पीपीएफवरील व्याज वाढणार आहे का? स्टेट बॅंकेने सरकारला दिला 'हा' सल्ला

काम-धंदा
Updated Apr 17, 2021 | 23:02 IST | टाइम्स नाऊ मराठी

सध्या पीपीएफवर ७.१ टक्के आणि ईपीएफवर ८.५ टक्के व्याज मिळते आहे. जर स्टेट बॅंकेचा सल्ला सरकारने मान्य केला तर पीपीएफवरील व्याज वाढू शकेल.

SBI advise to government on interest rate of PPF
एसबीआयचा पीपीएफ व्याजदरावर सरकारला सल्ला 

थोडं पण कामाचं

  • ईपीएफ आणि पीपीएफ व्याजदरांसंदर्भात सल्ला
  • ईपीएफच्या तुलनेत पीपीएफवरील व्याजदर कमी
  • सोशल सिक्युरिटी लक्षात घेऊन व्याजदर समान राखण्याचा सल्ला

नवी दिल्ली : स्टेट बॅंक ऑफ इंडियाने सरकारला ईपीएफ आणि पीपीएफ व्याजदरांसंदर्भात सल्ला दिला आहे. पीपीएफ आणि ईपीएफवरील व्याजदर समान असावेत असा सल्ला एसबीआयने सरकारला दिला आहे. डॉ. सौम्य कान्त घोष हे एसबीआयच्या रिसर्च टीमचे प्रमुख आहेत. पीपीएफ हा स्वयंरोजगारीत नागरिकांसाठी एक रिटायरमेंट फंडच असतो. मात्र ईपीएफच्या तुलनेत पीपीएफवरील व्याजदर कमी असतो. 

एसबीआयचा सल्ला


एसबीआयच्या अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे की सरकारला सोशल सिक्युरिटी लक्षात घेऊन व्याजदर समान राखण्याची आवश्यकता आहे. याशिवाय पीपीएफवरील १५ वर्षांच्या लॉक ईन पिरियडलाही काढून टाकण्याचा सल्ला देण्यात आला आहे. काही पेनल्टी लावून गुंतवणुकदारांना पीपीएफमधून पैसे काढण्याची सुविधा दिली पाहिजे असा सल्ला एसबीआयने दिला आहे. सध्या  पीपीएफवर ७.१ टक्के आणि ईपीएफवर ८.५ टक्के व्याज मिळते आहे. जर स्टेट बॅंकेचा सल्ला सरकारने मान्य केला तर पीपीएफवरील व्याज वाढू शकेल.

तिमाहीवर आधारित व्याजदराचे गणित


पीपीएफमध्ये गुंतवणुकारांना त्यांच्या पैशाची गॅरंटी सरकारकडून मिळते. ही एक दीर्घकालीन अल्पबचत योजना आहे. स्वयंरोजगारित लोकांना रिटायरमेंटची सुरक्षितता देणे हा त्याचा हेतू आहे. पीपीएफवरील व्याजदराचे कॅल्क्युलेशन हे तिमाही स्वरुपाचे असते. सध्या पीपीएफवर ७.१ टक्के व्याज मिळते आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी ईपीएफवर ८.५ टक्के व्याज देण्यात आले आहे. स्टेट बॅंकेने सरकारला पीपीएफ आणि ईपीएफवरील व्याजदर समान राखण्याचा सल्ला दिला आहे.

पीपीएफ असते टॅक्स फ्री


२०१९ मध्ये मोदी सरकारने पीपीएफ२०१९ ही योजना लागू केली होती. पीपीएफमधील गुंतवणूक सुरक्षित असते. पोस्ट ऑफिस किंवा बॅंकेत जाऊन खाते उघडता येते. या गुंतवणुकीवर करवजावट मिळते. याशिवाय मॅच्युरिटीची रक्कम आणि त्यावरील व्याजदेखील करमुक्त असते. या योजनेचे खास वैशिष्टय हे आहे की कोणत्याही कोर्टाच्या आदेशाने या खात्यातील रक्कम जप्त करता येत नाही. पीपीएफ हा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठीचा उत्तम पर्याय आहे. चांगले व्याजदर आणि सुरक्षित गुंतवणूक असल्यामुळे अनेक नागरिक या योजनेत गुंतवणूक करत असतात.
पीपीएफमध्ये गुंतवणुकदारांना त्यांच्या पैशाची गॅरंटी मिळते. ही एक दीर्घकालीन अल्पबचत योजना आहे. पीपीएफचे व्याज तिमाही स्वरुपात ठरवण्यात येते. 

पीपीएफची खास वैशिष्ट्ये


१. पीपीएफ खाते उघडल्यानंतर १५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मॅच्युरिटीनंतरसुद्धा पुढील पाच वर्षांकरता पीपीएफमध्ये पैसे जमा करता येतात.
२. पीपीएफचे व्याजदर भारत सरकार दर तीन महिन्यांनी निश्चित करते.
३. एका वर्षात किमान ५०० रुपये आणि कमाल १.५ लाख रुपयंची गुंतवणूक या योजनेत करता येते.
४. पीपीएफ खात्यात किमान ५०० रुपये दर वर्षी जमा केले नाहीत तर खाते बंद होते.
५. दरवर्षाच्या शेवटी व्याजाची रक्कम खात्यात जमा केली जाते. सध्या पीपीएफवर ७.१ टक्के व्याज मिळते.
६. पीपीएफ खात्यात जमा केलेल्या रकमेला पाच वर्षानंतर केव्हाही काढता येते.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी