jan dhan yojana: जनधन योजनेंतर्गत बँक खात्यांची संख्या ४० कोटी पार, मिळतात अनेक सुविधा

काम-धंदा
Updated Aug 03, 2020 | 17:50 IST | टाइम्स नाऊ मराठी

Pm modi jan dhan yojana: पंतप्रधान जनधन योजनेला ६ वर्षे पूर्ण होण्याआधी या अंतर्गत खोलण्यात आलेल्या बँक खा्त्यांची संख्या ४० कोटीहून अधिक झाली आहे. 

Pmjdy
जनधन योजनेंतर्गत बँक खात्यांची संख्या ४० कोटी पार 

थोडं पण कामाचं

  • पंतप्रधान जनधन योजनेची सुरूवात ६ वर्षांपूर्वी करण्यात आली होती
  • या योजनेंतर्गत आतापर्यंत ४०.०५ कोटी लोकांची खाती खोलण्यात आली आहेत.
  • या खात्यांमध्ये जमा झालेली रक्कम १.३० लाख कोटी रूपयांहून अधिक झाली आहे. 

मुंबई: मोदी सरकारच्या आर्थिक समावेश कार्यक्रम पंतप्रधान जनधन योजना(PMJDY)अंतर्गत ४० कोटीहून अधिक बँक खाती खोलण्यात आली आहेत. योजनेची सुरूवात ६ वर्षांपूर्वी करण्यात आली होती. ताज्या आकडेवारीनुसार आतापर्यंत ४०.०५ कोटी लोकांची जनधन खाती सुरू करण्यात आली आहेत. या खात्यांमध्ये जमा झालेली रक्कम १.३० लाख कोटी रूपयांहून अधिक आहे. अर्थ मंत्रालयांतर्गत येणाऱ्या आर्थिक सेवा विभाग(डीएफएस)ने ट्वीटमध्ये म्हटलेय की जगातील सर्वात मोठा आर्थिक समावेशी कार्यक्रम पीएमजेडीवाय अंतर्गत आपण एक टप्पा पार केला आहे.या योजनेंतर्गत खोलण्यात आलेल्या एकूण खात्यांची संख्या ४० कोटीहून अधिक झाली आहे. 

जनधन(jandhan)खात्यामध्ये ओव्हरड्राफ्ट, रुपे कार्डची सुविधा

जनधन खात्यांना हे यश या योजनेला ६ वर्षे पूर्ण होण्याच्या काही दिवस आधीच मिळाले आहे. योजनेचा शुभारंभ २८ ऑगस्ट २०१४ला करण्यात आला होता. योजनेचा हेतू देशातील लोकांना बँकिंग सुविधेशी जोडणे हा आहे. पीएमजेडीवाय अंतर्गत खोलण्यात आलेल्या जनधन खाते हे बचत बँक खाते आहे. यात रुपे कार्ड आणि खातेधारकांना ओव्हरड्राफ्ट देण्याचीही सुविधा आहे. या खात्यांमध्ये खातेधारकांला मिनिमम बॅलन्स ठेवण्याची गरज भासत नाही. 

अपघात विमा रक्कम वाढवून २ लाखांवर

योजनेला अधिक यश मिळवण्यासाठी सरकारने २८ ऑगस्ट २०१८नंतर खोलल्या जाणाऱ्या जनधन खात्यांसोबत अपघात विमा रक्कम वाढवून २ लाख रूपये इतकी केली आहे. याआधी ही रक्कम १ लाख रूपये इतकी होती. यासोबतच ओव्हरड्राफ्ट सुविधेची मर्यादा वाढवून १०,००० रूपये करण्यात आली आहे. सरकारने या योजनेंतर्गत प्रत्येक घरातून बँक खाते खोलण्याऐवजी  आपले लक्ष आता प्रत्येक वयस्कर व्यक्तीचे बँक खाते असण्याला प्राधान्य देण्यास सुरूवात केली आहे. 

महिला जन धन(jandhan) खात्यामध्ये १५०० रुपये टाकण्यात आले

जनधन खातेधारकांमध्ये ५० टक्के महिला आहेत आणि सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत कोविड १९ संकटात गरीबांना मदत करण्यासाठी तीन समान मासिक हप्ता म्हणून १५०० रूपये त्यांच्या खात्यात टाकले आहेत. सरकारने २६ मार्च २०२० ला जनधन खातेधारकांच्या खात्यात एप्रिलपासून तीन महिने दर महिन्यासाठी १५०० रूपयांची मदत निधी देण्याची घोषणा केली होती. 

पीएमजेडीवाय योजनेचा हेतू सर्वांना बँकिगचे ज्ञान पोहोचवण्यासोबतच समाजातील कमकुवत आणि कमी उत्पन्न असलेल्या प्रत्येक वयस्कर व्यक्तीचे बचत बँक खाते असणे, गरजेनुसार कर्ज घेण्याची सुविधा तसेच अशा लोकांना विमा आणि पेन्शनची सुविधा देणे होय. जनधन बँक खात्यांच्या माध्यमातून लोकांना मिळणारे सरकार लाभ सरळ बँक खात्यात टाकण्याचीही सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी