National Pension System : नवी दिल्ली : सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य (Retirement)आरामात जावे असे प्रत्येकालाच वाटत असते. यासाठी पुरेसा निधी हवा असणे ही कोणत्याही पगारदार व्यक्तीची इच्छा असते. रिटायरमेंटनंतर आर्थिक स्थैर्य असावे, आर्थिक ताणतणाव नसावेत असे तुम्हालाही वाटत असेल. त्यासाठी निवृत्तीनंतरचे नियोजन (Retirement planning) करणे आवश्यक असते. खाजगी आणि सरकारी दोन्ही क्षेत्रातील कर्मचारी हे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत योगदान देऊ शकतात. केंद्राने असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी सेवानिवृत्ती योजना देखील सुरू केली आहे. निवृत्तीनंतर नियमित पेन्शन (Pension) मिळाल्यास आर्थिक स्थैर्य येते. तुमच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यात स्थैर्य यावे यासाठी केंद्र सरकारचा अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana) या एक उत्तम पर्याय आहे. यातून तुम्हाला दरमहा पेन्शन मिळते. (Save Rs 7 everyday & get pension of Rs 60,000, check the details of scheme)
असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी एक मोठे पाऊल म्हणून केंद्र सरकारने 9 मे 2015 रोजी अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana) सुरू केली. आतापर्यंत, योजनेचे जवळपास 4 कोटी सदस्य आहेत. ही एक सेवानिवृत्ती योजना आहे. या योजनेचे व्यवस्थापन केंद्र सरकार नॅशनल पेन्शन सिस्टम म्हणजे राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS)द्वारे करते. अटल पेन्शन योजना सेवानिवृत्तीवर परताव्याची हमी देते.
अधिक वाचा : Gold Rate Today | सोन्याच्या भावावर अमेरिकन घटकांचा दबाव...मात्र मागणीदेखील, त्यामुळे चढउतार...पाहा ताजा भाव
18 वर्षांपेक्षा कमी वयाचे लोक अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करू शकतात. निवृत्त झाल्यानंतर दरमहा 5,000 रुपये मासिक पेन्शन मिळवण्यासाठी ते 42 वर्षांसाठी 210 रुपये दरमहा गुंतवू शकतात. 7 रुपये प्रतिदिन गुंतवल्यास दरमहा 210 रुपये होतील आणि या पद्धतीने वर्षभर गुंतवणूक केल्यास गुंतवणुकदाराला वार्षिक 60,000 रुपये पेन्शन मिळेल.
मात्र या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्या कोणत्याही व्यक्तीने हे लक्षात ठेवले पाहिजे की त्यांना मासिक पेन्शन मिळण्यासाठी त्यांनी न चुकता दरमहा 210 रुपये प्रीमियम भरला पाहिजे.
अधिक वाचा : PM Awas Yojana | जेव्हा पीएम आवास योजनेअंतर्गत घर मिळाल्यावर एका गरीब व्यक्तीने पंतप्रधानांना लिहिलं पत्र...