Fraud Alert | स्टेट बॅंकेचा ग्राहकांना सावधगिरीचा इशारा, या नंबरपासून दूर राहा, पाहा काय आहे कारण....

SBI Scam : स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI)आपल्या ग्राहकांना देशभरात पसरलेल्या कथित फसवणुकीबद्दल सावधगिरीचा इशारा दिला आहे. देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने आपल्या ग्राहकांना एसबीआयच्या नावाने केल्या जात असलेल्या घोटाळ्याबद्दल (SBI phishing scam) सावध केले आहे. या फ्रॉडमध्ये (Fraud) स्टेट बँकेचे नाव वापरून लोकांची ट्विट, एसएमएस आणि ईमेल यांसारख्या विविध माध्यमांद्वारे पैशांची फसवणूक करण्याचे प्रकार घडत आहेत. एसबीआय फ्रॉड करणारे दोन नंबर दिले आहेत.

SBI phishing scam
स्टेट बॅंकेच्या नावाने केला जातोय घोटाळा 
थोडं पण कामाचं
  • स्टेट बॅंकेने आपल्या ग्राहकांना देशभरात पसरलेल्या कथित फसवणुकीबद्दल सावधगिरीचा इशारा दिला
  • एसबीआयच्या नावाने केला जातोय मोठा घोटाळा
  • एसबीआयने फ्रॉड करण्यासाठी वापरण्यात येणारे फोन नंबर जाहीर केले

SBI warns About fraud : नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI)आपल्या ग्राहकांना देशभरात पसरलेल्या कथित फसवणुकीबद्दल सावधगिरीचा इशारा दिला आहे. देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने आपल्या ग्राहकांना एसबीआयच्या नावाने केल्या जात असलेल्या घोटाळ्याबद्दल (SBI phishing scam) सावध केले आहे. या फ्रॉडमध्ये (Fraud) स्टेट बँकेचे नाव वापरून लोकांची ट्विट, एसएमएस आणि ईमेल यांसारख्या विविध माध्यमांद्वारे पैशांची फसवणूक करण्याचे प्रकार घडत आहेत. बँकेने दोन फोन नंबर दिले आहेत आणि खातेधारकांना सावध केले आहे की या फोन नंबरवरून (Fraud phone Numbers) कॉल आल्यास त्याला उत्तर देऊ नये किंवा सावध राहावे. (SBI alerts customers regarding fraud & informs about these phone numbers, check details)

अधिक वाचा : UPI PIN | तुमच्या युपीआयचा पिन विसरलात? तो कसा मिळवायचा ते पाहा, सोप्या स्टेप्स...

एसबीआयने जाहीर केले फ्रॉड करणारे फोन नंबर

स्टेट बॅंकेने आपल्या ग्राहकांना +91-8294710946 किंवा +91-7362951973 वरून कॉल न स्वीकारण्याचा सल्ला दिला आहे. कारण हे स्कॅम कॉल्स आहेत. CID आसामच्या सीआयडीने  प्रथम या फोन नंबरची दखल घेतली आणि ट्विट केले, "SBI ग्राहकांना दोन क्रमांकांवरून कॉल येत आहेत. -+91-8294710946 आणि +91-7362951973. त्यांना KYC अपडेटसाठी फिशिंग लिंकवर क्लिक करण्यास सांगत आहेत. सर्व एसबीआय ग्राहकांना सांगण्यात येते अशा कोणत्याही फिशिंग/संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका.'' नंतर बँकेने याची खातरजमा केली. "या नंबर्सला उत्तर देऊ नका आणि KYC अपडेटसाठी #फिशिंग लिंक्सवर क्लिक करू नका. कारण ते SBI शी संबंधित नाहीत," असे SBI ने रिट्विट केले.

अधिक वाचा : 7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांना धक्का! डीए दरवाढीला लागू शकतो ब्रेक, जाणून घ्या संपूर्ण कारण

एसबीआयकडून ग्राहकांना प्रतिसाद

ग्राहक एसबीआय घोटाळ्याबद्दल ट्विट करत आहेत आणि बॅंक त्यांना प्रतिसाद देत आहे. यापैकी एका ट्विटला प्रतिसाद म्हणून SBI ने म्हटले, "आम्ही तुमच्या सूचनेची दखल घेतो आणि आणि आम्हाला सांगितल्याबद्दल तुमचे आभारी आहोत. आमची IT सुरक्षा टीम आवश्यक पावले उचलेल. शिवाय, आम्ही आमच्या सर्व क्लायंटना ईमेल/ SMS/ कॉलला प्रतिसाद न देण्यास प्रोत्साहित करतो. ग्राहक आयडी/ पासवर्ड/ डेबिट कार्ड नंबर/ पिन/ सीव्हीव्ही/ ओटीपी इ. वैयक्तिक किंवा बँकिंग माहितीची विनंती करणाऱ्या/एम्बेडेड लिंक्सला प्रतिसाद न देण्याची विनंती करतो.. हे प्रश्न बँकेकडून कधीही विचारले जात नाहीत. ग्राहक अशा फिशिंग/स्मिशिंग/विशिंग प्रयत्नांची ईमेलद्वारे तक्रार करू शकतात. कारवाईसाठी phishing@sbi.co.in वर ईमेल पाठवा किंवा 1930 वर हॉटलाइनवर कॉल करा. ग्राहक या घटनांची तक्रार स्थानिक प्रशासनाकडेदेखील करू शकतात."

अधिक वाचा : New Labour Laws | पगार, पीएफ, कामाचे तास आणि बरंच काही...1 जुलैपासून नवीन कामगार कायद्यांतर्गत काय बदलणार, जाणून घ्या

आरबीआयने फ्रॉडपासून केले सावध

फसवणुकीचा प्रभावीपणे मुकाबला करण्यासाठी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने फसवणूक करणारे आणि घोटाळे करणारे कसे काम करतात आणि त्यांच्यापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे हे सांगणारे शैक्षणिक माहितीपत्रक जारी केले. "फसवणूक करणारे इन्स्टंट मेसेजिंग अॅप्स/एसएमएस/सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आकर्षक कर्जावर फसवे संदेश वितरीत करतात आणि विश्वास निर्माण करण्यासाठी त्यांनी पुरवलेल्या मोबाइल नंबरमध्ये कोणत्याही ज्ञात NBFC चा लोगो प्रोफाइल पिक्चर म्हणून वापरतात," असे RBI ने म्हटले आहे. घोटाळेबाज नंतर कोणत्याी व्यक्तींना कॉल करतात आणि बोगस मंजुरी पत्रे, फसव्या चेकच्या प्रती आणि अशाच प्रकारे विविध शुल्काची मागणी करतात. कर्जदारांनी ही फी भरली की फसवणूक करणारे पैसे घेतात.

संशयास्पद लोकांवर विश्वास न ठेवणे किंवा एसएमएस किंवा ईमेलद्वारे प्राप्त झालेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करणे यासह या घोटाळेबाजांविरुद्ध अनेक सुरक्षा उपायांचा अवलंब करण्याचा सल्ला आरबीआयने ग्राहकांना दिला आहे. नुकत्याच झालेल्या SBI घोटाळ्यासह ग्राहकांना अशा अनेक घटनांना सामोरे जावे लागले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी