SBIचा खातेधारकांना इशारा, 'या' गोष्टींची काळजी घ्या नाही तर...

काम-धंदा
Updated Dec 14, 2019 | 14:02 IST

SBI Alert: भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. बँकेने आपल्या खातेधारकांना एक महत्वाचा इशारा दिला आहे. ज्याकडे ग्राहकांनी दुर्लक्ष केलं तर त्यांना मोठं नुकसान होऊ शकतं.

sbi alert warn customer malware mobile charging bank details password data usb cable technology news marathi
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • SBI ने ग्राहकांना दिला इशारा
  • सार्वजनिक ठिकाणी मोबाइल चार्जिंग केल्याने होऊ शकतं मोठं नुकसान
  • हॅकर्स तुमच्या बँक अकाऊंटवर मारु शकतात डल्ला, जाणून घ्या यापासून वाचण्यासाठी काही टिप्स

मुंबई: भारतातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना बँकेने एक इशारा दिला आहे. जर तुम्ही सार्वजनिक ठिकाणी चार्जिंग स्टेशनवर आपला मोबाइल फोन चार्ज करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. कारण, सार्वजनिक चार्जिंग स्टेशनवर फोन चार्जिंग करु नका नाही तर तुम्हाला मोठं नुकसान होईल असा इशारा बँकेने दिला आहे. सार्वजनिक चार्जिंग स्टेशनवर फोन चार्जिंगला लावलेला असताना तेथेली मालवेअर (व्हायरस) तुमच्या फोनमध्ये एन्ट्री करेल आणि त्याच्या माध्यमातून हॅकर्स तुमचा डेटा चोरी करण्याची शक्यता बँकेने वर्तवली आहे.

एसबीआयने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, 'ज्यूस जॅकिंग, एक यूएसबी चार्जर घोटाळा आहे. तुमच्या बँक खात्यातील रक्कम पूर्णपणे खाली करु शकतं'. हॅकर्स चार्जिंग स्टेशन्सवरुन तुमच्या ऑनलाईन बँकिंग किंवा पेमेंट सर्व्हिस अॅप संबंधित यूजर आयडी आणि पासवर्ड चोरी करु शकतात. यामुळे तुम्हाला मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं. 

काय आहे ज्यूस जॅकिंग? 

SBIच्या ट्वीटमध्ये ज्यूस जॅकिंगचा उल्लेख करण्यात आला आहे, जो एक यूएसबी चार्जर घोटाळा आहे. ज्यूस जॅकिंगच्या माध्यमातून हॅकर्स पीडित व्यक्तीच्या बॅक खात्यातून पैसे अगदी सहज काढू शकतात. हॅकर्स सार्वजनिक चार्जिंग स्टेशन्सवर मालवेअर (वायरस) टाकतात आणि त्यानंतर तेथे कोणी फोन चार्जिंगला लावला तर त्याच्या फोनमध्ये वायरस प्रवेश करतो. यानंतर हॅकर्स या वायरसच्या माध्यमातून त्या व्यक्तीचा पर्सनल डेटा चोरी करु शकतो. तसेच त्याच्या बँक अकाऊंटमधील रक्कमही चोरी केली जावू शकते.

काय काळजी घ्यावी?

  1. अशा प्रकारच्या सायबर हल्ल्यापासून आणइ हॅकर्सपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी USB डेटा ब्लॉकरचा वापर करा. म्हणजेच अशा चार्जरचा वापर करा ज्याच्या केबलमध्ये डेटा ट्रान्सफरची सुविधा नसेल आणि चार्जर केवळ फोन चार्जिंगसाठीच वापरत येत असेल. 
  2. सार्वजनिक स्थळांवर असलेल्या कोणत्याही यूएसबी पोर्टच्या सहाय्याने फोन चार्ज करु नका. थेट इलेक्ट्रिक सॉकेटला चार्जर लावून फोन चार्ज करण्यास प्राथमिकता द्या.
  3. स्वत:च्या फोनचा ओरिजनल चार्जर सोबत ठेवा आणि शक्यतो पावर बँकचा वापर फोन चार्जिंगसाठी करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी