Saudi Arabia Economy : कात टाकणारा सौदी अरेबिया, वेगाने वाढतेय अर्थव्यवस्था, भल्या भल्यांना टाकणार मागे

Saudi Arabia Growth : सौदी अरेबिया म्हटले की कच्चे तेल आणि त्यातून उभे राहिलेले अर्थकारण आपल्या डोळ्यासमोर येते. मात्र आता सौदी अरेबियाची अर्थव्यवस्था (Saudi Arabia) मोठी झेप घेते आहे. किंबहुना सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेच्या (Saudi Arabia Economy)घोडदौडीने सर्व जगालाच धक्का बसणार आहे. सौदी अरेबियाची अर्थव्यवस्था 2022 मध्ये जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनणार आहे. या वेगाने सौदी अरेबिया जगातील दिग्गजांना मागे टाकेल.

Saudi Arabia Economy
सौदी अरेबियाची अर्थव्यवस्था 
थोडं पण कामाचं
  • सौदी अरेबियाची अर्थव्यवस्था (Saudi Arabia) मोठी झेप घेते आहे
  • 2022 मध्ये जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनणार
  • सौदी अरेबियाचा विकासदर 7.5 टक्के राहण्याचा अंदाज

Saudi Arabia Economy latest : नवी दिल्ली : सौदी अरेबिया म्हटले की कच्चे तेल आणि त्यातून उभे राहिलेले अर्थकारण आपल्या डोळ्यासमोर येते. मात्र आता सौदी अरेबियाची अर्थव्यवस्था (Saudi Arabia) मोठी झेप घेते आहे. किंबहुना सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेच्या (Saudi Arabia Economy)घोडदौडीने सर्व जगालाच धक्का बसणार आहे. सौदी अरेबियाची अर्थव्यवस्था 2022 मध्ये जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनणार आहे. या वेगाने सौदी अरेबिया चीन, भारतासारख्या आशियाई दिग्गजांना मागे टाकेल आणि पश्चिम युरोपसह उत्तर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेलाही मागे टाकेल. 2022 मध्ये सौदी अरेबियाचा विकासदर 7.5 टक्के राहण्याचा अंदाज एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्समध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात म्हटले आहे की सौदी अरेबियामध्ये 2011 पासून सर्वात वेगवान वृद्धीदर आहे. (Saudi Arabia to surprise leading economies in the world)

अधिक वाचा - Migraine Remedies: मायग्रेनच्या डोकेदुखीवर घरगुती उपाय, मेडिकलमध्ये जाण्याचाही लागणार नाही गरज

सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने

या अहवालात म्हटले आहे की सौदी अरेबियाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने ऊर्जा क्षेत्रावर अवलंबून आहे. ही वाढ मुख्यत्वे ऊर्जेच्या वाढलेल्या किंमती, कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचे वाढते उत्पादन, ऊर्जा आणि बिगर ऊर्जा क्षेत्रातील मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आहे. कोरोना लसीकरण कार्यक्रम यशस्वीरित्या राबवल्याचादेखील अर्थव्यवस्थेला सकारात्मक फायदा झाला आहे. 

अधिक वाचा - Signs of heart disease: हृदय कमकुवत झाल्याची ही आहेत लक्षणं, वेळीच ओळखा आणि सावध व्हा!

प्रचंड आर्थिक ताकद

सौदी अरेबियाकडे 2022 मध्ये तब्बल 163 अब्ज डॉलर्सचा अतिरिक्त निधी असेल असा अंदाज आहे. ही रक्कम 2021 मध्ये असलेल्या 44 अब्ज डॉलरपेक्षा कितीतरी जास्त आहे. सौदी सेंट्रल बँकेने अमेरिकन फेडरल रिझर्व्हने ज्याप्रमाणे वित्तीय आणि चलनविषयक धोरणात लवचिकता दाखवली त्याप्रकारची कोणतीही लवचिकता दाखवलेली नाही. परिणामी, 2022 मध्ये सौदी अरेबियातील ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजे महागाईदर सरासरी 2.5 टक्क्यांच्या आसपास राहिल असा अंदाज आहे. शिवाय 2023 मध्ये त्यात आणखी घट होण्याची अपेक्षा आहे.

व्यवसायासाठी अनूकूल वातावरण 

सौदी अरेबियामध्ये सुरू असलेल्या नियामक सुधारणांमुळे तेथील उद्योग-व्यवसायासाठीचे वातावरण चांगले होते आहे. त्यामुळे परदेशी गुंतवणूक वाढते आहे. या सुधारणा देशाच्या बाजारपेठेला आधार देण्यासोबत अर्थव्यवस्थेतील खाजगी क्षेत्राच्या सहभागाला प्रोत्साहन देत आहेत. उद्योगांना अनूकूल धोरण स्वीकारल्यामुळे येथे व्यवसाय सुरू करणे सोपे झाले आहे. त्यामुळे परदेशी कंपन्यांना येथील अर्थव्यवस्थेत गुंतवणूक करणे सोपे झाले आहे.

अधिक वाचा -  Spices in Children’s diet: लहान मुलांसाठी स्वयंपाक करताना घ्या काळजी, मसाल्यांचा करा योग्य वापर

सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर 7.6 टक्क्यांवर 

अहवालात म्हटले आहे की सौदी अरेबियाचे आर्थिक धोरण अनेक अपेक्षांनी भरलेले आहे. जर देशातील सुधार प्रक्रिया अशीच रुळावर राहिली आणि सौदीच्या धोरणात्मक प्रकल्प आणि विकास क्षेत्रांना वित्तपुरवठा होत राहीला तर अर्थव्यवस्था मोठी झेप घेण्याची चिन्हे आहेत. ऑगस्टमध्ये, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भाकीत केले होते की 2022 मध्ये सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर हा 7.6 टक्के राहण्याचा अंदाज आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी