन योजनेत आपल्या जमा रकमेच्या बदल्यात कंपन्या ज्या वार्षिक रकमेचा दावा केला जातो तिला वार्षिक एन्युटी म्हटले जाते. याच्या कालावधीची निवड मासिक, त्रैमासिक, सहामासिक किंवा वार्षिक अशाप्रकारे करण्याचा पर्याय उपलब्ध असतो. सेवानिवृत्तीनंतर नियमित उत्पन्नासाठी निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत याची सुविधा मिळते.

अधिक सोयीचे आणि फायदेशीर

इरडाच्या माहितीनुसार सरल पेन्शन योजना खरेदी मूल्याच्या 100 टक्के परताव्यासह लाईफ एन्युटीसह येते. याचा अर्थ असा की एन्युटीचे भुगतान ग्राहकाला आयुष्यभर केले जाईल आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या जोडीदाराच्या मृत्यूनंतरही ही एन्युटी मिळत राहील. यानंतर पती किंवा पत्नीचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कायदेशीर वारसाला खरेदी मूल्य म्हणजेच 100 टक्के रक्कम परत मिळेल.

सरल पेन्शन योजनेचे फायदे

विमा नियामक इरडाच्या निर्देशांनुसार विमा कंपन्यांनी एक जानेवारीपासून सरल विमा पॉलिसी देण्यास सुरुवात केली आहे. या योजनेचे नाव आणि अटी एकच आहेत ज्यामुळे यांची निवड करण्यात अडचण येत नाही. विमा कंपन्या विमा पॉलिसीप्रमाणेच पेन्शन योजनाही वेगवेगळ्या नावाने विकतात आणि ते सर्वोत्तम असल्याचा दावा करतात. उपभोक्त्यांसाठी यातून निवड करणे कठीण असते आणि अनेकदा एकसारख्या नावांमुळे फसवणूकही होऊ शकते. त्यामुळेच इरडाने एकसारख्या अटी आणि सुविधा असलेली योजना आणली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी